केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे लवकरच कार्यरत होणान्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या (Navi Mumbai Airport Recruitment 2025) रक्षणासाठी २,८०० हन अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कर्मचाऱ्यांची एकत्रित बळ मंजूर केले आहे. यात नवी मुंबई विमानतळासाठी १,८४० पदांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १,०३० पदे मंजूर केली आहेत. या विमानतळांनी दुसरा टप्पा पूर्ण केल्यावर या दलाची ताकद वाढवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सुरक्षा युनिट्स, ज्याचे नेतृत्व उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी करतील, दोन्ही सुविधांमध्ये सुरक्षा गॅझेट आणि इतर लॉजिस्टिक स्थापित करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार झाल्यानंतर ते कार्यभार स्वीकारतील, असे सुचित करण्यात आले. अदानी समुहाने विकसित केलेला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाईल आणि त्याची एकूण क्षमता वार्षिक ९ कोटी प्रवाशांची असेल. पहिल्या टप्प्यात वर्षाला २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई महानगर प्रदे- शात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या विमानतळावरील व्यावसायिक कामकाज मार्च-एप्रिल २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान सुखरुप उतरविले गेले आहे. १७ एप्रिल २०२५ पासून नियमित वाहतूक सेवा सुरु होणार आहे. तर जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा कार्यान्वित केली जाणार आहे. या विमानतळामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसराचा मोठा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















