NEET PG Exam Registration
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. त्यानंतर भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन एनटीएने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास ११ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जे विद्यार्थी कोणत्या कारणास्तव अंतिम मुदतीपर्यंत अर्ज भरू शकले नाहीत ते आता वाढीव तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज केल्यानंतर, शुल्क ११ मार्च रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येईल. अर्ज फक्त एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in द्वारे ऑनलाइन सबमिट करता येतील. इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मागील वर्षी या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या २३ लाखांपेक्षा जास्त होती. त्यापैकी २२ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. २०२४ मध्येही सुमारे २३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. २०२३ मध्ये २० लाख ३८ हजार, २०२२ मध्ये १७ लाख ६४ हजार, २०२१ मध्ये १५ लाख ४४ हजार आणि २०२० मध्ये सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे सर्व आकडे पाहता विद्यार्थ्यांचा कल नीट परीक्षेकडे मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असा करा अर्ज: नीट यूजीचा अर्ज भरण्यासाठी, अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inला भेट द्यावी. मुख्यपृष्ठावरील ‘ताज्या बातम्या’ अंतर्गत ‘NEET (UG) २०२६ साठी नोंदणी थेट आहे!’ वर क्लिक करा. प्रथम, विनंती केलेले तपशील भरून नोंदणी करा. नोंदणीनंतर, इतर तपशील प्रवीष्ट करून अर्ज पूर्ण करा. तुमच्या श्रेणीनुसार शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















