नवीन अपडेट – ST महामंडळात 1050 पदांची भरती ठेकेदारी पद्धतीने अपेक्षित!! MSRTC Bharti 2022

MSRTC Bharti 2022 | MSRTC Recruitment 2022

MSRTC Bharti 2022 | MSRTC Recruitment 2022

MSRTC Bharti 2022: The Tender has been declared by MSRTC for the districts of Pune, Kolhapur, Sangli, Solapur, and Satara in the Pune Division. Tenders have been invited for providing 1050 carriers. For more details about ST Mahamandal Bharti 2022, ST Mahamandal Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Furthre details are as follows:-

एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 • तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे.
 • यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे.
 • यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.

या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

MSRTC Bharti सराव पेपर्स  2022

MSRTC Recruitment 2022 – District Wise

राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभाग भरती अपडेट!!

ST महामंडळ यवतमाळ विभागात 3200 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत!!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लातूर अंतर्गत 62 रिक्त पदांची भरती सुरू

एसटी महामंडळ रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू | MSRTC Amravati Bharti 2022

एसटी महामंडळ परभणी विभागात 203 पात्र उमेदवारांची भरती रखडली!! MSRTC Parbhani Bharti 2022

राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 पदांच्या भरतीची परीक्षा!! MSRTC Hingoli Bharti 2022

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे सरळसेवा नोकरभरती 2019 रखडली!! MSRTC Dhule Bharti 2022

MSRTC बीड विभागात 70 चालकांची गरज!! MSRTC Beed Bharti 2022

रायगड ST महामंडळात 833 चालक वाहकांची पदे रिक्त!! MSRTC Raigad Bharti 2022

ST महामंडळ औरंगाबाद विभागात भरती अपेक्षित!! MSRTC Aurangabad Bharti 2022

महत्त्वाचे – वाहक कम चालकांची भरती पुन्हा रखडली!! MSRTC Mumbai Bharti 2022

MSRTC अहमदनगर विभागात 120 पदे भरलेली!! MSRTC Ahmednagar Bharti 2022

ST महामंडळाच्या बुलढाणा विभागात 401 वाहक – चालक पदे रिक्त!! MSRTC Buldhana Bharti 2022

ST महामंडळ ठाणे विभागात चालक भरती लवकरच अपेक्षित!! MSRTC Thane Bharti 2022

राज्य परिवहन मंडळाच्या सातारा विभागात 105 पदे रिक्त!! MSRTC Satara Bharti 2022

MSRTC पुणे विभागात 2400 चालक-वाहकांची पदे रिक्त!! MSRTC Pune Bharti 2022

ST महामंडळात नोकरीची संधी कधी मिळणार?

ST महामंडळ सांगली विभागात तब्बल 750 पदे रिक्त!!


ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!! | MSRTC Bharti 2022 | MSRTC Recruitment 2022

MSRTC Bharti 2022: The ST Mahamandal has decided to recruit 5000 drivers. Managing Director of ST Corporation Shekhar Channe is sanctioned for this recruitment. These drivers will be recruited in phases and will be recruited as and when required. Further details are as follows:-

पाच हजार कंत्राटी चालक भरतीला मंजुरी 

एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.

एलएनजी प्रकल्प रखडलाः डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी एक हजार कोटींचा फायदा होणार होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासन या प्रकल्पावर नसतीच चर्चा झाली.या कामासाठी एका | कपनीची नियुक्तीही केली. परंतु त्यासाठी लागणारा खर्च व अन्य मुद्द्यावर या कपनीशी चर्चाच सुरू आहे.

MSRTC Bharti 2022


MSRTC Bharti 2022 | MSRTC Recruitment 2022

MSRTC Bharti 2022 :

एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

 

आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.

एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

 

पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़.

 


एसटीत मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती!! MSRTC Bharti 2022

MSRTC Bharti 2022: The corporation, through a private agency, conducted the recruitment process of contract drivers across the state last month. Now another 150 contract drivers will be recruited in the district. MSRTC Recruitment 2022 Latest Notification and ST Mahamandal Bharti Online Application & registration process for MSRTC Driver cum Conductor Assistant Mechanic Clerk Typist Vacancies Released Soon to Apply at www.msrtc.gov.in or www.msrtcexam.in which are official websites :

Further details are as follows:-

महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. आता जिल्ह्यात आणखी दीडशे कंत्राटी चालकांची भरती होणार.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस जागेवरच उभ्या असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत करण्यासाठी सुरूवातीला ९८ चालकांची भरती केली. यामुळे काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या. तर आता पुन्हा जळगाव विभागात दीडशे कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर महामंडळातर्फे ग्रामीण भागातीलहीं सेवा सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.

संपतील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आव्हन करूनही, हे कर्मचारी कामावर रुजू होत नसून, आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने बससेवा पुर्वत करण्यासाठी आणखी 150 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जळगाव विभागात ९५ चालकांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचायांना सुरुवातीला एका महिन्याची नियुक्ती देण्यात येत असून, त्यानंतर महामंडळाच्या सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येत आहे.


ST Mahamandal Recruitment 2022 

MSRTC Bharti 2022: ST Corporation will hire retired carriers to fill the staff shortage. ST is recruiting a large number of contract drivers in the state. Further details are as follows:-

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी ST महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे. राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे.

 • संपकरी कर्मचाऱ्यांवरून कारवाया मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आवाहन केले जाते.
 • त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
 • याशिवाय एसटीमध्ये ST आणखी दोन हजार ड्रायव्हर्सही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहेत.
 • दरम्यान, चालंकाची भरती होत असताना कंडक्टर्सचीही कमतरता जाणवत आहे.
 • त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू!! MSRTC Bharti 2022

Recruitment of contract drivers is underway in the state. As part of this, 67 contract drivers have been appointed in the Solapur division. Further details are as follows:-

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्यापही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. याचाच भाग म्हणून सोलापूर विभागातही ६७ कंत्राटी चालकांची नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्‍य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर संपातील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

 • असे असताना राज्यात पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी कामावर न आल्यास एसटीची सेवा अद्यापही थांबली आहे.
 • त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
 • त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटीच्या फेऱ्या सुरू होण्यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
 • सोलापूर विभागात एकूण ८० चालकांची भरती केली जाणार असून, यातील सध्या ६७ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • यातून २६० बस धावत असून दररोज ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
 • निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार

दररोज ८४ हजार किलोमीटरचा प्रवास 

The corporation administration has increased the number of outbound buses in response to the transport minister’s call for an increase in the number of employees returning to work after being suspended and on strike last week. At present, 84,000 kilometers are being traveled daily. At the same time, private carriers will also be recruited and their number will also increase.

महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ६७ चालकांची निवड करण्यात आली आहे. यातून एसटीच्या फेऱ्या आणि उत्पन्न वाढणार आहे

– सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर


ST Mahamandal Bharti 2022

MSRTC Bharti 2022: The possibility of a merger of Maharashtra State Road Transport Corporation with the government has been ruled out. The way has been cleared for re-employment of 2019 employees who have completed their service. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शासनात विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. यानंतर संपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात केलेल्या निवेदनानुसार, सेवा समाप्त झालेल्या २०१९ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दिली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या १०,२७५ कर्मचाऱ्यांना शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कार्यवाही करून कामावर घेतले जाणार आहे. एसटी संपला पाच महिने उलटत आहेत. अजूनही ५०,३७५ कर्मचारी संपत सहभागी आहेत. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर २० हजारांहून अधिक कर्मचारी विविध कारवाईत अडकेल आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.


कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरु!! – ST Mahamandal Bharti 2022

MSRTC Bharti 2022: The Corporation is conducting the recruitment process of drivers on contract basis. Initially, these candidates will be appointed for one month and the appointment period will be extended as per the instructions of the corporation. Further details are as follows:-

महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या उमेदवारांना एका महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून, महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरु करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली असून, जळगाव विभागातही २३ मार्चपासून ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे.

ST Mahamandal Jalgaon Bharti 2022


ST महामंडळात कंत्राटी चालक भरती; 11 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच- MSRTC Bharti 2022

MSRTC Bharti 2022: Good news – Contract driver recruitment in ST Corporation. A contract will soon be awarded to a private company for the recruitment of 11,000 employees. ST Corporation has taken a big step and has decided to recruit 11,000 contract drivers. Further details are as follows:-

खुशखबर – ST महामंडळात कंत्राटी चालक भरती. 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लवकरच खासगी संस्थेला ठेका देण्यात येणार. एसटी महामंडळाने मोठे पाऊल उचलले असून 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाहकांच्या कमतरतेचे काय?

11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे, परंतु वाहकांची नाही. ही वाहकांची कमतरता कशी भरून काढणार, असा प्रश्न आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


खुशखबर – ST महामंडळात १०,००० चालकांची भरती करणार; जाणून घ्या!!- MSRTC Bharti 2022

MSRTC Bharti 2022 :  As per the Latest Update MSRTC Bharti 2022 Expected soon. This New Recruitment is expected for 10,000 vacancies. The More Details for updates will be published soon on MahaBharti.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतूक सेवा गेले चार महिने कोलमडली आहे. त्यावर उपाय म्ह्णून एसटी महामंडळाने आता कंत्राटी चालक भरती सुरु केली आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून हि भरती सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २५ जणांची भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी बेरोजगार उमेदवारांकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची चाचणी घेऊन मग त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जात आहे.

ST कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चार महिने होत आले आहेत. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी हा संप सुरु आहे. संपला आचार महिने होत आले तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. पण एसटीची सेवा बंद झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी शाळेत, महाविद्यलयात जाऊ शकत नाहीत. शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागात हा त्रास होत आहे.

दरम्यान एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन, नोटिसा, निलंबन असे सारे मार्ग अवलंबून पाहिले पण कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाकडून राज्यस्तरावर खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून हि प्रक्रिया राबविली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चालकांची २५ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यांनतर चालक पदासाठी अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती. यामध्ये बेरोजगार उमेदवारांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची संख्या अधिक होती. कंत्राटी पद्धतीने करार करत हे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. या उमेदवारांची चाचणी रविवारी कणकवलीच्या मुडेश्वर मैदानावर घेण्यात आली. चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनतर त्यांची प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरु होणार आहे. चालक भरतीत शिक्षण आणि वयाची अट मात्र शिथिल करण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

102 Comments
 1. Bhimrao Puri says

  Bhimrao sakharam puri. Bharti kadhi nignar ihe sar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड