Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Update
कौशल्य विभागाअंतर्गत राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीच्या रोजगारासाठी सहा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रविवारी याबाबत घोषणा केली. आमदार अमीत साटम आणि राहुल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर मंत्री लोढा म्हणाले की, “२००७नंतर बेरोजगारांसाठी एकही योजना नव्हती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कधीही फसवणूक करणारी नव्हती. सुरुवापासूनच ही योजना प्रशिक्षणासाठी आहे रोजगारासाठी नाही. निवडणुकीपूर्वी ६ महिन्यासाठी ही योजना सुरू केली आणि निवडणुकीनंतर पुन्हा ५ महिने मुदत वाढवण्यात आली.” मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सद्यस्थितीत १ लाख १६ हजार ३८४ प्रशिक्षणार्थी आहेत, तर १ लाख १० हजार ११२ युवांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. येत्या १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू होणार आहे, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.
योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद
यावेळीच्या पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी सरकारने ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आयटीआयमध्ये केलेल्या सर्व कोर्सेसचा उपयोग आहे. महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये आपण एक शॉर्ट टर्म कोर्स सुरू केला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले असून पहिल्या बॅचमध्ये ५५ हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. मुख्यमंत्री स्व रोजगार योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात ५ लाख बेरोजगारांना लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले.
लाडका भाऊ योजना म्हणजेच :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
या योजनेंतर्गत खालील तत्क्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
✅ 12 वि पास बेरोजगार विध्यार्थ्यांना भेटणार 6000 रुपये
✅ डिप्लोमा झालेल्या विध्यार्थ्याला मिळणार 8000 रुपये
✅ पदवीधर विध्यार्थ्याला मिळणार 10000 रुपये
????लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय
▪️वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.
▪️या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
▪️या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
▪️शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
▪️या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
▪️अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















