मुख्य परीक्षेच्या तारखा पुढील आठवड्यात, 2022 चं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार , MPSC Timetable 2022

MPSC Timetable 2022

MPSC Timetable 2022 | MPSC Exam Schedule 2022 Update & Details

आताच प्राप्त अपडेट नुसार MPSC ची नवीन तारीख जाहीर झाली आहे – MPSC 2022 Exam Schedule & Timetable – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.

मुख्य परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.

जाहिरात क्रमांक 19/2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/downloadFile/e मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.

 

हा अपडेट लगेच आपल्या सर्व मित्रांना शेयर करा !!राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.


काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे  विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं.

सहाव्यांदा लांबणीवर – कोरोनामुळे गेल्या वर्षभरात तब्बल सहा वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

 • ५ एप्रिल २०२०
 • २६ एप्रिल २०२०
 • १३ सप्टेंबर २०२०
 • २० सप्टेंबर २०२०
 • ११ ऑक्टो. २०२० १४ मार्च २०२१

 

MPSC ची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत आहे. त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परीक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक आणि मानसिक अडचण होणार आहे. या विरोधात MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

एमपीएससीची परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्च रोजी होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी फेसबुक लाईव्हवरुन संवाद साधण्याची शक्यता आहे. MPSC परिक्षा रद्द चा निर्णय चुकीचा, पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. 

निर्णय कोणाचा ?

राज्य सरकारच्या आदेशावरूनच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे. निर्णय शासनाच्या लेखी परीपत्रकानंतरच निर्णय घेण्यात आला. आपत्ती निवारण विभागाने निर्णय दिला. त्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. सरकारने याबाबत पत्र पाठवलं असल्याचा दावा एमपीएससीने केला आहे. राज्य सरकारच्या आदेशावरूनच परीक्षा पुढे ढकलली असल्याचं MPSCने म्हटलं. 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Surnar Pavan shivraj says

  Job achieve

 2. Varsha mohabe says

  Sir tell me about please….12th base job police officer for Maharashtra..I pursuing 3rd year

 3. 𝐀𝐤𝐬𝐡𝐚𝐲 𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡 𝐂𝐡𝐚𝐯𝐚𝐧 says

  BMC chi bharti kadji honar aahe…?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड