MPSC ची दोन फेब्रुवारीला परीक्षा होणार, पूर्ण माहिती पहा। MPSC Exam Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule - mpsc.gov.in
MPSC Interview Time Table PDF
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पाच जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही दोन फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे, तर दोन फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही चार मे २०२५ रोजी होणार आहे. आयोगातर्फे दरवर्षी सर्वाधिक पदे ही गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. यामुळे विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत असतात. मात्र यंदा संयुक्त परीक्षेची जाहिरात येण्यास साधारण नऊ महिन्यांचा उशीर झाला. त्यामुळे ५५ ते ६० हजार उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना फटका बसला. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अशा उमेदवारांना किमान दोन परीक्षेसाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ देण्याची मागणी मान्य केले. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयोगाच्या एक जानेवारी ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी सहा जानेवारी ही अंतिम मुदत आहे. दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा- २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून आयोगाच्या संदर्भाधीन प्रसिध्दीपत्रकानुसार मुलाखत कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला आहे. तथापि, दिनांक ०३ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित केलेल्या खालील नमूद मुलाखत क्रमांक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत :-
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने FDAसंवर्गातील पदभरतीसाठी छाननीअंती/चाळणीअंती मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन दिनांक २ ते १६ जानेवारी , २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC FSO मुलाखत यादी पहा
MPSC Other Backward Bahujan Welfare Officer Interview Schedule
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या पदासाठी मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारा आयोजित करण्यात येत आहे. या पदासाठी संबंधित पात्र उमेदवारांनी आयोगाच्या वेब पोर्टलवर दिलेल्या गुणसूचीची यादी तपासू शकतात. २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेच्या यादीतून योग्य उमेदवारांची निवड करण्यात आली आहे..इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या पदासाठी मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारा आयोजित करण्यात येत आहे. या पदासाठी संबंधित पात्र उमेदवारांनी आयोगाच्या वेब पोर्टलवर दिलेल्या गुणसूचीची यादी तपासू शकतात. २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेच्या यादीतून योग्य उमेदवारांची निवड करण्यात आली आहे..तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download MPSC OBBWO Interview Schedule
MPSC Rajya Seva Interview Schedule – mpsc.gov.in
MPSC द्वारे सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – उमेदवारनिहाय मुलाखत कार्यक्रम जाहीर केले आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच पदानुसार सर्व वेळापत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे.
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२३च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक १६ जुलै, २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या तिसऱ्या टप्यातील मुलाखतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे.
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक १६ जुलै, २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे.
MPSC State Service Exam Interview Date 2024
MPSC Exam Interview Schedule: TheInterview Schdule of written examination of State Services (Main) Examination, 2023 conducted by Maharashtra Public Service Commission has been published on the website of the Commission. The first stage interview schedule For Phase 1 Schdule Details for the candidates who have qualified for the interview based on the results of the examination is as follows.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२३ च्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या वेळापत्रकत आयोजित वेळापत्रक दिलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वेळापत्रक डाउनलोड करा
- मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरीता कोणत्याही परिस्थितीत विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित रहावे.
- मुलाखतीकरीता उपस्थित राहताना रुग्णालयाकडून वैद्यकीय तपसणी पूर्ण झाली असल्याचे जबाबदार अधिकाऱ्याची सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले वैद्यकीय तपासणी पत्र मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे.
- अर्जात केलेल्या दाव्यापृष्ठर्थ आवश्यक ती विहित नमुन्यातील सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून सदर विहित नमुन्यातील वैद्यकीय तपासणी पत्र, मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही व ती सादर करण्याकरीता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
- मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतपत्र त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC Interview Dates 2024
MPSC Exam Interview Schedule – mpsc.gov.in: Inspector of Legal Metrology Main Examination 2023 – Interview Schedule (Phase 1) And Chief Admin. Officer, Group A, Professor in various subjects, Govt. Dental Colleges, Group A Interview Dates has been Declared by MPSC On its Official Site. Candidates can download Their MPSC Interview Dates 2024 from below link:
जा. क्र. १२४/२०२३ निरीक्षक वैधमापन, गट ब मुख्य परीक्षा २०२३ – मुलाखत कार्यक्रम (टप्पा 1) आणि जा.क्र.१०७/२०२२ मुख्य प्रशासन अधिकारी, गट अ, जा.क्र.४०१/२०२३ , ३९८/२०२३ व ४००/२०२३ विविध विषयांतील प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय, गट अ – मुलाखतीच्या तारखा MPSC द्वारे त्यांच्या अधिकृत साइटवर घोषित केल्या आहेत..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
जा. क्र. १२४/२०२३ निरीक्षक वैधमापन, गट ब मुख्य परीक्षा २०२३ – मुलाखत कार्यक्रम (टप्पा 1)
MPSC Interview Dates Changes 2024
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
वेळापत्रक डाऊनलोड करा
The first phase interviews of the candidates in the category of Police Sub-Inspector in the Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Examination-2022 conducted by the Maharashtra Public Service Commission will be held from 2nd July, 2024 to 12th July, 2024 and a press release has been released in this regard.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती या दिनांक २ जुलै, २०२४ ते दिनांक १२ जुलै, २०२४ या कालावधीत घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
याच कालावधीत गट-क संवर्गाकरिता “मराठी-इंग्रजी टंकलेखन कौशल्य” चाचणीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये काही उमेदवार पोलीस उपनिरीक्षक मुलाखत व टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता एकाच दिवशी पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांनी टंकलेखन कौशल्य चाचणीस नियोजित दिवशी प्रविष्ट व्हावे. अशा उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता मुलाखती पुढील नियोजित टप्यात घेण्यात येतील व पोलीस उपनिरीक्षक मुलाखतीचा सुधारित दिनांक उमेदवारांच्या प्रोफाईलवर व लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. सुधारित दिनांकानुसार सदर उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नं. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे उपस्थित रहावे.
MPSC PSI Interview Schedule
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २४ मे, २०२४ ते दिनांक ०६ जून, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. सदर शारीरिक चाचणीमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती (पहिल्या टप्प्यातील) दिनांक ०२ ते १२ जुलै, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्रमांक ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर क्रमांक ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४ येथे घेण्यात येणार आहेत. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरीता विहित दिनांकास व विहित वेळेत उपस्थित राहावे. उर्वरित उमेदवारांच्या मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
MPSC मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक २४ मे ते ६ जून, २०२४ या कालावधीत घेण्यात आलेला आहे. मुलाखती दिनांक २ जुलै, २०२४ पासून घेण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
सदर शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २ जुलै, २०२४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नं. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे घेण्यात येणार आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
MPSC PSI Interview Date 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Table of Contents
MPSC ची दोन फेब्रुवारीला परीक्षा होणार, पूर्ण माहिती पहा
MPSC Exam Interview Schedule 2024 – mpsc.gov.in
MPSC Civil and electrical Interview Schedule OUT
Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020-Police Sub-Inspector-Announcement regarding Interview Schedule – Phase II