दिव्यांग उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! MPSC दिव्यांग भरतीत मोठा बदल! | MPSC Update for Divyang Candidates
MPSC Update for Divyang Candidates
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरती जाहिरातींसाठी, दिव्यांग उमेदवारांनी त्यांचा दिव्यांग तपशील केंद्र सरकारच्या ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) केलेला असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा, अशा उमेदवारांना पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश एमपीएससीने दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी एक मोठा बदल करण्यात आलाय. 1 मे 2025 पासून जे कोणी दिव्यांग उमेदवार अर्ज करत असतील, त्यांना केंद्र सरकारच्या स्वावलंबन पोर्टल वरून मिळणारं दिव्यांग सर्टिफिकेट आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड बंधनकारक झालं आहे.
राज्य शासनाच्या २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार, दिव्यांग व्यक्तींना आरक्षण व अन्य सुविधांचा लाभ देण्यासाठी ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व ‘यूडीआयडी’ (UDID) कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने देखील त्याच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये दिव्यांग उमेदवारांना त्यांचा यूडीआयडी क्रमांक व संबंधित तपशील भरता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
उमेदवारांनी त्यांच्या खात्यामधील दिव्यांग तपशील स्वावलंबन पोर्टलवरून अचूक तपासून ‘व्हॅलिडेट’ करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगत्वाची टक्केवारी, यूडीआयडी क्रमांक व वितरण दिनांक असे सर्व तपशील अचूकपणे भरावे लागतील. तपशील एकदा अचूक भरल्यावर ‘Validate’ बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांकडे केंद्र शासनाचे प्रमाणपत्र नाही, पण राज्य शासनाच्या एसएडीएम (SADM) पोर्टलवरून मिळवलेले प्रमाणपत्र आहे, त्यांनी देखील यूडीआयडीसाठीचा नोंदणी क्रमांक अनिवार्यपणे नोंदवावा लागेल. तसेच, मुलाखतीपूर्वी यूडीआयडी कार्ड सादर करणे बंधनकारक असेल.
एमपीएससीने सर्व दिव्यांग उमेदवारांना लवकरात लवकर आपले तपशील व्हॅलिडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अर्ज करताना किंवा निवड प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही.
तपासणी कडक होणार
- उमेदवाराचं नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार, आणि UDID कार्डवरील व खात्यातील जन्मतारीख ही सगळी माहिती एकमेकांशी जुळली पाहिजे.
- ही माहिती योग्य असल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- म्हणूनच MPSC ने उमेदवारांना सांगितलंय की, ही प्रोसेस वेळेत पूर्ण करा.