Mumbai University Winter 2024 Timetable – मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विविध परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षांमध्ये चारही विद्याशाखांतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा समावेश आहे. सर्वांत आधी, २३ ऑक्टोबरपासून वाणिज्य (कॉमर्स) आणि व्यवस्थापन या विभागांतर्गत परीक्षा होतील. त्यानंतर पुढील परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली. विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र पाचच्या परीक्षा २३ ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्याशिवाय तृतीय वर्ष बीए, एलएलबी, कम्प्युटर सायन्स, जैवतंत्रज्ञान, आयटी, फॉरेन्सिक, डेटा सायन्स आदी विषयांच्या परीक्षाही होणार आहेत. इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Mumbai TYBCom, BA, BSC, BCA, BE, All Other Timetables Update & latest Updates

विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात
आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही जारी केला असल्याचे रौंदळे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















