खुशखबर! – नवी मुंबई विमानतळासाठी CISF ची १८४० पदे मंजूर, नवीन पदभरती लवकरच!

Navi Mumbai Airport Recruitment 2025

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे लवकरच कार्यरत होणान्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या (Navi Mumbai Airport Recruitment 2025)  रक्षणासाठी २,८०० हन अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कर्मचाऱ्यांची एकत्रित बळ मंजूर केले आहे. यात नवी मुंबई विमानतळासाठी १,८४० पदांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १,०३० पदे मंजूर केली आहेत. या विमानतळांनी दुसरा टप्पा पूर्ण केल्यावर या दलाची ताकद वाढवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Navi Mumbai Airport Bharti 2025

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुरक्षा युनिट्स, ज्याचे नेतृत्व उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी करतील, दोन्ही सुविधांमध्ये सुरक्षा गॅझेट आणि इतर लॉजिस्टिक स्थापित करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार झाल्यानंतर ते कार्यभार स्वीकारतील, असे सुचित करण्यात आले. अदानी समुहाने विकसित केलेला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाईल आणि त्याची एकूण क्षमता वार्षिक ९ कोटी प्रवाशांची असेल. पहिल्या टप्प्यात वर्षाला २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई महानगर प्रदे- शात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या विमानतळावरील व्यावसायिक कामकाज मार्च-एप्रिल २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान सुखरुप उतरविले गेले आहे. १७ एप्रिल २०२५ पासून नियमित वाहतूक सेवा सुरु होणार आहे. तर जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा कार्यान्वित केली जाणार आहे. या विमानतळामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसराचा मोठा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड