खुशखबर !! महाराष्ट्रातील युवतींना सुवर्णसंधी, सैनिकी सेवापूर्व शिक्षणासाठी अर्ज सुरु | Nashik Female Military Pre-Service Training Institute Information
Nashik Girl Military Pre-Service Training Institute Admission 2024
Girls SPI Nashik Admission 2024
Nashik Girl Military Pre-Service Training Institute Admission 2024 – In order to increase the maximum number of young women from Maharashtra to join the defense service as officers, the Pre-Service Education Institute for Girls has been established at Nashik by the Government of Maharashtra. An Online application has been invited by Nashik SPI for the first batch. Girls students from Maharashtra Who wish to Become Army Officers must apply for Nashik Mahila SPI Admission 2024 till 29 February 2024. More information about Nashik Girl Military Pre-Service Training Institute Admission 2024, Girls SPI Nashik Admission 2024are as given below :
मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवतींनी जास्तीत जास्त संख्येने जावे, यासाठी नाशिक येथे मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. प्रथम तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख29 फेब्रुवारी 2024 आहे…अधिक माहिती व अर्ज प्रक्रिया खाली बघा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना संधी; ऑनलाईन अर्ज करा | SPI Aurangabad Admission Form 2023-24
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती! – Nashik Military Pre-Service Free Training 2023-24
Educational Qualification for Nashik SPI Girls Admission 2024
पात्रता :-
(अ) अविवाहित (मुलगी),
(ब) महाराष्ट्र / बेळगाव / कारवार / बिदर येथील अधिवासी (Domicile),
(क) जन्मतारीख ०१ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ च्या दरम्यान,
(ड) मार्च/एप्रिल/ मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारी.
(इ) जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावी.
Physical Criteria For Nashik SPI Womens Bharti 2024
शारीरिक पात्रता : सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावी. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावी. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५२ सें.मी. वजन ४२.५ कि.ग्रा. रातांधळी किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power).
Application Fees For Nashik SPI Mahila Bharti Application Form 2024
परीक्षा शुल्क रुपये ४५०/- | ( परत न करता येण्याजोगे ) ऑनलाइन फक्त क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड / नेटबँकिंग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
Nashik Female Military Pre-Service Training Institute Information
Nashik Female Military Pre-Service Training Institute Information – Great News For Female Candidates who wants to serve Country. Military pre-service education institute for girls to be implemented in Nashik Maharashtra. The first batch of 30 girls will start from June. The capacity of the center will double in the next year. To increase the representation of girls in the armed forces, the state government has approved the establishment of a pre-service education institute for girls in Nashik. This institute will be functioning under the pre-service education institute for boys at Aurangabad. The training will be started from June 2023.
Aurangabad’s Pre-Service Education Institute helped in increasing the number of Marathi military officers in the Indian Armed Forces through the NDA. At present, two batches of total 60 girls have been approved in the ex-servicemen’s boys’ hostel building here, the first batch of 30 girls from June 2023 and the second batch of 30 girls the following year.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध कऱण्यात आला असून सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबद्दल बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले. या निर्णयासाठी मंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nashik Female Military Pre-Service Training Institute Admission 2023 | Female Military Pre-Service Training Institute Information
केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा या हेतूने, मंत्री श्री. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा कार्यभार असताना नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था असावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
सशस्त्र दलात राज्यातील मुलींचे प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी राज्य सरकारने नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे. औरंगाबाद येथील मुलांच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असेल. प्रशिक्षणास जून २०२३ पासून ३० मुलींच्या पहिल्या तुकडीने सुरुवात केली जाणार असून, दुप्पट म्हणजे ६० वर नेण्यात येणार आहे.
Maharashtra Women Sashastra Seema Bal Training Institute
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन – 2022 काळात या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही शासन स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेसाठी आवश्यक असलेला एक कोटी 17 लाख 65 हजार रुपये निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सन 2021 मध्ये घेतला. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी भारतातील पहिली मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे मंजूर करण्यात आली आहे. जून, 2023 पासून ही प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ राज्यातील मुलींनी घ्यावा. या संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी ३० व द्वितीय वर्षासाठी ३० विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल. या विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात येणार असून पोलिस अकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
Table of Contents
Nashik Female Military Details
Result, Interview Time Table Out
Aamchi email id band zali aahe aamhala hall ticket cha password yet nahi aahe mg aata aamhala hall ticket kuthe milel plz help