निवडणुकी मुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक! | Mumbai University Exams

Mumbai University Exams

Mumbai University Exams 

विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांना मतदानापासूनच वंचित राहावे लागले असते. तसेच मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे मतदान गावी असल्याने त्यांना या कालावधीत प्रवास करून गावी जाणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्याबाबतचे पत्र युवा सेनेने (शिंदे गट) विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे याना दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • १९ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा ३० नोव्हेंबरला घेण्यात येईल.
  • २० नोव्हेंबरच्या परीक्षा ७ डिसेंबरला घेतल्या जातील.

 

२१ नोव्हेंबरचा पेपरही नंतर घ्या – ११ ते २१ नोव्हेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याची १ मागणी केली होती. मात्र, विद्यापीठाने केवळ १९ आणि २० नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली आहे. परंतु, मुंबईपासून गाव दूर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २० गाव दूर अर तारखेला परीक्षेसाठी पोहोचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने २१ नोव्हेंबरची परीक्षाही पुढे डकलावी, अशी मागणी युवा सेनेचे उपसचिव अॅड. सचिन पवार यांनी केली आहे.

 


मुंबईची लोकल म्हणून अवघ्या मुंबईकरांची लाईफ लाईन. मात्र, याच रेल्वेच्या मध्य रेल्वेने तब्बल ६३ तासाचा मेगा ब्लॉग जाहीर केला आहे. ३० मे २०२४ च्या मध्यरात्रीपासून या महामेगा ब्लॉकची सुरुवात झाली आहे. रेल्वे प्रशासनाने या मेगाब्लॉकची पूर्वसर्च दिली असल्यामुळे अनेक कार्यालयांना आज आणि उद्या सुट्टी देण्याचा, तर काहींना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्यांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आज अधिकृत परिपत्रकाचा माध्यमातून हि घोषणा केली आहे.

मध्य रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी दिनांक ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाताना गैरसोयीचे होऊ शकेल. म्हणून, शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उद्या, शनिवार दिनांक १ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक व बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ ची एक अशा दोन परीक्षा होत्या. मात्र, मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

 


Mumbai University Exams : Mumbai University Winter Session Exams Postponed. The MU new exam date will be declared soon. Further details are as follows:-

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
  • विद्यापीठाअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा देणाऱ्या (Winter Session Exam) विद्यार्थ्यांसाठी ही माहिती महत्वाची आहे.
  • या परीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार होत्या. विद्यार्थ्यांनी या परीक्षांची पूर्णपण तयारी देखील केली होती.
  • पण मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या अपडेटनुसार त्या सर्व परीक्षा (Mumbai University Exam) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मुंबई विद्यापीठ २०२२ च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.
  • २०२२ च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली आहे.

Previous Post –

Mumbai University Exams: Mumbai University’s LLM exam has finally been postponed. The LLM entrance exam was held as soon as it was not over yet, so the students were upset.

LLM परीक्षा लांबणीवर. मुंबई विद्यापीठाची एलएलएमची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. एलएलएमची प्रवेश परीक्षाच अद्याप संपली नसताना लगेच परीक्षा आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थी नाराज होते.

मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या पहिल्या सत्राची परीक्षा १७ मेपासून सुरू होणार आहे. मात्र अजूनही अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपली आहे, असे विद्यापीठाने अधिकृतपणे जाहीर केले नाही. ही प्रक्रिया ७ मे रोजी संपेल, असे वेबसाइटवर दाखविण्यात आले होते. मात्र अद्यापही अर्ज करण्याचा पर्याय खुला आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जही भरून घेण्यात आलेले नाहीत.

एलएलएम प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी पार पडल्यावर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली. यंदा प्रवेश परीक्षा लांबली होती. यामुळे प्रवेशही लांबले होते. पाचव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया कधी संपेल यानंतर सहावी यादी जाहीर होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. यामुळे प्रवेश न मिळालेले आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संभ्रमात आहेत.


Mumbai University Exams: पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षा आजपासून 

Mumbai University Exams:  : The final year examinations of Mumbai University are starting from Thursday. These examinations will be conducted separately by the colleges from 6 to 21 May 2021 as per their schedule.

पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षा आजपासून – मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षा गुरुवारपासून सुरु होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार ६ ते २१ मे २०२१ दरम्यान घेणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परीक्षेस गुरुवार ६ मे पासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात होत आहे.

हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र ५ च्या परीक्षा डिसेंबर – जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परीक्षा मे २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार या परीक्षा होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार ६ ते २१ मे २०२१ दरम्यान घेणार आहेत.


मुंबई विद्यापीठाच्या LLM च्या पहिल्या सत्राची परीक्षा 17 मेपासून!

Mumbai University Exams  : The first-semester examination of LLM of Mumbai University will start from 17th May. Students admitted on April 10 will have to face the exam immediately after one month.

मुंबई विद्यापीठाच्या LLM मच्या पहिल्या सत्राची परीक्षा 17 मेपासून! – मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या पहिल्या सत्राची परीक्षा १७ मेपासून सुरू होणार आहे. १० एप्रिल रोजी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका महिन्यानंतर ताबडतोब परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एका पेपरआड एक सुट्टी द्यावी, अशी मागणी एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिनाही पुरेसा मिळालेला नाही. म्हणून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ७ मे रोजी संपेल असे वेबसाइटवर दाखविण्यात येत आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जही भरून घेण्यात आलेले नाहीत. एलएलएम प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी पार पडल्यावर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली.


Mumbai University : PG परीक्षांसाठी पहिल्यांदाच क्वेश्चन बँक देणार

Mumbai University Exams  : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालयांमधील 2020-21 च्या उन्हाळी परीक्षांच्या आयोजनासंदर्भात विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठ अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांच्या पीजी परीक्षांसाठी पहिल्यांदाच क्वेश्चन बँक देणार आहे. त्याचा वापर करून महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्याव्यात, असे या परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सत्र १ आणि सत्र ३ (बॅकलॉग) परीक्षा २५ मे ते ५ जून २०२१ या कालावधीत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याच अभ्यासक्रमांच्या सत्र २ आणि ४ (नियमित व बॅकलॉग) परीक्षांसाठी परीक्षा विभागाकडून स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात येईल.

या परीक्षांसाठी महाविद्यालयांना Question Bank विद्यापीठाकडून पाठवण्यात येणार आहे. परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे, अशाही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

परिपत्रक – https://bit.ly/3wkpVqy  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड