Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEET MDS 2022 परीक्षेचा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड

NEET MDS 2022

NEET MDA Result 2022 

NEET MDS 2022 : The result has been declared for NEET MDS 2022 Examination. Candidates appearing for this examination can download their results to the given official website. The exam was conducted on the 2nd of May. Further details are as follows:-

नीट एमडीएस २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. ही परीक्षा २ मे रोजी घेण्यात आली होती. आता हा निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.

How to Check NEET MDS 2022 Result 

  • उमेदवारांनी सर्वप्रथम राष्ट्रीय परीक्षा मंडळाची अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in वर जा.
  • होम पेजवर नीट एमडीएस टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • निकाल तपासण्यासाठी तुमचा लॉगिन आयडी तपशील भरा.
  • तुमचा नीट एमडीएस निकाल २०२२ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील उपयोगासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

NEET MDS 2022: २ मे रोजी झाली परीक्षा

नीट एमडीएस २०२२ (NEET MDS 2022) ची परीक्षा २ मे रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. नीट एमडीएस २०२२ चे स्कोअर कार्ड २ जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. एनबीईने पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून दिली आहे. बातमीत पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार नीट एमडीएस निकाल तपासू शकतात.

NEET MDS 2022: श्रेणीनिहाय पात्रता आणि कट ऑफ स्कोअर

  • सर्वसाधारण किंवा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ५० टक्के आणि कट ऑफ स्कोअर २६३ आहे.
  • तर एससी/एसटी/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ४० टक्के आणि कट ऑफ स्कोअर २२७ आहे.
  • तर अनारक्षित पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ४५% आणि कट ऑफ स्कोअर २४५ इतका आहे.

NEET MDS कोटानिहाय जागांसाठी गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नीट एमडीएस निकाल २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, ५० टक्के ऑल इंडिया जागांसाठी पात्रता स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. राज्य कोट्यातील जागांसाठी अंतिम गुणवत्ता यादी / श्रेणीनिहाय गुणवत्ता यादी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून त्यांच्या पात्रता / पात्रता निकषांनुसार, लागू मार्गदर्शक तत्त्वे आणि आरक्षण धोरणानुसार तयार केली जाईल. यासंदर्भातील सविस्तर अपडेट अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट – nbe.edu.in


NEET MDS Exam 2022 date Extended

NEET MDS 2022 : Ministry of Health & Family Welfare has extended the date of NEET-MDS 2022 by 4-6 weeks and the date of completion of a compulsory rotating internship for eligibility for admission to MDS courses fixed at 31st July instead of 31st March this year.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) नीट – एमडीएस २०२२ (NEET-MDS) ची तारीख ४-६ आठवड्यांनी पुढे ढकलली असुन एमडीएस (MDS) अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेसाठी अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण करण्याची तारीख 31 मार्च ऐवजी 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

NEET MDS 2022


NEET MDS 2022 Registration

NEET MDS 2022 : The registration process for admission in colleges in the state through NEET MDS 2022 is starting. Candidates can find more information in this regard on the official website of MHCET at mahacet.org. Candidates can apply online here. Further details are as follows:-

राज्यातील महाविद्यालयांमध्ये NEET MDS २०२२ च्या माध्यमातून प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारांना या संदर्भातील अधिक माहिती MHCET ची अधिकृत वेबसाइट mahacet.org वर मिळणार आहे. इथे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स ( National Board Examination, NBE) द्वारे घेतल्या जात आहेत. बोर्डाने जाहीर केलेल्या नीट एमडीएस (NEET MDS) नोटिफिकेशननुसार, अर्जाचा फॉर्म दुपारी ३ च्या सुमारास उपलब्ध करून दिला जाईल. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. नीट एमडीएस २०२२ (NEET MDS 2022) परीक्षा ६ मार्च २०२२ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. उमेदवारांकडे अर्ज भरण्यासाठी साधारण २० दिवस आहेत. त्यांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

How to Apply For NEET MDS 2022

  • नीट एमडीएस नोंदणीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
  • होमपेजवर ‘NEET MDS’टॅबवर क्लिक करा आणि नंतर ‘२०२२’ विभागावर क्लिक करा. (थेट लिंक लवकरच सक्रिय होईल)
  • एक नवीन पेज खुले होईल. इथे सर्व तपशील भरुन नोंदणी करा.
  • अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी नोंदणी फॉर्मची एक प्रिंट डाउनलोड करा.

Please note that application for MDS 2022 will not be accepted without paying the registration fee. Candidates can contact NBE on 022-61087595 if they have any queries regarding application. The exact MDS 2022 exam is March 6, 2022. More details regarding the exam are given on the official website.

The National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) will conduct computer based NEET-MDS 2022 examinations on March 6, 2022 at various examination centers across the country, according to an official statement from NBEMS.

अधिकृत वेबसाईट – nbe.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड