खुशखबर! अखेर मुंबई महापालिकेत १५० सहाय्यक वैद्याकीय अधिकाऱ्यांची जानेवारी अखेरीस जाणार नियुक्ती!

Mumbai Aarogya Vibhag Update

मागील बराच दिवसापासून BMC अंतर्गत अनेक पदे रिक्त होती. परंतु आता, मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सहाय्यक वैद्याकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून वैद्याकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होणार आहे. सुमारे १५० सहाय्यक वैद्याकीय अधिकाऱ्यांपैकी १३० जणांनी कागदपत्रांची पूर्तता केली असून लवकरच उर्वरित २० जणांचीही कागदपत्रे प्रशासनाला सादर होतील. तसेच, संबंधितांची जानेवारी महिन्याच्या अखेरीस वैद्याकीय अधिकारी पदावर नेमणूक केली जाणार आहे. निश्चितच हि एक आनंदाची बातमी आहे. 

BMC Bharti 2025 Updates

 

वैद्याकीय अधिकारी संवर्गातील रिक्त पदे सहाय्यक वैद्याकीय अधिकारी संवर्गातून पदोन्नतीने भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे २६ जुलै २०२४ पर्यंत पदोन्नती समितीपुढे सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य खात्याने केल्या. अंतिम सेवाज्येष्ठता यादीतील १५० कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना पालिकेने केल्या होत्या. याबाबत १८ जुलै २०२४ रोजी परिपत्रकही प्रसिद्ध केले. सूचनेनुसार आतापर्यंत १३० कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत, तर उर्वरित २० कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांनी तातडीने कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड