मुंबई विद्यापीठातर्फे आयडॉल बीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर

Mumbai University Exam Result

MU Idol Result 2021 Details 

Mumbai University Exam Result : The result of the B.COM is announced under the University of Mumbai University. July 2021 was tested. The result of this test has been 94.19 percent. This test was conducted in July 2021.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या आयडॉल विभागाच्या बीकॉमचा निकाल जाहीर झाला आहे. जुलै २०२१ ला ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ९४.१९ टक्के लागला आहे. जुलै २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ वर निकाल पाहू शकतात.

विद्यापीठाने आजपर्यंत उन्हाळी सत्राचे १०७ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ) सत्र ७ आणि ८, बीई (सिव्हिल इंजिनिअरिंग ) सत्र ८, तृतीय वर्ष बीए (आयडॉल) व तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल) असे ५ निकाल जाहीर केले.


Mumbai University Final Year Law Exam Result

Mumbai University Exam Result : Mumbai University has announced the results of examinations for three and five year law courses. The result of this examination has been published on the website of the University http://www.mumresults.in/. Further details are as follows:-

तीन आणि पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे

मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या (Law Faculty) अंतिम वर्षाचे पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र १० व तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या दोन्ही परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र १० या परीक्षेचा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १ हजार ५०२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९८.६२ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ५ हजार १२८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.


TY B.Com Sem VI Result Declared

Mumbai University Exam Result : Mumbai University’s T.Y. The result of BCom has been announced. The examination was conducted online for the sixth semester of the final year of Commerce degree. Further details are as follows:-

मुंबई विद्यापीठाचा टी.वाय. बीकॉमचा निकाल जाहीर झाला आहे. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सहाव्या सत्राची ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. एकूण ६७,९७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी ४९,७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५४ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दरम्यान, मंगळवारी २० जुलै रोजी विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ७४.४४ टक्के लागला. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.


MU 3rd year BMM Session 6 Result

Mumbai University Exam Result : Mumbai University has announced the results of the third year BMM Session 6 examination. The online test was conducted in May 2021 in the wake of the Corona outbreak. Further details are as follows:-

मुंबई विद्यापीठातर्फे तृतीय वर्ष बीएमएम सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ मध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल ९४.९८ टक्के इतका लागला आहे. विद्यापीठाने बीएमएम सोबतच बीएस्सी सत्र ५ आणि बीई (बायोमेडीकल इंजिनिअरिंग) सत्र ७ असे तीन निकाल जाहीर केले आहेत

इथे पाहा निकाल

या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकाल थेट पाहण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आजपर्यंत ५४ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


Mumbai University Exam Result : Mumbai University’s stomach exam results have been announced. The pass percentage of PhD result is 55.85 and the percentage of MPhil exam is 47.53.

Mumbai University Exam : पेट परीक्षेचा निकाल जाहीर – मुंबई विद्यापीठाचा पेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीएचडी निकालाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५५.८५ एवढी असून एमफील परीक्षेची टक्केवारी ४७.५३ एवढी आहे.

विद्यार्थ्यांनी ज्या लिंकवरून परीक्षा दिली होती त्याच लिंकवर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक, युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार.


मुंबई विद्यापीठाचा निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर पाठवावीत

Mumbai University Exam Result : Mumbai University Result Room documents should be sent by email. The University of Mumbai has appealed to the students to scan the documents and send them to the email of the concerned faculty without coming to the actual examination department.

मुंबई विद्यापीठाचा निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर पाठवावीत. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या ईमेलवर पाठवावीत असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात प्रत्यक्ष न येता निकाल कक्षाच्या ५ विद्याशाखेच्या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

विद्याशाखा व त्यांचे ईमेल


मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी सत्र 5 परीक्षेचा निकाल जाहीर

Mumbai University Exam Result : MU LLB Sem 5 Exam Result 2021: डिसेंबर २०२० मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विधी शाखेचा एलएलबी सत्र ५ या परीक्षेचा निकाल शनिवारी २० फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

या परीक्षेत एकूण ४ हजार ७९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३७५ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ४७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४१९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ७४ निकाल जाहीर केले आहेत.

  • RESULT OF LLB SEM V
  • Registered Students : 5,423
  • Appeared Students : 5,375
  • Absent Students : 47
  • Successful Students : 4,798
  • Unsuccessful Students: 419
  • Pass Percentages : 91.95 %

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड