खुशखबर, आता एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ५३% भत्ता! – 53% DA for MSRTC ST Employees!
MSRTC Salary Update - 53% DA
MSRTC Salary Update – राज्य सरकारने अणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर सध्याच्या ४६% वरून ५३% महागाई भत्ता (DA) जाहीर केला आहे. सुधारित महागाई भत्ता जून २०२५ च्या पगारापासून लागू होईल. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य परिवहन महामंडळात काम करनाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता जूनपासून थेट ५३ टक्के महागाई भत्ता मिळणारचंय. मूळ पगारावर हाच भत्ता लागू होणार हे त्यांनी स्पष्ट केलं. ह्या वाढीमुळं सरकारच्या तिजोरीवर दर महिना १९ कोटींचा भार येणार आहे. बैठकीत युनियन प्रतिनिधींनी महसूल वाढवणे आणि इंधन खर्च कमी करणे यासह विविध मागण्या मांडल्या. जून २०२५ च्या पगारापासून ५३% पर्यंत महागाई भत्ता वाढण्यास सुरुवात होईल. निधी उपलब्धतेनुसार प्रलंबित महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
महागाई भत्याची जुनी थकबाकी द्यायची आहे, पण त्यासाठी निधी मिळतो का नाही, ह्यावर पुढचं निर्णय घेण्यात येणार, असंही शिंदेंनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसारखा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आनी वार्षिक वेतनवाढ एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली हाय.
२०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही बाकीच हाय. न्यायालयानं निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता मात्र ५३ टक्के महागाई भत्ता लागू केल्याचं शिंदेंनी जाहिर केलं.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
सध्या एसटी महामंडळात कुशल मनुष्यबळाचाच अभाव दिसतोय. बर्याच ठिकाणी चांगल्या शिक्षण अधिकार्यांची गरज हाय. पुढच्या काळात PPP तत्वावर जे विकास प्रकल्प येणार हायते, त्यासाठी बांधकाम विभागात अभियंता लागणार.
त्यामुळे आता रिक्त जागा करार पद्धतीनं आणि सरळसेवा भरतीतून भरल्या जाणार.
एसटीच्या प्रत्येक खात्यानं आपापल्या विभागात किती जागा रिकाम्या हाय, ह्याचा आढावा घेऊन त्याचं एकत्रित प्रस्ताव द्यावा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.