Maharashtra Civil Services Combined Exam Date & Admit Card
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब. अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
२. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
३. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

Maharashtra Civil Services Combined Exam Date & Admit Card
मुंबई येथील वृत्तपत्रामध्ये ‘एमपीएससी, युजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण’ या मथळ्याखाली प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे:-
(१) आयोगामार्फत दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्रसिध्द शुध्दिपत्रकानुसार तसेच जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ रविवार, दिनांक ०४ जानेवारी, २०२६ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदर जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) दिनांक १२ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या प्रसिध्दिपत्रकानुसार UGC-NET December-2025 परीक्षा संपुर्ण देशभरात दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ ते ०७ जानेवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्द करण्यात आले आहे.
(२) आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि, राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या सार्वजनिक निवडणुका कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणुक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी होणार असल्याने आयोगाच्या दिनांक ०८ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शुध्दिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ पुढे ढकलण्यात येऊन रविवार, दिनांक ०४ जानेवारी, २०२६ रोजी घेण्याचे तसेच सदर दिवशी पुर्वनियोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ रविवार, दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
(३) आयोगामार्फत दिनांक ०४ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित परीक्षा यापूर्वीच दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी घोषित करण्यात आलेली आहे. दिनांक ०८ डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिध्द शुध्दिपत्रकानुसार सदर दिनांकास नव्याने कोणतीही परीक्षा आयोजित न करता पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ऐवजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ घेण्याचे नियोजित आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यालयाकडून परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही.
(४) आयोगाच्या जाहिरातीमधील तरतुदीनुसार परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास कोणती परीक्षा द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे.
२. परीक्षा आयोजनाच्या दिनांकामध्ये कोणताही बदल प्रस्तावित नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे २१ डिसेंबर २०२५ रोजी होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी परीक्षा आयोजित करण्याच्या अडचणींमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट-ब पूर्वपरीक्षेची संपूर्ण जबाबदारी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. मात्र, २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व इतर महत्त्वाचे अधिकारी मतमोजणीच्या कामात व्यस्त राहणार होते. यामुळे परीक्षा होणार की नाही, याबद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी एका परिपत्रकाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली.

आयोगाने काय म्हटले?
आयोगाने आपल्या परिपत्रकात परीक्षा पुढे ढकलण्याची कारणे स्पष्ट केली आहेत:
राज्य निवडणूक आयोगाचा आदेश : राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अडचणी: मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने आयोगाने जिल्हा केंद्रांकडून माहिती मागवली होती. या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा आयोजित करण्यात खालील अडचणी व्यक्त केल्या:
- परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर.
- मतमोजणी दरम्यान होणारा लाऊडस्पीकरचा आवाज.
- वाहतूक कोंडी.
- विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे होणारा अडथळा.
- परीक्षेच्या आयोजनासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता.
- सदर वस्तुस्थिती विचारात घेऊन आयोगाने परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
MPSC च्या नवीन परीक्षा तारखा
- परीक्षेचे नाव : जुनी तारीख : नवीन तारीख
- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) : सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५ : २१ डिसेंबर २०२५ : ०४ जानेवारी २०२६
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५- ११ जानेवारी २०२६ –
गट-ब परीक्षेची महत्त्वपूर्ण माहिती!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) या पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते.
- पदांची संख्या: यंदा एकूण ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- पदांचे तपशील:
- पोलीस उपनिरीक्षक (PSI): ३९२ पदे
- राज्य कर निरीक्षक (STI): २७९ पदे
- सहायक कक्ष अधिकारी (ASO): ०३ पदे
दोन वेळा तारीख बदलली!
मूळात संयुक्त पूर्व गट-ब 2025 (अराजपत्रित) परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे ती परीक्षा 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता मतमोजणीमुळे ती पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशाकरिता दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये सुधारित प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सदर परीक्षेसाठी यापूर्वी उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जुन्या प्रवेश प्रमाणपत्राआधारे परीक्षा उपकेंद्रावर कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” काळजीपूर्वक अवलोकन करावे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्याचे नियोजित होते व त्याकरीता उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेली होती. सदर जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना प्रस्तुत दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या परीक्षेकरीता प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेले व परीक्षेचा दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ नमूद असलेले प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे अनिवार्य आहे. अन्यथा विषयांकित परीक्षेकरीता प्रवेश नाकारला जाईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
How To Download MPSC Combined Prelim Exam Hall Ticket 2025
- प्रथम लॉग इन करण्यासाठी वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरा
- हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळवण्यासाठी “लॉग इन” बटणावर क्लिक करा
- भविष्यातील वापरासाठी हॉल तिकिटाची प्रिंट काढा
Download MPSC Civil Services Prelims Exam 2025 Hall Ticket
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ करीता प्रवेश पत्र उपलब्ध!!। MPSC Combined Preliminary Exam Admit Card Link”
प्रकल्प ग्रस्त असलेल्या साठी अपडेट टाका