जून २०२४ पासून शॉर्टहँड लघुलेखन परीक्षा आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार!
MSCE Pune Computerised Shorthand Exam
गेल्या काही वर्षांत टंकलेखन यंत्रे कालबाह्य झाल्याने, टंकलेखन आणि लघुलेखनात संगणकाचा वापर अधिकाधिक होत आहे. त्यामुळे लघुलेखन परीक्षेसाठी संगणकीय परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली असून, जून २०२४पासून संगणक लघुलेखन परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासनमान्य टंकलेखन आणि लघुलेखन संस्थांमध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास २०१३मध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियमावलीस २०२३मध्ये मान्यता देण्यात आली आहे. लघुलेखनात संगणकाचा वापर गरजेचा झाला असल्याने संगणक लघुलेखन परीक्षेला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता लघुलेखन परीक्षा आता संगणकीय प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.
संगणकीय लघुलेखन परीक्षा योग्य रीतीने पार पाडण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेची आहे. तसेच या परीक्षेची कार्यपद्धती, गुणपद्धती याबाबत वाणिज्य संस्था, विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, संगणकीय परीक्षेचा विद्यार्थ्यांवर ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.