Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परराष्ट्र मंत्रालयात नोकरीची संधी; पदवीधर उमेदवारांना संधी

MEA Internship 2022

MEA Internship 2022 | internship.mea.gov.in 

MEA Internship 2022 : Graduate candidates will have the opportunity to do an internship under the Ministry of External Affairs of the Central Government. The application process has started and candidates will be able to fill out online applications till February 15, 2022. Further details are as follows:-

MEA Internship Program 2022

पदवीधर उमेदवारांना केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये इंटर्नशिप संधींच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्ताने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत एमईए इंटर्नशिप कार्यक्रमाचे (MEA Internship Program) पहिले सत्र सुरू केले आहे. मंत्रालयाच्या एमईए इंटर्नशिप धोरण २०२२ (MEA Internship Policy 2022) नुसार, उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामान्य लोकांमध्ये आणि इतर हेतूंसाठी परराष्ट्र धोरणाची समज विकसित करण्यासाठी इंटर्न म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या इंटर्नशिपचा कालावधी एक ते तीन महिन्यांपर्यंत असेल. उमेदवारांना यासाठी दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे.

Ministry of Foreign Affairs Bharti 2022

  • MEA द्वारे इंटर्नशिप अंतर्गत ७५ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
  • यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार इंटर्नशिप पोर्टलची अधिकृत वेबसाइट internship.mea.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • अर्जाची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

MEA Internship Policy 2022 Eligible Criteria 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार एमईए इंटर्नशिप २०२२ साठी अर्ज करता येणार आहे.
  • पदवी पूर्ण करण्यासाठी इंटर्नशिप अनिवार्य असलेले अंतिम वर्षाचे पदवीधर विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात.
  • इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर रोजी २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Ministry of External Affairs Internship 2021: Golden opportunity for degree holders. The Ministry of External Affairs has announced an internship policy for all the states in India.  परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. विविध मोहिमा व अभियानात आंतरवासिता करणारे तथा विदेशात कार्य करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या नीती धोरणांमध्ये हा आढावा घेताना कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Eligibility For MEA Internship 2021 – पात्रता 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी घेतलेले (Minimum degree from a recognized university)
  • 31 डिसेंबर रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे भारतीय उमेदवार  (Under 31 years of age on 31st December)

कमाल मर्यादा आणि कालावधी – Ceiling and Duration 

प्रत्येक वर्षी इंटर्नशिप सहा महिन्याच्या दोन सत्रांमध्ये दिली जाईल. जानेवरी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असे हे सत्र असतील. प्रत्येक सत्रामध्ये या मंत्रालयामार्फत कमाल ३० आंतरवासित घेतल्या जाईल. प्रत्येक आंतरवासितांसाठी सदर कार्यक्रम तीन महिन्यांचा असेल.

Ministry of External Affairs Internship 2021 Selection Process – निवड 

  • ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असेल.
  • प्रत्येक उमेदवाराला www.internship.mea.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रमाणीकरण करावे लागेल.
  • निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होईल – (प्राथमिक छाटणी आणि व्यक्तिगत मुलाखती)
  • उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन भरावे लागतील.
  • त्यानंतर राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल.
  • गुणवत्ता यादीनुसार निवडलेल्या उमेदवारांना दूरदृश्य संवाद प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

MEA Internship First Session – पहिले सत्र (जानेवारी ते जून) 

  • राज्य – मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिलनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल
  • केंद्रशासित प्रदेश – जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप पुडुचेरी

मानधन आणि हवाई तिकीट 

  • प्रत्येक इंटर्नला दर महिन्याला येण्याजाण्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल.
  • ही रक्कम हे ‘इकॉनोमिक क्लास’ साठी असेल आणि ती उमेदवार राहात असलेल्या राज्याच्या राजधानीपासून दिल्लीपर्यंत असेल किंवा त्याचे आधिवास राज्य किंवा तो ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकतो आहे तेथून दिल्लीपर्यंत असेल.
  • दिल्लीमध्ये आंतरवासिता कालावधीत राहण्याच्या तसेच जेवणाचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.

इंटरनचे ‘अंत्यवर्णन’

  • विदेश मंत्रालयाच्या आंतरवासिता कार्यक्रमासाठी निवड ही पूर्णपणे आवश्यक सुरक्षा नियमांच्या समाधानपूर्वक पालन करण्यावर आधारित असेल.
  • मंत्रालयाद्वारा कोणत्याही क्षणी कोणतेही कारण न देता आंतरवासिता रद्द केली जाऊ शकते.
  • याबद्दल मंत्रालयाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. एखाद्या इंटर्नला हा कार्यक्रम सोडून जायचे असल्यास एक आठवडा अगोदर मंत्रालयाला सूचित करावे लागेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड