NEET परीक्षा निश्चित तारखेलाच होणार!! जाणून घ्या सविस्तर माहिती

NEET 2022

NEET 2022

NEET 2022: National Eligibility and Entrance Test (NEET) Exam will be conducted on the 17th of July 2022 for medical and engineering admissions. The Delhi High Court has allowed the National Eligibility and Entrance Test (NEET) for medical and engineering admissions to be held on July 17. Further details are as follows:-

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) येत्या १७ जुलैला घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली. याचिकाकर्ते विद्यार्थी नसते तर याचिका केली म्हणून न्यायालयाने दंड ठोठावण्यास मागे-पुढे पाहिले नसते, असे म्हणत न्यायालयाचे न्या. संजीव नरुला यांनी याचिका फेटाळली.या निर्णयामुळे १८ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.

NEET 2022


NEET UG Exam 2022 – Exam Centers

NEET 2022: NEET UG Exam 2022 will conduct on the 17th of July 2022 at various exam centers in the country. The admit cards will be available soon on the official website. Candidates can download their UG Admission Card 2022 on the official website four days before the date of examination i.e. till 13th of July. Further details are as follows:-

नीट यूजी परीक्षा २०२२ ही १७ जुलै रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. एनटीएकडून लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. एजन्सीने नोटीसमध्ये कोणतीही तात्पुरती तारीख दिलेली नाही. दरम्यान मागील वर्षांचा कल पाहता, उमेदवार त्यांचे नीट यूजी प्रवेशपत्र २०२२ अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी म्हणजे १३ जुलै पर्यंत डाउनलोड करू शकतात. दरम्यान उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा शहर जाहीर करण्यात आले आहे.

 • वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.
 • तर दुसरीकडे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (National Testing Agency, NTA) उमेदवारांची परीक्षा शहरे जाहीर केली आहेत.
 • एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, नीट यूजी २०२२ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in वर त्यांना वाटप केलेल्या परीक्षा शहराबद्दल माहिती देण्यात आली आहे.
 • नीट अंडर-ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीत दिलेल्या लिंकवरून त्यांची परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करता येणार आहे.
 • उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवासाची योजना आखता यावी यासाठी एनटीएने उमेदवारांचे परीक्षा शहर जाहीर केले आहे.
 • बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

NEET UG Admit Card 

 • नीट यूजी परीक्षा २०२२ ही १७ जुलै रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाईल.
 • एनटीएकडून लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे.
 • एजन्सीने नोटीसमध्ये कोणतीही तात्पुरती तारीख दिलेली नाही.
 • दरम्यान मागील वर्षांचा कल पाहता, उमेदवार त्यांचे नीट यूजी प्रवेशपत्र २०२२ अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी म्हणजे १३ जुलै पर्यंत डाउनलोड करू शकतात.

परीक्षा शहर

एनटीएकडून देशातील ५४६ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यासोबतच एनटीएने नीट यूजी २०२२ परीक्षा शहराबाबत जाहीर केलेल्या नोटीसनुसार, वैद्यकीय प्रवेश परीक्षा देशभरातील ५४६ शहरांमध्ये घेतली जाईल. याशिवाय एजन्सीद्वारे परदेशातील नियुक्त १४ शहरांमध्येही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या शहरांतील उमेदवार अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केलेल्या लिंकवरून त्यांचे वाटप केलेले परीक्षा शहर तपासू शकतात.

परीक्षेचे शहर – https://bit.ly/3bBt2UZ

परीक्षा नोटीस – https://bit.ly/3uaYlN4


NEET UG 2022 – Correction Window Reopens

NEET 2022 : NEET UG 2022 correction window reopens. One more chance for category correction in the application form. NEET UG application can be amended from 14th June to 16th June 2022. Further details are as follows:-

जे उमेदवार नीट यूजी ऑनलाइन अर्ज भरताना आपल्या वास्तविक श्रेणीचा उल्लेख करू शकले नव्हते, ते आता आपला प्रवर्ग नोंदवू शकतात. अर्जात दुरुस्तीची आणखी एक संधी एनटीएने दिली आहे. 

 • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) ने नीट यूजी (NEET UG) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्याची आणखी एक संधी देऊ केली आहे.
 • NEET UG 2022 application म्हणजेच नीट यूजी अर्जात १४ जून ते १६ जून २०२२ पर्यंत दुरुस्ती करता येणार आहे.
 • १६ जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येईल.
 • एनटीएने सांगितले की, ‘२४ मे २०२२ च्या नोटीसनुसार, उमेदवारांना नीट यूजी २०२२ साठी आपल्या ऑनलाइन अर्जातील श्रेणी सुधारण्याची आणखी एक संधी देण्याच निर्णय घेण्यात आला आहे.’
 • एनटीएने या संबंधी नोटिस जारी केली आहे. या सूचनेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिक्लेरेशनचा नमुनाही जोडला आहे.
 • विद्यार्थी अधिकृत वेबसाइट nta.ac.in च्या माध्यमातून दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करूनही हा नमुना पाहू शकतात.

जे उमेदवार नीट यूजी ऑनलाइन अर्ज भरताना आपल्या वास्तविक श्रेणीचा उल्लेख करू शकले नव्हते, ते आता आपला प्रवर्ग नोंदवू शकतात आणि त्यानुसार प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करू शकतात. एनटीएने असेही म्हटले आहे की जे सक्षम प्राधिकारी श्रेणी प्रमाणपत्र प्राप्त करू शकत नाही ते एजन्सीद्वारे नमुनास्वरुप दिलेले सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करू शकतात. एनटीएने या निवेदनात असेही म्हटले आहे की प्रवर्ग दिल्यानंतर बदललेल्या अतिरिक्त शुल्काचा भरणा विद्यार्थी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय किंवा पेटीएम च्या माध्यमातून करू शकतात. एनटीएने असेही स्पष्ट केले आहे की अर्जात दुरुस्ती करण्याची ही अखेरची संधी आहे.


NEET UG 2022

NEET 2022 : The National Testing Agency (NTA) has once again extended the deadline to apply for the National Eligibility cum Entrance Test (UG) 2022, NEET UG 2022. The last date to apply for the National Eligibility Test is 15th May, 2022. Meanwhile, NTA has extended the deadline for applications. Those who have not yet applied for the exam can apply till May 20, 2022. Candidates can go to the official website neet.nta.nic.in and pay the application and application fee. Further details are as follows:-

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मे २०२२ रोजी संपली आहे. दरम्यान एनटीएकडून अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल ते २० मे २०२२ पर्यत अर्ज करु शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन अर्ज आणि अर्ज शुल्क भरता येणार आहे. 

 • रविवार, १५ मे २०२२ रोजी एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, एनईईटी (यूजी) २०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.
 • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आता २० मे २०२२ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) ची नोंदणी करू शकतील.
 • त्यानंतर उमेदवारांना त्याच दिवशी रात्री ११.५० वाजेपर्यंत विहित परीक्षा शुल्क भरायचे आहे.
 • देशभरातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील वैद्यकीय आणि दंतविज्ञानाच्या पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी उमेदवारांच्या निवडीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नीट यूजी २०२२ ची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
 • ही प्रक्रिया ६ एप्रिल रोजी सुरू झाली असून ६ मे ही नोंदणीची अंतिम तारीख होती. ती आता १५ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Application Process & Application Fees For NEET UG 2022

 • एनटीएद्वारे नीट यूजी २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
 • मुखपृष्ठावरच दिलेल्या ‘NEET (UG) 2022 साठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
 • नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर नवीन पेजवर आपल्याला विचारलेले तपशील भरून नोंदणी पूर्ण करावी लागेल.
 • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून उमेदवार अर्ज सबमिट करु शकतील आणि शुल्क भरु शकतील.
 • अर्ज करताना उमेदवारांना १६०० रुपये शुल्क भरावे लागेल.
 • आरक्षित वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे.

PDF जाहिरात – https://bit.ly/3wAxYQU


NEET 2022 Extra Time Will Be Available 

NEET 2022: Students appearing for the National UG and PG exams conducted by the National Testing Agency (NTA) will be given an extra 20 minutes. This year the exam will be conducted on Sunday 17th July 2022 in pen and paper based mode (offline mode). Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडून घेण्यात येणाऱ्या नीट यूजी आणि नीट पीजी परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. यावर्षी नीट परीक्षा रविवार १७ जुलै २०२२ रोजी पेन आणि पेपर आधारित पद्धतीने (ऑफलाइन मोड) घेतली जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • दरवर्षी देशात अनेक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतल्या जातात.
 • एनटीएद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय (Medical), इंजिनीअरिंग (Engineering) अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
 • वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार नीट परीक्षेला (NEET Exam 2022) बसतात. ही परीक्षा खूप कठीण असते.
 • वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी (Medical Course) या परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना अनेक प्रयत्न करावे लागतात.
 • एनटीएकडून (National Testing Agency, NTA) नीट यूजी परीक्षा (NEET UG Exam) आणि नीट पीजी (NEET PG Exam) अशा दोन्ही परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान नीट यूजी २०२२ (NEET UG Exam 2022) परीक्षेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे.
 • नीट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या मागणीनुसार परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना २० मिनिटे अतिरिक्त वेळ 

 • नीट यूजी २०२२ च्या परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना २० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.
 • त्यानुसार, यावर्षी विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षेसाठी एकूण ३ तास २० मिनिटांचा वेळ दिला जाईल.
 • २०२१ मध्ये नीट परीक्षेत २०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी १८० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची होती.
 • दरम्यान विद्यार्थ्यांनी एनटीएला पत्र लिहून वगळलेल्या प्रश्नांचाही अभ्यास करावा लागतो, असा युक्तिवाद केला होता.

जुलैमध्ये होणार परीक्षा 

NEET UG 2022 will be held on July 17, 2022. You can apply for Nit 2022 till 6.50 pm on 6th May 2022. Also, application fee can be collected till 11.50 pm on 7th May. Students who pass this will get the opportunity to do MBBS from reputed institutes in the country. Extending the exam time will be a great relief to the students and they will be able to understand all the questions well and write their answers.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड