MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १३९ पदांची भरती होणार!- MPSC Mains On Schedule

MPSC Mains On Schedule – राज्य लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल २७फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. आता मुख्य परीक्षेसाठी एकूण १३९ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची मुदत १४ मार्च २०२६ रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत १६ मार्च रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १७ मार्च रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे. असेही राज्य लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात १८ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पुढे अतिरिक्त मागणी विचारात घेऊन राज्य आयोगाने ८ जानेवारी आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार पूर्वपरीक्षा झाली आणि त्याचा निकालही प्रसिद्ध झाला. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 


मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना एसईबीसी उमेदवारांना ‘नॉन क्रिमिलेअर’ आहे की नाही, हे पुन्हा सांगण्याची संधीही दिली गेली. मुख्य परीक्षा २६ ते २८ एप्रिल २०२४ दरम्यान होणार आहे. आता जे ३१८ नवीन उमेदवार निकालात पात्र ठरले, त्यांना अभ्यासासाठी वेळ कमी मिळतोय, म्हणून काही जण परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी करत होते.

आता काय ठरलं आयोगाच्या बैठकीत?

मंगळवारी झालेल्या बैठकीत आयोगाने स्पष्ट केलं की, परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार! मुदतवाढ ९ एप्रिलपर्यंत दिली होती, आणि ७,९७० पात्र उमेदवारांपैकी ७,७३२ जणांनी आधीच अर्ज केलेत. उरलेल्यांसाठीही ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीचं कारण देऊन परीक्षा पुढे ढकलायची गरज नाही, असं ठाम सांगितलं गेलंय.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अर्ज करताना अडचण आहे? मग काय करायचं?

ज्यांना अर्ज करताना काही तांत्रिक किंवा इतर अडचण येत असेल, त्यांनी हेल्पलाईनवर किंवा ईमेलवर संपर्क करावा:

  • हेल्पलाइन क्रमांक: ७३०३८२१८२२ / ०२२-६९१२३९१४
  • ईमेल: [email protected]

आखरी सूचना काय आहे?

आयोगाने ठामपणे सांगितलं आहे की, विहित मुदतीनंतर अर्ज किंवा परीक्षा शुल्काबाबत कुठलाही बदल किंवा विनंती मान्य केली जाणार नाही. त्यामुळे, परीक्षा ठरल्याच वेळेसच होणार – पुढे ढकलली जाणार नाही.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड