ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. मात्र, राज्यातील याच ३४ ‘मिनी मंत्रालयांमधील’ प्रशासकीय यंत्रणा सध्या मनुष्यबळाच्या मोठ्या तुटवडाचा सामना करत आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून विविध संवर्गातील तब्बल १५ हजार २५६ जागा रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा वेग मंदवला असून, राज्य सरकारने ही रिक्त पद भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण जनतेचा थेट संबंध थेट जिल्हा परिषदेच्या कामकाजाशी येतो. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, कृषी, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण अशा अनेक महत्त्वाच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते. पंचायत राज व्यवस्थेतील ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील २१ संवर्गासाठी ७० पैकी ५५ हजार १६९ पदे भरली असून, १५ हजार २५६ पदे रिक्त असल्याने एकाच कर्मचाऱ्यावर दोन ते तीन विभागांचा अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेवक व तांत्रिक कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने रुग्णांवर मोठा ताण पडत आहे. दुसरीकडे, ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे गावापातळीवरील ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज आणि विकासनिधीचा विनियोग प्रभावित होत आहे. कर्मचारांच्या कमतरतेचा फटकासमोर आलेल्या राज्यात आकडेवारीनुसार, जळगाव आणि पुणे जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक पदे रिक्त आहेत. मोठे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येचा ताण असलेल्या या जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मोठा फटका बसत आहे. यात प्रामुख्याने आरोग्य आणि ग्रामपंचायत संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिकामी आहेत. भरती प्रक्रियेमुळे विकासाला मिळणार गतीगेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे जिल्हा परिषदांतील भरती रडखली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता रिक्त पद भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना रोजगाराची संधी तर मिळेलच, शिवाय ही १५, २५६ पदे भरल्यानंतर राज्यातील ‘मिनी मंत्रालयांचा कारभार पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होऊन ग्रामीण विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















