Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagpur University Exam: उन्हाळी परीक्षा 29 जूनपासून

Nagpur University Exam

Nagpur University Exam: The administration has finally decided on the summer examinations for the degree courses of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University. The summer exams will start from June 29.

उन्हाळी परीक्षा 29 जूनपासून. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांबाबत अखेर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 29 जूनपासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सहावे सत्र, चार वर्षीय अभ्यासक्रमातील आठवे आणि दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील चौथे सत्राची परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरले आहे.

Nagpur University Exam


Nagpur University Winter Exams

Nagpur University Exam  : Nagpur University’s winter exams have been postponed again. Postponed exams include first semester exams for BCA, BSc, BARC, BBA, BCOSTEC, BCCA, BA, BSW, BALLB, BE, BTech, BPharm, BHMCT as well as three and five-year LLBs.

Nagpur University: हिवाळी परीक्षा पुन्हा लांबणीवर. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांमध्ये बीसीए, बीएस्सी, बीआर्क, बीबीए, बीकॉसटेक, बीसीसीए, बीए, बीएसडब्ल्यू, बीएएलएलबी, बीई, बीटेक, बीफार्म, बीएचएमसीटी तसेच तीन आणि पाच वर्षांचे एलएलबी यांच्या प्रथम सत्र परीक्षांचा समावेश आहे.

हिवाळी २०२०च्या ऑनलाइन परीक्षांमध्ये काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नव्हते. अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. तसेच त्याचेही वेळापत्रक घोषित केले जाईल, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.


Nagpur University: पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर 

Nagpur University Exam  : Nagpur University had instructed all colleges to conduct post-graduate first-year examinations at the college level. The exams were scheduled to be held between May 5 and May 20. Now, these exams have been postponed.

Nagpur University: पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर. पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा कॉलेजस्तरावर घेण्याच्या सूचना नागपूर विद्यापीठाने सर्व कॉलेजांना केल्या होत्या. ५ मे ते २० मे दरम्यान या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा घेण्यास कॉलेजांचा तीव्र विरोध होता… आता या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

करोनासाथीमुळे त्या आता किमान एक महिना पुढे ढकलण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्यातही अडचणी येत होत्या. वर्धा जिल्ह्यात ८ ते १३ मे दरम्यान कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याही अनेक अडचणी आहेत. आता अर्ज भरण्याच्या मुदतीतही वाढ होणार आहे


Nagpur University Exam: हिवाळी प्रथम सत्र 2020 च्या परीक्षा रद्द

Nagpur University Exam  : Winter 2020 examinations of the first session of Nagpur University have been canceled. The decision was made due to a lockdown imposed in Coronation.

Nagpur University: हिवाळी प्रथम सत्र 2020 च्या परीक्षा रद्द – नागपूर विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या हिवाळी २०२० परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. करोनास्थितीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी २०२० च्या प्रथम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखांबाबत नंतर कळविले जाणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.  ‘रद्द केलेल्या सर्व परीक्षा या फक्त प्रथम सत्राच्या आहेत.


नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार

Nagpur University Exam  : Nagpur University exams will be held online – राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आले होते. परीक्षा कशा घ्यायचा, याचा निर्णय विद्यापीठांना घ्यायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर विद्यापीठाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने विद्यापीठाचा कशा पद्धतीने विकास करता येईल व किती निधीची आवश्यकता लागेल यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हेदेखील त्या समितीत असतील. शतकपूर्ती वर्षादरम्यान शासनाकडून विद्यापीठाला नBFधी देण्यात येईल व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह आ. नागो गाणार, आ. समीर मेघे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, आ. अभिजीत वंजारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे, सीईटी आयुक्त डॉ. चिंतामण जोशी, डॉ. शालिनी इंगोले, उपसचिव सतीश तिडके, अजित बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

दीड हजाराहून अधिक तक्रारींचे निवारण

उच्च व तंत्र मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमादरम्यान २ हजार २७२ प्रलंबित तक्रारींपैकी १ हजार ६१७ तक्रारींचे निवारण करण्यात आले. याची टक्केवारी ७१ टक्के इतकी होती. यात शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचा समावेश होता. देशपांडे सभागृहात नोंदणी करून व ऑनलाईन पद्धतीने निवेदन स्वीकारण्यात आली होती. टोकन पद्धतीने तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये दोन नियुक्ती आदेश देण्यात आले. ३४२ प्रकरणे प्रलंबित असून ३०९ प्रकरणांत त्रुटी दिसून आल्या.

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा

कार्यक्रमादरम्यान ‘कोरोना’संदर्भातील कुठलीही खबरदारी दिसून आली नाही. अनेक जण बिना मास्कचे आले होते. मंचावरदेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला होता. अनेक आमदार, अधिकारी एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. शिवाय संघटनांचे प्रतिनिधी घोळक्यानेच मंत्र्यांशी संवाद साधताना दिसून आले. पत्रपरिषदेच्या ठिकाणी तर पत्रकारांपेक्षा इतरांची अक्षरश: दाटीवाटीने गर्दी झाली होती. एकाही अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्याने अशा लोकांना टोकले नाही. शिक्षणाशी संबंधित विभागाच्या कार्यक्रमात असा प्रकार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सोर्स : लोकमत


Nagpur University Exam : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत…

Nagpur University Exam: Nagpur University Exam Postponed: राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

करोनाकाळात अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुरुवातीपासून कमालीचा गोंधळ सुरू आहे. परीक्षा नकोच अशी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी सुरू करावी लागली. परीक्षा बव्हंशी ऑनलाइन घेण्याचे ठरले. ती तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यामुळे परीक्षेची तयारी प्रभावित झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र यातून तोडगा निघाला नाही. गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. अध्यादेश निघत नाही तोवर काम नाही, अशी कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. कुलगुरूंनी स्थानिक पातळीवरही परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत प्रयत्न केले. या प्रयत्नांनाही यश आले नाही.

संपामुळे परीक्षेचे महत्त्वपूर्ण काम आधीच पाच दिवसांपासून रखडून आहे. त्यामुळे तूर्त परीक्षा घेणे अशक्य असल्याचे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. ‘परीक्षेच्या पुढील तारखेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही’, असे नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

मुंबई, गडचिरोली विद्यापीठ ठाम

गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ५ ऑक्टोबरपासून आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सध्या झालेला नाही. आम्ही ठरल्यानुसार परीक्षा घेण्यावर ठाम आहोत, असे कुलसचिव ईश्वर मोहुर्ले यांनी सांगितले. तर, ‘मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परीक्षा या कॉलेज स्तरावर होत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आंदोलनाचा त्यावर फरक पडणार नाही. या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील’, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र लेखणीबंद आंदोलन सुरूच राहिले तर निकाल रखडण्याची चिन्हे आहेत.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Umesh says

    MSW first sem cha exam from online vr bharu shate k

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड