Nashik Fire Brigade Bharti 2026
महापालिकेच्या अग्निशमन विभागातील भरती आता वादात सापडली आहे. या भरतीप्रक्रियेत परीक्षेत उत्तीर्ण होऊनदेखील शेकडो उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई या शासन मान्यताप्राप्त संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांनी दिला आहे.
महापालिकेत २४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तांत्रिक संवर्गातील ११४, तर अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ मार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीसाठी परीक्षादेखील घेण्यात आली. परंतु, अग्निशमन विभागाच्या भरतीप्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शेकडो उमेदवारांना या भरतीप्रक्रियेतून अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमधील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, परमानंद कॉलेज, सह्याद्री कॉलेज, ग्लोबल कॉलेजकडून अनेक उमेदवारांनी फायरमनचा अभ्यासक्रम पूर्ण करीत या भरतीप्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु, या संस्थांकडून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई ही फायरमनच्या अभ्यासक्रमाकरिता एकमेव शासन मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेकडील अभ्यासक्रम केलेले उमेदवारच पात्र असल्याने अन्य अपात्र ठरविण्यात आले आहेत.
Nashik Fire Brigade Bharti 2026
वाचा येथील शासन निर्णय दि. ०५.१२.२०२५ अन्वये नाशिक महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील अग्निशामक (फायरमन) या पदाची शैक्षणिक अर्हता निश्चित करण्याबाबत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार वाचा येथील शासन निर्णयातील आवश्यक शैक्षणिक अर्हता मध्ये (ii) शैक्षणिक पात्रता मधील अग्निशामक प्रशिक्षक पाठ्यक्रम यांची व्याख्या खालील प्रमाणे आहे. “अग्निशामक पाठ्यक्रम” याचा अर्थ, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी (एमएफएसए), मुंबई किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असा आहे किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्याकडून मान्यताप्राप्त खाजगी संस्थेकडून सहा महिन्याचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असलेला.” या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०११९१३४१२४८१२५ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
: : PRIVIOUS UPDATES : :
Nashik Fire Brigade Bharti 2026: Nashik Fire Brigade has published the notification for the Post of “Driver, Fireman”. There are 186 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for application is 01st of December 2025 16th December 2025. For more details about Nashik Fire Brigade Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभाग अंतर्गत “चालक, फायरमन” पदाची एकूण 186 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
०१ डिसेंबर २०२५१६ डिसेंबर २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – चालक, फायरमन
- पदसंख्या – 186 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.nmc.gov.in/
Nashik Fire Brigade Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| चालक | 36 |
| फायरमन | 150 |
Educational Qualification Details For Nashik Fire Brigade Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| चालक | १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक २) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठयक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. ३) वाहनचालक या पदावर किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. ४) वैध जडवाहन चालविण्यासाठी परवाना असणे आवश्यक ५) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहीणे, वाचणे व बोलणे) |
| फायरमन | १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक २) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठयक्रम पुर्ण केलेला असावा. ३) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहीणे, वाचणे व बोलणे) |
Salary Details For Nashik Fire Brigade Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| चालक | S-7 Rs. 21700/- to Rs. 69100/- |
| फायरमन | S-6 Rs. 19900/- to Rs. 63200/- |
How To Apply For Nashik Fire Brigade Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित लिंक वर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Fire Brigade Bharti 2025 | |
| 📑 शुद्धिपत्रक | https://shorturl.at/oaobM |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/wuVEb |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ycbft |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.nmc.gov.in/ |
The Nashik Municipal Corporation’s fire department is currently facing a major disaster of Fire cases. Since hundreds of approved posts are still vacant, there is a possibility that the efficiency of the fire department will decrease significantly in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela for Nashik Fire Brigade Bharti 2025. Therefore, the Municipal Corporation has demanded immediate recruitment to the vacant posts from the government. This proposal has been sent to the government with the signature of the Municipal Commissioner two days ago. The government has approved a total of 529 posts for the Municipal Corporation’s fire department. However, currently only 101 employees are actually working and as many as 428 posts are vacant. This has created stress on the entire department. Against this backdrop, a demand has been made to the government to immediately recruit 246 officers and employees. This proposed recruitment includes 3 station masters, 9 sub-officers, 30 drivers and 204 firemen. The delay in this recruitment for the past one and a half years has seriously affected the Nashik Municipal Corporation’s fire department. Considering the huge expansion of the city, the increasing construction of high-rise buildings, the increasing cases of fire and accidents in industrial areas and the management of the crowd of lakhs during the upcoming Simhastha period, it is essential that the force has sufficient manpower. The Municipal Corporation had earlier also demanded this recruitment from the government. However, no concrete decision has been taken yet. Therefore, it has been informed that the Chief Minister and the Principal Secretary of the state are immediately following up on this recruitment. For the safety of the citizens and in terms of disaster management, this recruitment needs to be done on time Nashik Fire Brigade recruitment 2025.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 

















2 thoughts on “नाशिक अग्निशमन भरतीत ठरले शेकडो उमेदवार अपात्र!! | Nashik Fire Brigade Bharti 2026”
how can I apply for this post and what education is required for the same ???
Nashik Fire Brigade Bharti 2025