मोटर अपघात दावा न्यायाधिकरण अंतर्गत १२४ पदांची भरती होणार! – Mumbai Motor Accident Claims Tribunal Bharti 2024
Mumbai Motor Accident Claims Tribunal Bharti 2024
Mumbai Motor Accident Claims Tribunal Bharti 2024 – महाराष्ट्र राज्यात मोटार वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील वाढत्या मोटार वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. तथापि त्या प्रमाणात बळी पडलेल्या अपघातग्रस्तांना न्याय देण्याच्या दृष्टीने मोटार अपघातांची न्यायाधिकरणे स्थापन न झाल्यामुळे नुकसान भरपाईच्या खटल्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. राज्यात सध्या मुंबईत ८, नागपूर येथे ४, पुणे येथे १ व ठाणे येथे १ अशी एकूण १४ मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे कार्यरत आहेत. अपघातांचे व दाव्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाढत्या कामकाजासाठी उपलब्ध कर्मचारी वर्ग कमी पडत आहे. त्यामुळे न्यायाधिकरणांचे दैनंदिन न्यायालयीन व प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. त्यास अनुसरुन प्रशासकीय सोयीच्या दृष्टीकोनातून मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई व राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाच्या सद्य:स्थितीतील पदांची फेररचना करून सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इ. प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१३/०७/२०२३ रोजी पार पडलेल्या सन २०२३ मधील ४ थ्या बैठकीमध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई व राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता, उच्चस्तरीय सचिव समितीने सदर कार्यालयासाठी एकूण १२४ नियमित पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे. त्यानुसार विवरणपत्र “अ” येथे दर्शविल्याप्रमाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई व राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयांतील पदांच्या सुधारित आकृतीबंधास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.