Navi Mumbai Airport International Bharti 2026
नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Navi Mumbai International Airport) स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मितीकरण्यात येणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे आणि उलवे पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत 108 पदांची भर्ती करण्यात येणार असून साधारण 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीमुळे पोलीस यंत्रणेवर सुरक्षेच्या दृष्टीने ताण येणार आहे. हे लक्षात घेवून सरकारने विमानतळासाठी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. यामुळे विमानतळावरील सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. सदर विमानतळाचे कामकाज 5 फेज मध्ये पूर्ण होणार आहे. संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 02 रनवे, 01 कार्गो ट्रक टर्मिनल आणि इतर संरक्षण व नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधीत आस्थापना कार्यान्वित होणार आहेत.
विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर 360 कोटी मेट्रिक टन प्रती वर्षी मालाची ने आण होणार आहे. प्रती वर्ष 9 कोटी प्रवाशी विमानतळाचा वापर करणार आहेत. परिणामी इतक्या मोठ्या प्रवासी व मालवाहतूकीच्या सुरक्षितेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्वतंत्र पोलीस ठाणे तात्काळ निर्माण करणे आवश्यक होते. यामुळे अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे व उलवे पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन, नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्मिती केली आहे.
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात विविध संवर्गातील एकूण 108 नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील.
- पोलीस निरीक्षक – 02
- सहायक पोलीस निरीक्षक- 03
- पोलीस उप निरीक्षक – 06
- सहायक पोलीस उपनिरीक्षक- 06
- पोलीस हवालदार – 27
- पोलीस शिपाई – 42
- महिला पोलीस शिपाई – 19
- चालक पोलीस शिपाई – 03
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन होणार आहे.उद्घाटनानंतर लवकरच या विमानतळावरून आंतरराष्टीय उड्डाणे सुरू होणार आहेत, ज्यामध्ये दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना सेवा देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी मुंबई विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू करण्याची घोषणा होत असताना, या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे. नोकऱ्या नसल्याने प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आचारसंहितेचे कारण पुढे करून भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या लक्ष्याला स्थगिती दिली जाते, मात्र विमान कंपन्यांचे उद्घाटन सोहळे, जाहिरातबाजी आणि उड्डाणांची तयारी यांना आचारसंहिता लागू होत नाही, हा सरळसरळ दुटप्पीपणा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या असतील, तर त्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायही कायमस्वरुपीच मिळाले पाहिजेत. खासगी एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार भरती करून
भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी एक संतप्त सवाल उपस्थित केला आहे, “ज्यांच्या संघर्षांमुळे नवी मुंबई उभी राहिली, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव भूमिपुत्रांकडून प्रस्तावित आहे. नवी मुंबई विमानतळाला कधी लागणार?” उद्घाटन झाले, उड्डाणे सुरू होत आहेत. मात्र नामकरणाच्या बाबतीत शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
नामकरणासाठीची अस्मितेची लढाई आचारसंहिता संपल्यानंतर अधिक तीव्रतेने उभी राहीलच. मात्र किमान नवी मुंबई विमानतळावरील कामगार भरतीत तरी भूमिपुत्रांची फसवणूक होऊ नये, यासाठी भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे” ही मोहीम तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता विमानतळ सुरु झाल्याने प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचा विश्वासघात झाला आहे.
Navi Mumbai Airport International Bharti 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या ८ ऑक्टोबरला लोकार्पण केले जाणार आहे. या विमानतळाच्या उद्घाटनामुळे लॉजिस्टिक्स, आयटी आणि रियल इस्टेटसह विविध क्षेत्रांत २ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे विमानतळ लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसह मुंबईला जगातील सर्वात प्रतिष्ठित जुळ्या विमानतळ शहरांपैकी एक बनवण्यासाठी सज्ज आहे. अंदाजे १,१६० हेक्टरमध्ये पसरलेले, एनएमआयए अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज (७४ टक्के) आणि सिडको (२६ टक्के) यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत विकसित केले जात आहे. एक धावपट्टी आणि टर्मिनलसह या विमानतळावर दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक होईल. पूर्ण क्षमतेने, येथे चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील, ज्यामुळे मुंबईची सीएसएमआयएसह एकत्रित क्षमता दरवर्षी १५.५ कोटी प्रवाशांपर्यंत वाढेल. देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रचंड तेजी येत आहे. २०१४ मध्ये ७४ विमानतळ होते. २०२५ मध्ये त्यांची संख्या आता १६३ पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. २०३० पर्यंत प्रवासी वाहतूक दुप्पट होऊन ५०० दशलक्ष होईल, तर मालवाहतुकीचे प्रमाण तिप्पट होऊन १ कोटी टन होईल, ज्यामुळे भारत जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थापित होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई जगातील दोन प्रमुख विमानतळ असलेल्या निवडक शहरांमध्ये सामील होईल. अशा शहरांमध्ये लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो यांचा समावेश आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज (७४%) आणि सिडको (२६%) यांच्या भागीदारीत विकसित होत असलेले हे विमानतळ सुमारे १,१६० हेक्टर परिसरात उभारले गेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे केंद्र मुंबईला लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोप्रमाणे जुळ्या विमानतळ शहरांच्या यादीत स्थान मिळवून देईल. पहिल्या टप्प्यात या विमानतळावर एक धावपट्टी आणि एक प्रवासी टर्मिनल सुरू होणार असून, दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असेल. पुढील टप्प्यांमध्ये चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांसह एकूण क्षमता १५.५ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवली जाणार आहे.
देशातील विमानवाहतूक क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, २०१४ मध्ये ७४ असलेली विमानतळांची संख्या २०२५ पर्यंत १६३ वर पोहोचेल, असा अंदाज आहे. तसेच, २०३० पर्यंत प्रवासी वाहतूक दुप्पट होऊन ५० कोटींवर, तर मालवाहतूक तिप्पट वाढून १ कोटी टनांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळाच्या कार्यान्वयनानंतर मुंबई जगातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले शहर म्हणून ओळखले जाईल — ही यादी सध्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो सारख्या शहरांपुरतीच मर्यादित आहे.
Navi Mumbai Airport International Bharti 2025
Navi Mumbai Airport International Bharti 2025: Navi Mumbai Airport International has published recruitment for the posts of “Porters, Drivers, Operators, Technicians, Customer Service Agents, Assistant Managers, Duty Managers, Shift Incharges, Supervisors”. There are various vacancies available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply through e-mail before last date. The Last Date of application is 21st of August 2025. For more details about Navi Mumbai Airport International Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतर्गत “पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सींस एजंट्स, असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे.
- पदाचे नाव – पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सींस एजंट्स, असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –नवी मुंबई
- वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
Educational Qualification For Navi Mumbai Airport International 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोर्टर्स | किमान ९वी पास |
| ड्रायव्हर्स | किमान १० वी पास वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग लाइसन्स |
| ऑपरेटर्स | विमानतळावर हेवी ड्युटी ग्राउंड हैंडलिंग उपकरण चालविण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक |
| टेक्निशियन्स | टेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या देखभालीचा अनुभव अनिवार्य, डिप्लोमा धारक व इंजिनिअर्सना प्राधान्य |
| कस्टमर सींस एजंट्स | Navitaire (GoNow), Altia, SITA, Sabre यासारख्या दोन किंवा अधिक सिस्टिम्सचा अनुभव |
| असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर | * सुरक्षा, सेफ्टी आणि क्वालिटी ऑडिटची सखोल माहिती * ग्राहक एअरलाइन्सच्या ऑडिट टीमसोबत कामाचा अनुभव * SOPs, मॅनुअल्स, प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याची क्षमता * इतर विमानतळांवरील प्रशिक्षण टीमचे नेतृत्त्व करण्याची क्षमता |
How To Apply For Navi Mumbai Airport International Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Navi Mumbai Airport International Job 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ghux1 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















