नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा!!
National Recruitment Agency
National Recruitment Agency : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा
National Recruitment Agency : करोना संकटानंतर देशात अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ला (NRA) हिरवा कंदील देण्यात आलाय.
केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ (NRA) ला हिरवा कंदील देण्यात आलाय. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिलीय.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोकरी मिळवण्यासाठी सध्या तरुणांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात. यासाठी २० एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत अशा वेळी प्रत्येक एजन्सीसाठी वेगळी परीक्षा देण्यासाठी इच्छूक तरुणांना अनेक ठिकाणी जावं लागतं. परंतु, आता मात्र नॅशनल रिक्रूटमेन्ट एजन्सीद्वारे (राष्ट्रीय भरती परीक्षा) कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सामान्य पात्रता परीक्षा) घेण्यात येईल. याचा फायदा नोकरीच्या शोधात असलेल्या करोडो तरुणांना होईल, असंही जावडेकर यांनी म्हटलंय.
गेल्या कित्येक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी केली जात होती. परंतु, हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. आता मात्र नॅशन रिक्रूटमेन्ट एजन्सी गठीत करण्यात आल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकेल तसेच त्यांचे पैसेही वाचतील, असं म्हणत त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केलंय.
‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’
– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे कॉमन एन्टरन्स टेस्ट, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड आणि आयबीपीएस द्वारे आयोजित टीयर १ परीक्षा एकाच वेळी घेता येतील. केंद्र सरकारमध्ये (NRA3 & 4) Gf-B आणि C पदांसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल
– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ मुळे निवड प्रक्रियेचा कालावधीही कमी होऊ शकेल.
– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे १००० हून अधिक केंद्रांवर सीईटी आयोजित केली जाऊ शकेल.
– प्रत्येक वर्षात दोन वेळा सीईटी आयोजित केली जाईल
– सीईटी मध्ये ‘मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह’ प्रश्न असतील अर्थात दिलेल्या अनेक पर्यायांमधून एका उत्तराची निवड परीक्षार्थीला करावी लागेल.
– या सीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीचा उपयोग राज्य सरकारलाही करता येईल.
– हे बदल भरती, निवड आणि नोकरी प्रक्रियेत सहजता आणि समाजातील काही वर्गांसाठी मोठे फायदेशीर ठरतील
– सीईटीची मेरिट लिस्ट तीन वर्षांपर्यंत मान्य राहील. या दरम्यान उमेदवारी आपली योग्यता आणि आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सहज अर्ज करू शकतील
सरकारी भरती परीक्षा कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया आणि शुल्क वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा काही उणिवा राहून जातात. ग्रामीण महिला आणि दिव्यांगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’मुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतील, असा विश्वासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय.
सोर्स : न. टा.
I need a job please job do
Sir hi cet ce form kadhi pasun calu hotil
How Manny salary in month
पगार किती दर महिना
B.sc b.ed science teacher job