MPSC लिपिक-टंकलेखक मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता उमेदवारांची यादी प्रसिध्द ! MPSC Group C Selection And Merit List
MPSC Group C Selection And Merit List
MPSC Group C Clerk Selection And Merit List
MPSC Group C Selection And Merit List : The list of qualified candidates for Typing Skill Test of Clerk-Typist (Marathi) and Clerk Typist (English) cadre in Maharashtra Group-C Services (Main) Examination – 2022 has been published on the website of the Commission. Click on the link below to download the list. Selected candidates have to appear for Clerk Typist Exam 2023. details Of MPSC Clerk Typist Exam is given below :
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२, मधील लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी संपूर्ण माहिती या लिंक द्वारे बघा..व यंदा किती गेला कट ऑफ ते या लिंक ने चेक करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST – MARATHI
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सदर अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
- खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
MPSC Marathi and English Typing Skill Test Mock Link | टंकलेखन चाचणी मराठी की-बोर्डवरच होणार
- दिव्यांग, माजी सैनिक तसेच अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
- प्रस्तुत अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
- टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST – ENGLISH
MPSC Group C Selection And Merit List
MPSC Group C Selection And Merit List – Maharashtra Group C Services Main Examination 2021 – Paper 2 Provisional Selection and Merit List for the Post of Industry Inspector has been issued on the official site of the Commission. Students who have appeared in MPSC Group C Mains Industry Inspector Paper 2 exam can download Industry Inspector Provisional Selection and Merit List from the below Link. Based on that the candidates are invited to opt-out of the recruitment process. A ‘Post Preference / Opting Out’ web link is being made available in the ‘ONLINE FACILITIES’ menu on the Commission’s website https://mpsc.gov.in for opting out of the recruitment process of the present examination. The said weblink will be open from 12.00 hrs on 20th December 2022 to 23.59 hrs on 26th December 2022.
Maharashtra Group-C Services (Main) Examination – 2021 General Merit List and Provisional Selection List for the cadre of Industry Inspector, Directorate of Industries have been published on the website of the Commission and based on that the candidates are invited to opt out of the recruitment process. Click on the link below to download the list.
जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 उद्योग निरीक्षक या पदाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MPSC Group C Mains Provisional Selection and Merit List
- सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
- खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
- प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
- ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
- भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
- भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-onli[email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION
MERIT LIST FOR INDUSTRIAL INSPECTOR
MPSC Opting OUT Link
Industry Inspector Mains 2021 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे…
या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.