MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल प्रसिध्द | MPSC Technical Services Result

MPSC Technical Services Result

MPSC Technical Services Result

MPSC Technical Services Pre-Exam Result PDF

MPSC Technical Services Pre Exam Result PDF: Maharashtra Gazetted Technical Services Combined Preliminary Examination 2022 result has been published on official MPSC Site. Those who have appeared for Maharashtra Forest services Exam 2022, Maharashtra Civil Engineering Services Exam 2022, MPSC ELECTRICAL AND MECHANICAL ENGINEERING SERVICES Exam 2022, MAHARASHTRA AGRICULTURE SERVICES Exam can check their result in the given PDF. The roll Number of those candidates who got shortlisted for the MPSC Technical Services Mains Exam 2022 is given in PDF of MPSC Technical Services Result. Candidates can download Post wise Technical Service Pre Exam Result from below Links :

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक १७ डिसेंबर, २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा – २०२२ करिता उमेदवारांनी विविध संवर्गाकरिता दिलेले विकल्प विचारात घेऊन सदर पूर्व परीक्षेतून (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा संवर्गनिहाय निकाल दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेतील विविध संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांच्या याद्या व गुणांच्या सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा तसेच या लिंक वर क्लिक करून मोफत MPSC टेस्ट जॉईन करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Technical Services Pre Exam Result 2022

  • प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
  • आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीतील तरतूदीनुसार अर्जात प्राविण्यप्राप्त खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार व त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या शुध्दिपत्रक व दिनांक ११ मार्च, २०१९ व दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ रोजीचे शुध्दीपत्रक आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयांकित गट-अ व ब पदांसाठी निश्चित केलेली क्रीडा विषयक अर्हता धारण करीत असल्याबाबत, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकांचे म्हणजेच दिनांक २३ ऑक्टोबर, २०२२ रोजीचे किंवा तत्पूर्वीचे क्रीडा प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असून याच दिनांकापूर्वी सदर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय उप संचालकांकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भातील संबंधित क्रीडा उप संचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य राहील.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

Download MPSC Technical Services Combine Pre Exam Result 2022

Maharashtra Forest Services Pre Exam 2022 Result

Download

Maharashtra Civil Engineering Services Pre Exam 2022 Result

Download

MPSC ELECTRICAL AND MECHANICAL ENGINEERING SERVICES Pre Exam 2022 Result

Download

MAHARASHTRA AGRICULTURE SERVICES Exam Result

Download


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड