खुशखबर! मुद्रांकशुल्क विभागात नवीन आकृतीबंध, IBPS घेणार परीक्षा,९७२ पदांची भरती – mudrankan vibhag New jobs
mudrankan vibhag New jobs
राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा विभाग अशी ओळख असलेल्या नोंदणी मुद्रांक विभागाने अतिरिक्त ९७२ पदनिर्मितीचा आकृतीबंधाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे राज्यात सद्यस्थितीतील ३०९४ पदांमध्ये वाढ होऊन पदसंख्या चार हजारांपर्यंत पोहोचली आहे(mudrankan vibhag New jobs). नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी, धोरण-संशोधन आणि तपासणी यासाठी स्वतंत्र अतिरिक्त पदनिर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय मुद्रांक जिल्हाधिकारी, उपसंचालक नगररचना, उपअधीक्षक, सहायक नगरचनाकार अशी विविध ४८ प्रकारच्या पदनिर्मितीचा प्रस्तावात समावेश आहे.
राज्यात दर वर्षी सुमारे २५ ते ३० लाख इतके दस्त नोंदवले जातात. त्याद्वारे सरकारच्या तिजोरीत ४५ हजार कोटींहून अधिक उत्पन्न जमा होते. विभागाला अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका बसत असल्याने नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सध्याच्या पदांचा आढावा घेऊन कोणती पदे रद्द करता येईल आणि कोणत्या पदांची नव्याने निर्मिती करता येईल याचा आकृतीबंध आराखडा तयार केला आहे. प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला आहे. नोंदणी मुद्रांक विभागात ७१ पदे निरसित करण्यात आली असून, ९७२ अतिरिक्त पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण पदसंख्या तीन हजार ९९५ झाली आहे. नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी, तपासणी आणि धोरण संशोधन ही तीन अतिरिक्त पदे तयार करण्यात आली आहेत. सध्याचे मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय) हे पद आता बदलून अतिरिक्त नोंदणी १२ पदांची वाढ सध्या ५४ सहजिल्हा निबंधक वर्ग एकची पदे असून, त्यात आता आणखी १२ पदे वाढवण्यात आली आहेत. सहजिल्हा निबंधक वर्ग दोन किंवा सहदुय्यम निबंधक वर्ग दोन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकूण २६० पदे आहेत. त्यात नव्याने ८३ पदांची वाढ करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App