सात महिन्यांपासून पगार नसल्याने परिचारिका आर्थिक संकटात! – Mumbai Mahanagar Palika Bharti 2025

Mumbai Mahanagar Palika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Staff Nurse Salary Update

महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील नवनियुक्त कर्मचारी परिचारिकांपैकी बहुतांश परिचारिकांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. पगार मिळविण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय विभाग आणि महापालिका मुख्यालयात चकरा मारूनही त्यांना पगार कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने परिचारिका हतबल झाल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात स्टाफ नर्सच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी ३४ हून अधिक नवनियुक्त परिचारिकांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या समस्येबाबत नोबल नर्सिंग युनियनच्या माध्यमातून परिचारिकांचा एक गट शुक्रवारी महापालिका मुख्यालयात गेला होता. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. युनियनच्या अध्यक्षा कल्पना गजुला म्हणाल्या की, यापूर्वी आचारसंहितेमुळे प्रशासनाने कर्मचारी नसल्याचे कारण दिले होते आणि जानेवारीत ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही अनेकांना पगार मिळू शकलेला नाही. महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारीही वेतनाबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 


 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: आरोग्य केंद्रांमध्ये जून महिन्यात नियुक्त झालेल्या १७८ परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३९ परिचारिकांचे वेतन जानेवारी महिन्यात दिले जाईल, तर उर्वरित ३९ परिचारिकांचे वेतन फेब्रुवारी महिन्यात दिले जाणार आहे. शुक्रवारी आरोग्य विभागातील विविध कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांची कमतरता लक्षात घेऊन प्रशासनाने जून महिन्यात १७८ सहाय्यक परिचारिका प्रसविकांची नियुक्ती केली होती. मात्र, सांकेतांक क्रमांक तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे या परिचारिकांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून रखडले होते. परिणामी, अनेक परिचारिकांना उपासमारीचा सामना करावा लागत होता.

याशिवाय स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अवेक्षक रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे, तसेच संनिरीक्षण विभाग, क्षयरोग विभाग, कुटुंब कल्याण व माता-बाल संगोपन विभागातील प्रलंबित पदभरती यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाऱ्यांनी एफ दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

बैठकीतील निर्णय:

  • १७८ परिचारिकांपैकी १३९ परिचारिकांचे सहा महिन्यांचे थकीत वेतन आणि डिसेंबरचे वेतन जानेवारीत दिले जाईल.
  • उर्वरित ३९ परिचारिकांच्या कागदपत्रांतील अडचणी दूर करून त्यांचे वेतन फेब्रुवारीत देण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले.
  • स्वच्छता निरीक्षक व कनिष्ठ अवेक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे ठरले.
  • ‘ड’ वर्गातील ड्रेसर कर्मचाऱ्यांना संगणकीय कामातून व ‘क’ वर्गातील कर्मचाऱ्यांना औषधनिर्माण विभागातील कामातून मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी बैठकीतील या निर्णयांबाबत माहिती दिली


Mumbai Mahanagar Palika Assistant Commissioners Bharti Update

Mumbai Mahanagar Palika Bharti 2024: मुंबई महापालिकेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मिळालेले सात सहाय्यक आयुक्त प्रत्यक्षात विभाग कार्यालयांमध्ये रुजू होण्यासाठी आणखी महिनाभराचा अवधी लागणार आहे. या सात उमेदवारांना बुधवारी मुंबई महापालिका प्रशासनाने नियुक्ती पत्र दिले आहे. मात्र, त्यांना महिनाभर प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर हे अधिकारी विभागांचा कार्यभार सांभाळणार आहेत. त्यामुळे महापालिकेला आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. जून २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या १६ जागांसाठी जाहिरात दिली होती. मात्र, न्यायालयीन खटल्यांमुळे ही भरती गेली तीन वर्षे होऊच शकली नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या १६ जागांपैकी सहाय्यक आयुक्तांची सात पदे भरण्यासाठी
उमेदवारांची यादी द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले होते. त्यानुसार, आयोगाने सात उमेदवारांची शिफारस यादी नुकतीच जाहीर केली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर या सात उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

रुजू होणारे सात उमेदवार
• दिनेश पल्लेवाड
• नितीन चंद्रप्रताप शुक्ला
• अर्जुन सिदराम क्षीरसागर
• उज्ज्वल यादवराव इंगोले
• योगिता सहदेव कोल्हे
• कुंदन रामसिंग वळवी
• योगेश रणजीतराव देसाई

प्रशिक्षण का ?
मुंबई महापालिकेचा व्याप मोठा आहे. श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प ५० हजार कोटींच्या पुढे आहे. २६ विभाग कार्यालये, शंभरहून अधिक विविध विभाग, एक कोटीच्या आसपास लोकसंख्या, लाखोंच्या संख्येने बाहेरून येणारे चाकरमानी, पाणीपुरवठ्याची गुंतागुंतीची यंत्रणा, रस्त्यांचे जाळे, विविध विकासकामे अशा सर्व बाबींची माहिती या उमेदवारांना मिळावी, यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


Mumbai Mahanagar Palika Nurse Bharti 2024 Update

मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता थेट निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पालिका प्रशासनाने आता यात बदल केला असून २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2024

 

गेल्या चार – पाच वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे अभियंत्यांची भरती करावी या मागणीसाठी अभियंत्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होत नव्हती. गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांच्या एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या तोंडावर या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती व ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नुकतेच पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

 

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अभियंता भरती प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

 


 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेने केईएम, शीव, नायर, आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची अपुरी संख्या लक्षात घेऊन जून महिन्यात ६०० परिचारिकांची कायमस्वरूपी भरती केली होती. मात्र, प्रशासनाने या परिचारिकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे, आणि त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तसेच 

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध असलेल्या परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असे. करोना काळामध्ये हा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला. प्रशासनाने आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून जूनमध्ये विविध रुग्णालयांमध्ये ६०० परिचारिकांची भरती केली. परिणामी, पूर्वी कार्यरत असलेल्या परिचारिकांवरील कामाचा ताण कमी झाला. मात्र मागील चार महिन्यांपासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नव्याने कायमस्वरुपी भरती केलेल्या ६०० परिचारिकांना वेतनच दिलेले नाही. चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे या परिचारिकांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांचा कर्मचारी क्रमांक तयार झाला नसल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले. तसेच पुढील दोन महिने वेतन होईल की नाही याची शाश्वतीही नसल्याचे परिचारिकांकडून सांगण्यात येत आहे. कर्तव्यावर रूजू झाल्यानंतर सलग चार महिने वेतन मिळू न शकल्याने परिचारिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. तसेच पुढील दोन महिने वेतन मिळण्याची शक्यता नसल्याने कौटुंबिक आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या परिचारिकांना पडला आहे.

सलग चार महिने वेतन न मिळाल्याने या परिचारिका संतप्त झाल्या आहेत. कर्मचारी क्रमांक तयार झाला नाही, यात प्रशासनाची चूक असून, त्यासाठी आम्हाला वेठीस का धरले जात आहे, असा प्रश्न परिचारिकांनी उपस्थित केला आहे. या परिचारिकांनी गेले चार महिने वेतन न मिळाल्याची बाब महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने मुबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

अन्यथा पुढील विचार

आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे समस्या मांडण्यात आली आहे. ते याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेतील. ८ ते १० दिवसांमध्ये वेतन देण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुढील विचार करावा लागेल, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिला.


Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतील सुमारे एक हजार २३० कंत्राटी पदे रद्द करण्यात आली असून आता रुग्णालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील आरोग्य सेवेची मदार असलेल्या उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य सेवेचा खेळखंडोबा होण्याची चिन्हे आहेत. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णलये, दवाखान्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असलेली पदे महापालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोग्य सेवेचा भार सांभाळणाऱ्या सुमारे एक हजार २३० डॉक्टर, निम्नवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सेवामुक्त करण्यात आले, तर काही जण लवकरच सेवामुक्त होत आहेत. यामुळे सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यातच आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी केईम, शीव, नायर आणि कूपर या रुग्णालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान चार ते सहा हजार रुग्ण उपचारासाठी येतात.

अपुऱ्या मुष्यबळामुळे आधीच रुग्णसेवेवर प्रचंड ताण पडत होता. त्यातच रद्द करण्यात आलेली कंत्राटी पदे आणि त्यानंतर निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आलेले कर्मचारी यामुळे महानगरपालिकेची आराेग्य सेवा कोलमडण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या कामासाठी केईएम रुग्णालयातील १३०, शीव रुग्णालयातील ८० ते ९० आणि कूपर रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामामध्ये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांबरोबरच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याने आरोग्य सेवेवर अधिकच परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 


Mumbai Mahanagar Palika Bharti 2024: मुंबई महापालिकेतील विविध खात्यांतील विविध संवर्गाची दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेली अंदाजे १,२३० हंगामी पदे खंडित केली जाणार आहेत. यात कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या सुमारे १,१०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील महापालिकेने परिपत्रक काढून माहिती दिलो आहे.

या परिपत्रकामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये मानसिक ताण वाढल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा पगारही थांबवल्याचे समजते. अनेक रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्यापैकी कर्मचाऱ्यांना उद्यापासून किंवा पुढील महिन्यापासून कामावर येऊ नका, असे सांगितले गेले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कराराचेही गेल्या एक ते दोन महिन्यांपासून नूतनीकरण झालेले नाही. यामध्ये अनेक महिला कर्मचारीदेखील आहेत. या सर्व परिस्थितीमुळे त्यांचा आर्थिक आणि मानसिक ताण वाढला आहे.

कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या सुमारे १,१०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे सुमारे ४.९६ कोटी रुपयांचे वेतनही महापालिकेने रखडवले आहे. अशा स्थितीत इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढणार आहे. यामुळे आरोग्य सेवाही कोलमडण्याचे संकट निर्माण झाले आहे. महापालिकेने सर्व मिळून सुमारे १,८४० हंगामी पदेही रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे, दोन महिन्यांपासून पगार नाही! तंत्रज्ञ सुमन यादव यांनी सांगितले की, आमचा करार १४ सप्टेंबरला संपला. त्यानंतर हा करार सहा महिन्यांसाठी वाढवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यासाठी महिनाभर अगोदर आम्हा सर्वांची औपचारिक मुलाखत घेण्यात आली

आम्ही अजूनही काम करत आहोत; मात्र प्रक आता अचानक कामावर घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. ऑगस्टपासून दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. तंत्रज्ञ निखिल घाणेकर म्हणाले, आता आम्हाला घर चालवण्याचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे आम्हा सर्वांची दिवाळी अंधकारमय झाली आहे.

कामाचा ताण वाढणार
पालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय, २७ प्रसूती आणि पाच विशेष रुग्णालयांमध्ये हजारो रुग्ण उपचार घेतात. डॉक्टर- कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्यास आधीच मनुष्यबळाच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या रुग्णालयांतील आरोग्य सेवा अधिक गंभीर बनू शकतात. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सांगितले की, महापालिकेच्या रुग्णालयातील इतर कर्मचारी कामामुळे प्रचंड तणावाखाली आहेत.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भातील बिंदूनामावलीनुसार कागदपत्रे कोकण भवनाच्या कामगार आयुक्तालयात पाठवले आहेत, ती मान्य होईल. ५० टक्के डॉक्टरांची नियुक्ती सिलेक्शन पद्धतीने होईल आणि ५० टक्के डॉक्टर प्रमोशनने येतील. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्या भरतीसाठी त्यांच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी डीएनबीमध्ये जे वरिष्ठ आणि ज्युनियर डॉक्टर कन्सल्टण्ट म्हणून काम करत आहेत, त्यांनाही अपॉइंटमेंट लेटर दिली आहेत. जी हंगामी रिक्त पदे आहेत, ती भरण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. ती लवकरच भरली जातील. डॉ. नीलम अंद्राडे, संचालिका, वैद्यकीय रुग्णालये


Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

येत्या काळात मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरण्याचे ठरवले आहे. लिपिक वर्गातून अंतर्गत भरतीद्वारे ही पदे भरली जातील. फेरीवाल्यांच्या विषयावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारल्यानंतर जून महिन्यात प्रशासनाने मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी पालिकेने वीस महत्त्वाची ठिकाणे निश्चित केली होती. त्यात चर्चगेट, सीएसएमटी परिसर, कुलाबा, दादर स्थानक परिसर, अंधेरी, बोरीवली अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कारवाईवर भर देण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावली असून फेरीवाले पुन्हा दिसू लागले आहेत. मनुष्यबळाअभावी या कारवाईत सातत्य ठेवणे अवघड बनले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षक (परवाना निरीक्षक) पदे भरण्याचे ठरवले आहे. सध्या पालिकेकडे २०७ परवाना निरीक्षक असून त्यात आणखी ११८ परवाना निरीक्षकांची पदे भरली जाणार आहेत. लिपिकांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही पदे भरण्यात येणार आहेत.

 


मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. काही कालावधीपूर्वी ८०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यानंतरची ही आता मोठी भरती आहे. मात्र त्यानंतर नजीकच्या काळात पालिकेत नव्या भरतीची शक्यता नसल्याचे कळते. किमान लिपिक पदांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी तरी भरती दृष्टीक्षेपात नाही. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, अभियांत्रिकी आदी विभागांनी रिक्त पदे भरण्याची मोहीम सुरू केली तरच नव्या भरतीची अपेक्षा आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पालिकेत सध्या ९०० इंजिनिअर्सची कमतरता आहे. दोन वर्षांपूर्वी ‘इंजिनिअर्स डे’च्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल आणि पालिकेतील इंजिनिअर्स संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत रिक्त जागा भरण्याचे आश्वासन चहल यांनी दिले होते. मात्र जागा भरल्या गेल्या नाहीत, असे इंजिनिअर्स संघटनेचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.मुंबई महापालिकेत १२९ खाती असून त्यातील काही खाती अत्यावश्यक सेवेत मोडतात. एक लाख ४५ हजार १११ कर्मचारी पालिकेचा कारभार चालवतात. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व विभाग पालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी मनुष्यबळाची भरती मात्र केलेली नाही.

 


आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार मुंबई महानगर पालिकेत लिपिकांचे कामाचे ओझे खूप वाढले आहे. मराठा आरक्षण सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक कामासाठी मुंबई पालिकेचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत होता. आता विधानसभा आणि नंतर मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीही पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाची सेवा करावी लागणार आहे. आधीच पालिकेत नवी भरती नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. लिपिक संवर्गातील कर्मचारी तर पिचून गेले आहेत. या संवर्गात ४१ टक्के पदे अजून भरलेलीच नाहीत. पालिकेच्या आस्थापनेवर लिपिक संवर्गाची एकूण ५,५६० पदे आहेत. त्यातील फक्त ३,३०० पदे कार्यरत आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त ५९ टक्के पदे भरली आहेत. २,२६० पदे रिक्त आहेत.

सध्या परिस्थितीत, एकूण पदांच्या तुलनेत ४१ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. कर्मचाऱ्यांचे आस्थापनाविषयक प्रश्न, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे देय दावे निकाली काढणे, नागरी सेवा देण्यास विलंब होत आहे.

हे कर्मचारी मानसिक तणावाखाली कर्तव्य पार पाडत आहेत, अशी तक्रार दी म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

फक्त ८०० कर्मचारी पात्र –

१) कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २४ मे २०२३ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार निम्न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून निवड पद्धतीने एकूण १,१७८ पदे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण राखून भरण्याचा निर्णय घेतला.

२) १२ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रकानुसार परीक्षा घेतली. परिपत्रकामध्ये नमूद अटीनुसार ८०० कर्मचारी पात्र ठरवून त्यांची कार्यकारी सहायक पदावर नियुक्ती केली आहे.

गुणांमध्ये शिथिलता आणा-

१) परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक (१२) ११ मधील निकषांनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार आयुक्तांना राहतील, असे नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी निवडीचे निकष शिथिल करावेत. उत्तीर्णतेसाठीची ४५ टक्के गुणांमध्ये शिथिलता आणून कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी युनियनने केली आहे.

 


 

तातडीने पदे भरण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱया मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी 1 लाख 45 हजार कर्मचाऱयांची गरज असताना पालिकेचे फक्त एक लाख कर्मचारी अतिरिक्त कामाचा तणाव झेलत काम करत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे दीड कोटी जनतेला नागरी सेवा पुरवण्याचे काम मुंबई महापालिका अहोरात्र करीत असते. त्यासाठी 129 विविध खाती-विभाग कार्यरत असून त्यातील काही खाती/विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. नागरी सेवा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची 1 लाख 45 हजार 111 इतकी शेडय़ुल्ड पदे निर्माण केली होती. मुंबई शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही. इतकेच नाही तर सेवानिवृत्ती, निधनामुळे रिक्त होणारी कर्मचाऱयांची अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेली राखीव पदे अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे 52 हजार 221 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

 

सेवानिवृत्तीमुळे आणखी ताण वाढणार
महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 2024-25 सालामध्ये मोठय़ा संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहे. त्यामुळेही उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे. कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत कर्मचाऱयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धत रद्द करा, अनेक वर्षे काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, रिक्त पदांसह अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेली पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 


 

मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकांची १९८४ पदे रिक्त असून, उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गातील पाच पदे रिकामी आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत सुरक्षारक्षकांवर आणि अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियन आणि ऑफिसर्स असोसिएशनने केली आहे. 

उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गात १२ पदे असून, त्यापैकी पाच पदे रिक्त आहेत. विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांची १८ पदे असून, त्यापैकी चार पदे, सहायक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ६६ पदांपैकी ५५ पदे रिक्त आहेत, याकडे ऑफिसर्स असोसिएशनने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. सहायक सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता अर्हतेमध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्यावर्षी बैठक झाली होती. या बैठकीत प्रस्तावित अर्हतेस मान्यता देण्यात आली. तरीही रिक्त पदे भरली गेली नाहीत. विभागीय सुरक्षा अधिकारी आणि उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गाची अर्हता प्राप्त करणारे अधिकारी आहेत. त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान म्हणणे आहे.

सुरक्षा रक्षकांना सलग दोन ते तीन पाळ्यांमध्ये राबवून घेतले जात आहे, असे म्युनिसिपल युनियनचे म्हणणे आहे. होत आहे. या अधिकाऱ्यांना स्वतःचे काम सांभाळून आणखी तीन ते चार विभागाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे, असे आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 


 

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनद्वारे मुंबई पालिकेतील १२०० पदांची भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकाद्वारे अभियंता पदाच्या १२०० पदांची भरती प्रक्रिया त्वरित राबवा असे पत्र सादर करण्यात आले आहे. 

BMC Bharti 2024

 

 

कीटक नियंत्रण अधिकारी – कार्यालयाने डेंगी आणि मलेरियासह इतर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार शहरातील झोपडपट्टी भागात डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध घेऊन ती नष्ट केली जाणार आहेत. यासाठी निविदा – काढून कंत्राटी कामगार भरती सुरू – केली आहे. एल विभागात पावसाळ्यात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी (१४२ दिवस) कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार आहे.

 


मुंबई पालिकेतील परिचारिका आणि डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तसेच पालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकली आहे. परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. 

 

मुंबई पालिकेमध्ये परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचारी यांची भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून ६५२ परिचारिकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या परिचारिकांची पोलीस पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांना लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मात्र आचारसंहिता लागू करण्यात आल्याने ही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. परिचारिकांप्रमाणेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. अवघ्या १२ जणांना नियुक्ती पत्र दिल्याने ते कामावर रुज झाले आहेत, मात्र आचारसंहितेमुळे उर्वरित निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कंत्राटी भरती करण्यासही परवानगी नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जात असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्याचा विचार पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी भरती करण्यासही परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


Mumbai Mahanagar Palika Bharti 2024: For the ongoing Lok Sabha election work in the country, the Election Commission has appointed certain employees of all the government offices for the election work. This also includes employees of Mumbai Municipal Corporation hospitals. Along with fourth class employees, administrative officers of Mumbai Municipal Corporation Hospital, junior medical staff have also been appointed for election work. As almost 30 percent of the employees of the medical colleges and hospitals of the Mumbai Municipal Corporation have been appointed for election work, the effect is seen on the patient care. About 30 percent of the employees of various hospitals of Mumbai Municipal Corporation have been appointed for election work. In addition to the administrative staff of the hospital, the junior medical staff have also been appointed. Therefore, keeping in mind the impact of this on the health services in the hospitals, the Mumbai Municipal Corporation administration is thinking of appointing junior medical staff on a temporary basis on a contractual basis so that the health services in the hospitals of Mumbai remain smooth

निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम रुग्णालयातील आरोग्य सेवेवर होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासन करत आहे. 

जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाने सर्वच सरकारी कार्यालयातील ठराविक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबरच निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसत आहे.

कंत्राटी पद्धतीने भरती

रुग्णालयातील परिचारिका, रक्त तपासणी तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगाळा तंत्रज्ञ निवडणुकीच्या कामावर गेल्याने रुग्णसेवेवर होत असलेला परिणाम टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भात विचार करत आहे. त्यानुषंगाने रुग्णालय प्रमुखांकडून निवडणुकीच्या कामावर पाठविण्यात आलेल्या निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात येत आहे. तसेच किती निम्नवैद्यकीय कर्मचारी लागतील याचा अंदाज मागविण्यात येत आहे. त्या मागणीनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

२०० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामावर नियुक्ती

निवडणूक कामावर नियुक्ती करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये शीव रुग्णालयातील ११० कर्मचारी, केईएम रुग्णालयातील १३० कर्मचारी, नायर रुग्णालयातील १०० कर्मचारी, नायर दंत महाविद्यालयातील १०० कर्मचारी आणि आरोग्य विभागातील जवळपास २०० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामावर नियुक्ती करण्यात आली आहे.


Mumbai Mahanagar Palika Bharti 2024

महाराष्ट्रासारख्या कल्याणकारी राज्यात, एका विशिष्ट वर्गाच्या नागरिकांसाठी इतरांना गुलामगिरीत अडकवून स्वच्छता साध्य करता येत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला ५८० कामगारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित करण्याचे व त्यांना सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले. औद्योगिक न्यायालयाने रस्ते साफ, वाहतूक करणाऱ्या ५८० कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात दाद मागत औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली.

 

न्यायालयाने नोव्हेंबर- २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयाची प्रत नुकतीच प्रसिद्ध केली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली. स्वच्छ पर्यावरण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असे असले तरी प्रतिष्ठेशी तडजोड होणे योग्य नाही. त्यांच्या अधिकारांना वगळता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करताना औद्योगिक न्यायालयाचा निकाल रद्द करणे म्हणजे न्यायाची फसवणूक केल्यासारखे होईल, असे म्हटले आहे. ५८० कामगार सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पालिकेसोबत काम करत आहेत. सेवा काळात अनेक जण जायबंदी झाले आहेत, आजारी पडले आहेत, पण त्यांना कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना डावलून चालणार नाही, असे न्यायालयाने आदेशात


 

केंद्रीय निवडणूक आयोगाने, 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले असले तरी, इकबालसिंह चहल अद्यापही पालिका आयुक्तपदावर आहेत. पण त्यांच्या प्रशासनात तब्बल 52 हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने सनदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र मुंबईसह राज्यात आणि देशात सुरू झाले आहे. तथापि, जवळपास पावणेचार वर्षे मुंबई महापालिका आयुक्तपदी असलेले इक्बालसिंह चहल यांच्या बदलीसाठी तीन वर्षांचा निकष लागू करू नये, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने ती फेटाळली आहे. मात्र अद्याप त्यांची बदली करण्यात आलेली नाही. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यांच्याच प्रशासनात 52 हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या महानगरीची लोकसंख्या सव्वाकोटी असून येथे नागरी सेवा देणाऱ्या मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेसह जवळपास 129 विभाग आहेत. या सर्व विभागांत मिळून पालिकेत एकूण एक लाख 45 हजारांहून अधिक पदे मंजूर असून त्यापैकी केवळ 92 हजार पदांवर कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर, दुसरीकडे पालिकेत दरवर्षी मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, तर काहींचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अपुऱ्या संख्याबळामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत चालला आहे. एका वारसाला पालिकेच्या सेवेत घ्यावे, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पदावर कायम करावे, तसेच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.

 

 


 

मुंबई महानगरपालिकेत लवकरच सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे. सहायक सुरक्षा अधिकारी (६५ पदे) आणि सुरक्षा अधिकारी (१४०० पदे) आदी रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून भरती प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, अशी घोषणा अतिरिक्त आयुक्त यांनी केली. 

 

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५८ वा वर्धापन दिन शुक्रवारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडूप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुरक्षा दलामार्फत संचलन, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच विशेष कामगिरी बजावणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंबईतील विविध ठिकाणी सेवा बजावणाऱ्या सुरक्षा दलासाठी अद्ययावत सेवा व सुविधा, तसेच गणवेश, आवश्यक उपकरणे आदी पुरविण्यात येतील, असे डॉ. सुधाकर शिंदे यावेळी म्हणाले. घनकचरा विभाग, तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यासारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारी वर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक संयंत्रे बसविण्यात येणार आहेत. एकूण सात ते दहा टप्प्यात ही संयंत्रे उपलब्ध केली जातील, अशी माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी यावेळी दिली.


 

मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. महापालिकेत सध्या ४२ हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार रिक्त जागा असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे. मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉर्डातूनही काम चालते. एकूण १ लाख ४० हजार जागा असून त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या ४२ हजार रिक्त जागा आहेत. यापैकी २८ हजार जागांवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत.

लवकरच होणार भरती सुरु 

■ महापालिकेत १,१०० लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
■ मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी ५०७ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे ४५० जवानांची भरती केली जाणार आहे.
■ तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

71 Comments
  1. Kiran says

    अपंग असेल तरी सुधा चालेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड