Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC परीक्षा, सरळ सेवा परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा ? नवीन माहिती जाहीर | MPSC Instructions for Filling Application Form 2023

MPSC Instructions for Filling the Application Form 2023

MPSC Instructions for Filling Application Form 2023

MPSC Instructions for Filling Application Form 2023 – MPSC Has issued NEW Rule Book For Filing MPSC Online Application 2023. The application should be submitted after carefully observing all the instructions given in the advertisement/notification of the concerned cadre/post/examination. Only on the basis of the information provided in the application, the eligibility will be tested and the selection process will be completed based on it. The step-wise detailed procedure for submission of an application under an advertisement has been made available to the candidates on the online application system website of the Commission at https://mpsconline.gov.in. Here we are providing you all the details about How To Fill MPSC Online Application Form in marathi

Based on the requisition letter received from the Government of Maharashtra for the direct service recruitment of posts/cadres for all posts of Group-A and Group-B in the gazetted cadre, some non-gazetted Group-B cadre posts and clerical posts in Group-C cadre etc. from the Maharashtra Public Service Commission https:/ A detailed advertisement is published on the website /mpsc.gov.in as well as a brief advertisement in various leading newspapers of the state

MPSC परीक्षा देण्याचा विचार करताय ? पण MPSC भरती करीता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? ऑनलाईन अर्ज करण्यास काय पात्रता हवी इत्यादी माहिती आज MPSC ने जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC ऑनलाइन अर्ज 2023 भरण्यासाठी नवीन नियम पुस्तिका येथे बघू शकता. संबंधित संवर्ग/पोस्ट/परीक्षेच्या जाहिराती/सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून अर्ज सादर करावा. अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता चाचणी केली जाईल आणि त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उमेदवारांना जाहिरातीअंतर्गत अर्ज सादर करण्याची तपशीलवार प्रक्रिया आयोगाच्या https://mpsconline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आम्ही तुम्हाला MPSC ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व तपशील माहिती देत आहोत ती वाचा….

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

Know How To Fill MPSC Online Application Form 2023

आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेकरीता अर्हता, अर्ज सादर करण्याची पध्दती, पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्रे, भरतीप्रक्रियेतील आरक्षण, भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया, परीक्षेमधील गैरप्रकार ठरु शकणा-या कृती इत्यादी बाबींची सर्वसाधारण माहिती व्हावी, या हेतूने प्रस्तुत सूचना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.! प्रस्तुत सूचनांमधील कोणतीही तरतूद, आयोगाची कार्यनियमावली, संबंधित पदाचे सेवाप्रवेश नियम, शासन आदेश, आयोगाचे तत्कालीन धोरण यामधील तरतुदींशी विसंगत असल्याचे आढळून आल्यास आयोगाची त्या त्या वेळची कार्यनियमावली अथवा संबंधित पदभरतीची जाहिरात अथवा सेवा प्रवेश नियम अथवा शासन आदेश अथवा आयोगाचे तत्कालिन धोरण यामधील तरतुदी अंतिम समजण्यात येतील.

अर्ज प्रक्रियेसंबंधी सूचना :- How To Fill MPSC Form Online

  • आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा / भरतीकरीता पात्र उमेदवाराला आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन आयोगाच्या https://mpsconline.gov.in या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  • विहित पध्दतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने सादर केलेले / पाठविलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच ऑफलाईन अर्जासोबत परीक्षा शुल्क पाठविण्यात आलेली रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक इत्यादीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-
    (१) नोंदणी / नवीन प्रोफाईल निर्माण करणे.
    (२) प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
    (३) अर्ज सादरीकरण.
    (४) परीक्षा शुल्क भरणा
    (५) परीक्षा जिल्हाकेंद्र निवड (लागू असल्यास)
    (६) विहित कागदपत्रे अपलोड करणे (लागू असल्यास)

नोंदणी / नवीन प्रोफाईल निर्माण करणे :- How To Creat new Profile in MPSC Application 2023 |how to make mpsc profile

१ प्रोफाईल निर्मितीसाठी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
२ नोंदणी करताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ईमेल आयडी, वैध मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक इत्यादी तपशील अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षाविषयक प्रश्नांची उत्तरे शक्यतो अचूक अथवा ठराविक कालावधीनंतरही विस्मरण होणार नाही; यापध्दतीने देणे उमेदवारांच्या हिताचे राहिल.
३ नोंदणीकरीता वापरण्यात आलेल्या तपशीलामध्ये नंतर बदल करण्याची उमेदवारास मुभा राहणार नाही.
४ आयोगाच्या संकेतस्थळावर यापूर्वी नोंदणी / प्रोफाईल निर्मिती केलेल्या व्यक्तीस पुन्हा नोंदणी अथवा प्रोफाईल निर्मिती करण्याची आवश्यकता नाही. आयोगाकडून परवानगी देण्यात आलेल्या बार्बीकरीताच प्रोफाईलमधील तपशील अद्ययावत करता येईल.

प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे:- MPSC Profile Update Details

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश करुन प्रोफाईल निर्मिती या पर्यायावर क्लिक करावे. वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करुन ती जतन करावी.

 वैयक्तिक माहिती:- Adding Personal information

(एक) ‘आधार’ विषयक तपशील:-
(१) उमेदवाराने स्वत:चा आधार विषयक तपशील जसाच्या तसा विहित पध्दतीने नमूद करणे आवश्यक आहे. आधारविषयक तपशील व उमेदवाराने नमूद केलेले नाव यामध्ये तफावत असल्यास आधार पडताळणी पूर्ण होऊ शकणार नाही.
(२) उमेदवार आधार विषयक तपशील आयोगास सादर करु इच्छित नसल्यास उमेदवारास त्याच्या प्रोफाईलच्या अनुषंगाने पर्यायी व्यवस्थेद्वारे ओळख पडताळणीकरीता आवश्यक मूळ कागदपत्रांसह आयोगाच्या संबंधित अधिका-यांच्या पूर्वपरवानगीने पूर्वनिश्चित दिनांकास आयोगाच्या मुख्य कार्यालयात व्यक्तीशः उपस्थित रहावे लागेल.

(दोन) वैयक्तिक तपशील:-
(१) प्रोफाईलमध्ये माहिती / तपशील नमूद करताना संबंधित सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. (२) आडनाव, स्वतःचे नाव, मधले नाव इत्यादी तपशील स्वतंत्र दर्शवावा.
(३) स्वतःच्या संपूर्ण नावासंदर्भातील एकत्रित तपशील एसएससी अथवा तत्सम समान दर्जाच्या अर्हता प्रमाणपत्राप्रमाणे नमूद करावा. उमेदवाराने अशाप्रकारची अर्हता धारण केलेली नसल्यास एचएससी अथवा पदवी प्रमाणपत्राप्रमाणे नावाचा तपशील नमूद करावा.
(४) प्रोफाईलमधील १.३ येथे नमूद संपूर्ण नाव भरतीप्रक्रियेच्या सर्व टप्प्यावर म्हणजेच अर्ज, प्रवेशप्रमाणपत्र, निकाल प्रक्रिया, शिफारस इत्यादी ठिकाणी वापरले जात असल्यामुळे सदर रकाना भरताना अत्यंत काळजी घ्यावी. प्रोफाईलमध्ये व पर्यायाने भरतीप्रक्रियेसाठी विचारात घेण्यात आलेला सदर तपशील नंतर बदलण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही.
(५) वरीलप्रमाणे इंग्रजीमधील नाव नमूद केल्यानंतर उमेदवाराचे देवनागरीमधील नाव संबंधित रकान्यात आपोआप दिसेल, तथापि, अशाप्रकारे देवनागरीमध्ये दिसणा-या नावामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. यास्तव, उमेदवाराने देवनागरीमध्ये योग्य अक्षरांचा पर्याय निवडून अचूक नाव नोंदवावे.
(६) विवाहित महिला उमेदवार किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये एसएससी अथवा तत्सम अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते, त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे.
(७) अर्जामध्ये नमूद केलेले नाव व ओळखीच्या पुराव्याच्या अनुषंगाने वेळोवेळी आयोगाकडे सादर करावयाचे ओळखपत्र यामध्ये कालपरत्वे बदल झाला असल्यास प्रस्तुत बदलाच्या अनुषंगाने नावात बदल झाला असल्याबाबत राजपत्राची प्रत आयोगाच्या मागणीनुसार सादर करणे अनिवार्य राहील.
(८) महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याबाबत तसेच विविध आरक्षणाच्या दाव्यांच्या (मागासवर्गीय, महिला, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी इत्यादी) अनुषंगाने अचूक माहिती प्रोफाईलमध्ये नमूद करावी. सदर माहितीमध्ये वेळोवेळी होणा-या बदलानुसार प्रोफाईल अद्ययावत करावे.
(९) आरक्षण विषयक कोणतेही लाभ अनुज्ञेय ठरण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण रहिवासी असणे व अर्जाद्वारे सुस्पष्ट दावा करणे अनिवार्य आहे.
(१०) जात व वर्गवारी विषयक तपशील नमूद करण्यापूर्वी प्रस्तुत सूचनांमधील ‘आरक्षण’ या प्रकरणाचे अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.
(११) शारीरिक अर्हता असलेल्या संवर्ग/पदांकरीता विहित व अचूक शारीरिक तपशील नमूद करणे आवश्यक राहील.

संपर्क तपशील:- Instrcution For Filling Address in MPSC Form 2023

(१) स्थायी निवासाचा तपशील व संपर्काचा पत्ता अचूकपणे नमूद करणे व कालपरत्वे होणा-या बदलानुसार वेळोवेळी अद्ययावत करणे भविष्यातील पत्रव्यवहार सुकर होण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. (२) व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र / वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा /करणे भविष्यातील पत्रव्यवहार सुकर होण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
(२) व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र / वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये.
(३) एखाद्या परीक्षेकरीता उमेदवाराने जिल्हाकेंद्राची निवड न केल्यास अथवा निवड केलेल्या जिल्हाकेंद्रावर बैठक व्यवस्था होण्यास कोणत्याही कारणाने अडचणी उद्भवल्यास अथवा एखाद्या भरतीकरीता अर्ज सादर करताना जिल्हाकेंद्राच्या निवडीचा पर्याय नव्हता, तथापि तदनंतर सदर भरतीकरीता परीक्षेच्या आयोजनाचा निर्णय झाल्यास उमेदवाराच्या स्थायी / कायमस्वरुपी निवासाच्या तपशीलाच्या आधारे त्यास जिल्हाकेंद्र उपलब्ध करुन दिले जात असल्यामुळे, सदर तपशील अचूकपणे नोंदविण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

इतर माहिती:- MPSC Instructions For Ex Servicemen

(एक) माजी सैनिक:-
(१) उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत अर्जाद्वारे स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
(२) माजी सैनिकांची व्याख्या व त्यांच्यासाठी असलेले आरक्षण व सवलती यांकरीता ‘आरक्षण’ या प्रकरणाचे अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.
(३) शहीद सैनिकांच्या कुटुंबातील एक व्यक्ती वगळता, माजी सैनिकांचे पाल्य यांच्याकरीता माजी सैनिकांचे आरक्षण व सोयीसुविधा अनुज्ञेय नाहीत.

(दोन) महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी:- MPSC Quota For Maharashtra Government employees

(१) महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी या संज्ञेत केवळ महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित निधीमधून वेतन मिळणा-या कर्मचा-यांचा समावेश होतो.

(२) शासकीय कर्मचारी याचा अर्थ महाराष्ट्र राज्याच्या कामकाजासंबंधातील कोणत्याही सेवेत किंवा पदावर नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये ज्याची सेवा कंपनीकडे, महामंडळाकडे, संघटनेच्या स्थानिक प्राधिकरणाकडे किंवा अन्य कोणत्याही शासनाकडे सोपविलेली असेल, मग त्याचे वेतन राज्याच्या एकत्रित निधिव्यतिरिक्त अन्य मार्गाने काढले जात असेल तरीही अशा शासकीय कर्मचा-याचा समावेश होतो.
(३)महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ स्वतःचा ‘सेवार्थ आयडी’ अचूकपणे नोंदविणे व तो विहित पध्दतीनुसार वैध होणे अनिवार्य आहे.
(४) विविध स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद, नगरपंचायत, छावणी मंडळ, विद्यापीठ, शासन अनुदानित शाळा / महाविद्यालये, राज्य शासनाची महामंडळे, राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम इत्यादींच्या सेवेतील कर्मचा-यांचा समावेश महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी या संज्ञेत होत नाही.
(तीन) बृहन्मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या कर्मचा-यांकरीता त्यांच्याशी संबंधित पदांकरीता असलेल्या सवलती / लाभ केवळ नियमित व स्थायी कर्मचा-यांना अनुज्ञेय ठरतात.
(चार) पात्र गुणवत्ताधारक खेळाडू:-
(१) पात्र खेळाडू आरक्षणाचा आणि/अथवा सोयी सवलतींचा दावा करण्यापूर्वी उमेदवाराने प्रस्तुत सूचनांधील ‘आरक्षण’ या प्रकरणामधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या आरक्षणासंदर्भातील सूचनांचे अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.
(२) क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालानुसार उमेदवारास ज्या गटातील संवर्ग / पदांवरील नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे, केवळ त्याच गटातील पदांकरीता आरक्षणविषयक लाभ अनुज्ञेय असल्याने उमेदवाराने त्याप्रमाणे गटाचा अचूक तपशील नमूद करणे अनिवार्य आहे.
(३) प्राविण्यप्राप्त खेळाडूच्या दाव्याच्या अनुषंगाने क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाचा तपशील व वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाची स्कॅन प्रत आयोगाच्या सूचनांनुसार वेळोवेळी उपलब्ध करुन देणे अथवा अपलोड करणे अनिवार्य आहे.
(४) उमेदवाराने वेळोवेळी धारण केलेली क्रीडाविषयक अर्हता प्रोफाईलमध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड