JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलिस बँडस्मन पदभरती सुरु अर्ज लिंक , पण आरक्षणाची माहिती अपुरी- Maharashtra Bandsman Police Bharti 2025

Maharashtra Bandsman Police Bharti 2025

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५,२९४ पदांची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत पोलिस बँडस्मन आणि अनाथ या घटकांच्या जाहिरातींमध्ये प्रत्येक प्रवर्गासाठी असणाऱ्या सामाजिक आरक्षणानुसार जागांची स्पष्टता नसल्यामुळे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत बँडस्मन पदासाठी मुंबई, यवतमाळ, पुणे शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, वाशिम आणि गोंदिया अशा एकूण सात घटकांत जागा दिल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्येच सामाजिक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र, उर्वरित पाच जिल्ह्यांत केवळ जागांची संख्या दिली असून, प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा उल्लेख नसल्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, बँड पोलिस भरतीप्रमाणेच अनाथ घटकासाठीही जाहिरातींमध्ये सामाजिक आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी अंतिम निकाल लागल्यानंतर अनाथासाठी १ टक्के आरक्षणानुसार कोणत्यातरी एका सामाजिक प्रवर्गातील एक-दोन जागा कपात करून त्या अनाथांना दिल्या जातात. त्यामुळे ज्या प्रवर्गाच्या जागा अनाथांना दिल्या जातात. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळवण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.

Police BandsMan Bharti

त्रुटीत लवकर दुरुस्ती करावी
पोलिस भरतीत अर्ज करताना किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. ही वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत १८ वर्षे पूर्ण उमेदवारांना अर्ज करता येतील, असे दरवर्षीप्रमाणे या वर्षीच्या जाहिरातीतही नमूद केले आहे; परंतु प्रत्यक्ष अर्ज भरताना, ज्यांचे वय १ जानेवारी २०१५ रोजी १८ वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांचेच अर्ज स्वीकृत केले जात आहेत. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत १८ वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. ही एक गंभीर तांत्रिक त्रुटी असून, यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असूनप्रशासनाने लवकर या त्रुटीत दुरुस्त करावी, असे रूपनवरम्हणाले.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

उपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व सुधारित नियम २०२१ मधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती २०२२-२३ च्या मैदानी चाचणी व वाद्यवृंद कौशल्य चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या ५९ उमेदवारांची यादी संदर्भ क्र.२ अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिध करण्यात आली आहे. मैदानी चाचणी व वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करुन लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा नायगांव संकूल हॉल, पहिला मजला, नायगांव, मुंबई येथे दिनांक २९/०१/२०२५ रोजी दुपारी १४:३० वाजता घेण्यात येणार आहे. सदर लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परिक्षेची प्रवेशपत्रे https://policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन लेखी परिक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहावयाचे आहे. 

 

 

 

 

 

राज्यभरात पोलिस भरतीच्या प्रक्रियेत बँड्समन पदासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. या पदाच्या एका जागेमागे ७८१ उमेदवार स्पर्धेत आहेत. भरतीच्या प्रक्रियेची सुरुवात मैदानी चाचणीतून होते, त्यानंतर शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा होणार आहे. या पदासाठी एकूण काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत. एका जागेसाठी १०१ उमेदवार असे उपलब्ध जागा आणि आलेले अर्ज यांचे गुणोत्तर आहे 1. पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. बँडसमन पदासाठी ४१ जागा आहेत, त्यासाठी ३२,०२६ अर्ज आले आहेत. या भरतीमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांच्या अर्जात डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए), अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) आणि इतर उच्च शिक्षण असलेले उमेदवार स्पर्धेत आहेत . या भरतीच्या प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांच्या निवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 

पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी ४१ जागा आहेत. त्यासाठी ३२ हजार २६ अर्ज आले आहेत.

त्याशिवाय तुरूंग विभागातील शिपाई (प्रिझन कॉन्स्टेबल) या पदाच्या एका जागेमागे साधारण २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी १८०० जागा उपलब्ध आहेत तर ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत. चालक पदासाठी एका जागेमागे साधारण ११७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदाच्या १६८६ जागा उपलब्ध असून १ लाख ९८ हजार ३०० अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) पदासाठी आहेत. या पदाच्या ९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे प्रमाण आहे. शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागा असून त्यासाठी ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज आले आहेत. एका जागेसाठी ८० उमेदवार स्पर्धेत आहेत.

 


Maharashtra Bandsman Police Bharti 2024 – When will 41 posts of Bandsman (Bandsman) in the Police Force (Police Force) of the state be filled in Maharashtra. The Online application forms will start from 5 March 2024. Last date to apply for this Maharashtra Police Recruitment process is 31 March 2024. Know More about Maharashtra Bandsman Police Bharti 2023 read the details given below.

 

आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती अंतर्गत बॅन्ड्समन पदाच्या ४१ पदांसाठी भरती जाहिराती आपल्या आहे. या अंतर्गत मुंबई, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यत हि भरती होत आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

Maharashtra Bandsman Bharti 2024

Maharashtra Bandsman Police Bharti 2024

 


 

राज्यातील पोलिस दलातील ‘बँडस्मन’ची १४८० पदे कधी भरणार, अशी विचारणा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या संजय देशमुख यांनी गृहविभाग, तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना केली आहे. त्यांनी याचिकेतील मुद्दयांबाबत १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने आदेशित केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

पात्रता असूनही जाहिरातीअभावी रोजगाराची संधी गमावण्याची भीती

नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलिस खात्यातील सुमारे १८ हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली. मात्र, यात बँडस्मन पदाच्या एकाही जागेचा समावेश नव्हता. पोलिस खात्यात राज्यभरात जिल्हानिहाय बैंड पथके कार्यरत आहेत, तसेच राज्य राखीव पोलिस बलाची १९ बँड पथके व रेल्वे पोलिस दलाची ४ बँड पथके आहेत. बँड पथकातील भरतीसाठी सर्वसाधारण शारीरिक पात्रतेचे निकष जसे की उंची व छाती यांच्या मापनासंबंधीचे मानके तुलनेने शिथिलक्षम असतात. राज्यभर मोठ्या प्रमाणात पोलिस खात्यास बँडस्मन पदांची आवश्यकता असूनही मेगाभरतीत या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी व्यथा याचिकाकर्त्यांनी गृहखाते व पोलिस महासंचालक यांच्याकडे मांडली होती.

याचिकाकर्ते बोर्डे सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, युफोनियम, साइड ड्रम वादनात पारंगत असून म्हस्के ट्रम्पेट वादनात निपुण आहेत. पात्रता असूनही आपण जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीस मुकणार अशी भीती याचिकाकर्त्यांना वाटल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर बाजू मांडत आहेत.

Table of Contents

1 thought on “पोलिस बँडस्मन पदभरती सुरु अर्ज लिंक , पण आरक्षणाची माहिती अपुरी- Maharashtra Bandsman Police Bharti 2025”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड