MPSC महत्वाचा बदल, आता प्राधान्यक्रमचा पर्याय उपलब्ध

MPSC Preference Option 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रेफरन्स लिंक देत उमेदवारांना पाहिजे त्या पदासाठी प्राधान्य देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी हा बदल स्वागतार्ह असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी लागलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालांमध्ये अनेक उमेदवारांची पुन्हा त्याच पदी त्यांची निवड झाली होती. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. येत्या काही दिवसात महाराष्ट्र वनसेवा गट क्रमांक, प्रथम, द्वितीय श्रेणीच्या पदासाठी मुलाखती होणार आहेत व मुलाखती होणाऱ्या ५०हून अधिक उमेदवार हे राज्यसेवेच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण असलेले द्वितीय श्रेणीच्या पदावरती काम करत आहेत. त्यामुळे आयोगाने पदांना प्राधान्यक्रम देण्यासाठी पर्याय द्यावा अशी मागणी वन सेवेच्या मुलाखतीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती.

MPSC New Notifications 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निर्माण झालेल्या या वादामुळे विनाकारण नवीन विद्यार्थ्यावर याचा परिणाम होतो व त्यामुळे त्यांची संधी जाते. म्हणून, कित्येक वर्ष विद्यार्थी अभ्यास करीत असतात कधीतरी संधी येते आणि अशा मार्गाने जात त्याचा उपयोग नसल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यामुळे आयोगाने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना पदासाठी प्राधान्य देण्याचे पर्याय ठेवले पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.

आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखत कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, त्या यादीमध्ये राज्यसेवा परीक्षेतून गट ‘ब’ या पदावर निवड झालेले बरेच उमेदवार आहेत. सदर उमेदवारांनी वनसेवा परीक्षेसाठी गट ‘अ’ आणि गट ‘ब’ अशा दोन्ही पदांचे पसंतीक्रम दिले आहेत. पण, आता त्यांच्या इच्छानुसार ते  फक्त वनसेवेतील गट ‘अ’ पदाकरिता पसंतीक्रम देऊ शकतात. यामुळे ‘या’ झालेल्या बदलाने उमेदवाराची दोन पदांवर निवड होऊ शकणार नाही आणि अन्य उमेदवारांवरती संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड