प्रदूषण नियंत्रण मंडळांतील रिक्त पदांची भरती करा! – MPCB Bharti 2024
Pradushan Niyantran Mandal Bharti
Pradushan Niyantran Mandal Bharti – नवीन अपडेट अंतर्गत, सध्या देशात प्रदूषणाची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असताना देशभरातच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांमधील अनेक पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक मुंबई येथे झाली. यावेळी मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले व त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती मंडळाला केली. तसेच, सर्व रिक्त पदावरील भरती तत्काळ सुरु करण्याची मागणी केली.
या बैठकीत गोरे यांनी वाढते प्रदूषण व बदलते वातावरणीय बदलामुळे वाढणाऱ्या कामाची व्याप्ती, तसेच सध्या उपलब्ध असलेले बोर्डातील मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत, मंडळातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी बोर्डाकडून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत विचार मांडले. मंडळातील २००९ मध्ये भरती केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांना पीएफ, सीपीएफ व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मागणी केली. मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा व मंडळाकडून कुंटुबाला अर्थ साहाय्याची तरतूद करण्याबाबतही विचार व्यक्त केले. राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी मंडळाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे सांगितले.
सध्या, प्राप्त अहवाल नुसार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या पायाभूत सुविधा, संसाधने आणि क्षमता प्रभावित कर्मचाऱ्यांची अपुरी मंजूर संख्या आणि विशेषकरून तांत्रिक पदांवर मोठ्या संख्येने रिक्त पदांसह अनेक कारणांमुळे प्रभावित होत असलेल्या प्रकरणांची सुनावणी करताना न्यायाधिकरणाने हे निर्देश दिले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांमध्ये मंजूर कर्मचाऱ्यांपैकी कमी संख्याबळ अस्तित्वात असल्याचे आढळून आले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच या विभागात नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाही आणि पदे रिक्त आहेत. यामुळे पर्यावरणविषयक समस्यांवर राज्य पातळीवरील नियामक यंत्रणेवर परिणाम होत आहे, असेही न्यायमूर्ती अरुणकुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. प्रत्येकच राज्यात ही पदे रिक्त असून बिहार, झारखंड आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशात रिक्त पदांचे प्रमाण अधिक आहे. कायद्याच्या अयोग्य अंमलबजावणीचे हे एक प्रमुख कारण आहे. समित्या आणि मंडळांमध्ये सुमारे एक हजार ९१ कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी १४६ आणि ४५० हे अनुक्रमे तांत्रिक आणि वैज्ञानिक पार्श्वभूमीचे आहेत. एवढे कर्मचारी जर कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत, तर नियमित भरतीत अडचण काय, असा प्रश्नदेखील विचारला. प्राधिकरणाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रदूषण नियंत्रण समिती प्रयोगशाळांमध्ये योग्य तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा ठपकाही प्राधिकरणाने ठेवला. सर्व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या सदस्य सचिवांना आजपासून सहा आठवड्यांच्या आत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांसमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले.
आतापर्यंत पूर्ण क्षमतेच्या नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत, इतकी मंजूर पदे का रिक्त आहेत याच्या स्पष्टीकरणासह रिक्त पदे भरली जातील आणि प्रयोगशाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले वेळापत्रक तयार केले जाईल, याचाही समावेश शपथपत्रात असावा, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
Comments are closed.