सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर – प्रवेशपत्र लवकरच | MPSC ASO Admit Card 2023

MPSC ASO Admit Card 2023

MPSC ASO Admit Card 2023

MPSC ASO Admit Card 2023  – Departmental Examination 2023 for the promotion of Assistant Section Officers from the post Section Officers exam will be held on Monday, 08 May 2023 to 12th May 2023, It will be held at Elphinstone College, Fort, Mumbai. Time table according to new syllabus is given below. Candidates can check ASO ExammTime Table and Exam date at below. Very Soon admit card will be published for this exam .

सहायक कक्ष अधिकाऱ्यांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी सन २०२३ ची विभागीय परीक्षा सोमवार, दि. ०८ मे २०२३ ते शुक्रवार, दि. १२ मे २०२३ या कालावधीत एलफिन्स्टन महाविद्यालय, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



ASO Exam Time Table 2023

परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

MPSC ASO Admit Card 2023 
सदर परीक्षेसाठी उमेदवारांना खालील सूचना देण्यात येत आहेत.
१) परीक्षा कालावधीत प्रत्येक उमेदवाराने स्वत:चे शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
२) परीक्षा केंद्रातील सूचना फलकावरील दालन क्रमांक व आसन क्रमांक नुसार बैठक व्यवस्था असेल.
३) परीक्षा सुरु होण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर उमेदवाराने परीक्षेच्या केंद्रावर हजर रहावे.
४) परीक्षा सुरु झाल्यावर कोणत्याही उमेदवारास परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ५) परीक्षेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी तसेच पेपर संपण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशारा देणारी घंटा देण्यात येईल.
६) उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील आवश्यक सर्व तपशील उमेदवारांनी अचूकपणे भरणे आवश्यक आहे. मुखपृष्ठाच्या मागील बाजूस उमेदवाराने कोणतेही लिखाण करु नये. उत्तरपत्रिकेच्या आतील पानांवर तसेच पुरवणीवर उमेदवाराने स्वत:चे नाव, स्वाक्षरी, आसन क्रमांक इत्यादी कोणताही मजकूर लिहू नये. उत्तरपत्रिका/प्रश्नपत्रिकेच्या कोणत्याही भागावर उमेदवाराने स्वाक्षरी करु नये. तसेच सही करणे किंवा ओळख पटवून देण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा / खूणांचा निर्देश करणे ही बाब आक्षेपार्ह समजण्यात येईल व त्या प्रकरणी खालील नमूद अ.क्र.९ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
७) उमेदवाराने उत्तरपत्रिकेचे मुखपृष्ठ व त्याची मागील बाजू वगळून इतर सर्व पृष्ठांवरील दोन्ही बाजूस उत्तरे लिहावीत.
८) परीक्षेसाठी विहित केलेली अधिकृत शासकीय पुस्तके /अधिनियम/नियम/शासन निर्णय त्या त्या पेपरच्या वेळी उमेदवारांना परीक्षा कक्षात वापरण्याची परवानगी राहील. विहित केलेली मुळ पुस्तके उपलब्ध नसल्यास, संबंधित विभागाच्या आस्थापना अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेल्या विहित पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती परीक्षेच्या वेळी वापरण्यास परवानगी राहील. मात्र परीक्षेसाठी विहित केलेल्या पुस्तकांमध्ये अथवा पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतींवर अथवा अधिनियम/नियम/शासन निर्णयाच्या प्रतींवर इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नसावे.
९) उमेदवारांनी परीक्षा दालनात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वर्तन करु नये. परीक्षेच्या वेळी आक्षेपार्ह वर्तन { कॉपी करणे/ बघून लिहिणे / अन्य उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेतून अथवा त्यांच्याशी चर्चा करुन उत्तर लिहिणे, परीक्षा दालनात भ्रमणध्वनी (मोबाईल), पेजर, गणनयंत्र अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगणे इत्यादी } करणाऱ्या उमेदवारास संबंधित प्रश्नपत्रिकेत अनुत्तीर्ण घोषित करण्यात येईल तसेच त्यावर्षीच्या उर्वरीत सर्व प्रश्नपत्रिकांना बसण्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल.
१०) परीक्षा संपण्याच्या १० मिनिटे अगोदर उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका व पुरवणी एकत्र बांधून घ्यावी.

Download the Full ASO Exam Time Table 2023 and Exam Date

MPSC ASO Admit Card 2022

MPSC ASO Admit Card 2022: Maharashtra Public Service Commission has declared the MPSC ASO Hall Ticket 2022. The exam will be held on the 10th of December 2022. Click on the below link to download the call letter.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 10 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC ASO Hall Ticket 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी नियोजित सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राह अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected][email protected] या ईमेल व/अथवा १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC ASO Call Letter 2022 Download Link

प्रवेशपत्र डाउनलोड करा – http://bit.ly/3B1ulnh

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड