संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून 2024 चा निकाल प्रकाशित झाला, चेक करा – mscepune typing exam result 2024
mscepune typing exam result 2024
संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) mscepune typing exam result 2024 जून 2024 चा निकाल प्रकाशित झाला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निका बघू शकता. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकाल चेक करण्याची लिंक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून-2024 मध्ये इंग्रजी, मराठी व हिंदी – 30/40 शब्द प्रति मिनिट या विषयांची परीक्षा दि. 10/6/2024 ते 21/6/2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल दि. 16/8/2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.
विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे/ गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येतील. सदरील प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंट द्वारे 100GSM कागदावर करून विद्यार्थ्यांना मोफत वितरित करावे. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉफ्ट कॉपी PDF स्वरूपात देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंट द्वारे 100GSM कागदावर छपाई करून घेता येईल. संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र/ गुणपत्रके वितरित केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात उमेदवारांनी गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेमधून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय रु.100/- प्रमाणे व छायाप्रतीसाठी प्रति विषय रु.400/- प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने दि.26/8/2024 पर्यंत भरणे आवश्यक राहील. गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय रु.600/- प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
ज्या उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत, त्यापैकी चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेज आणि शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावरील राखीव ठेवलेल्या विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या विद्यार्थ्यांची व त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या संस्थांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली असून, परीक्षा केंद्रनिहाय निकालातील तफावत लक्षात घेता, वेळेप्रसंगी या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा देखील घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येईल
Comments are closed.