आत्ताच प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत २०२५ च्या उन्हाळी सत्राच्या लेखी परीक्षांना ३ मेपासून सुरुवात होणार आहे MUHS Nashi Exam Dates 2025 . विद्यापीठामार्फत नुकतेच वेबसाइटवर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एकूण चार टप्प्यांत या परीक्षा होणार असून, सप्टेंबरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. आरोग्य विद्यापीठामार्फत दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा दोन सत्रात परीक्षांचे आयोजन केले जाते. सध्या विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू असून, नुकताच हिवाळी सत्र परीक्षांचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या परीक्षा सुरू असतानाच विद्यापीठामार्फत उन्हाळी सत्र २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

३ मे, २८ जून, २ ऑगस्ट, ९ सप्टेंबर अशा चार टप्प्यांमध्ये या परीक्षा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या एमडी व एमएस तसेच नवीन प्रवेशीत व पुनर्परीक्षार्थीच्या एमडी होमिओपॅथीच्या परीक्षा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पदवी मेडिकल व पदवी अन्य अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन या टप्प्यात करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात एमबीबीएस (२०१९ व २०२३) द्वितीय वर्षाच्या परीक्षा नियोजित आहेत. चौथ्या टप्प्यात पदवी मेडिकल (२०२४), बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस प्रथम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांनंतर ३ ते ४ आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर पाचव्या टप्प्यात पुरवणी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















