JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आदिवासी विकास विभाग भरती निकाल लवकर जाहीर होणे अपॆक्षित!!! – Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2026

Maha Tribal Nagpur Result

Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2026: आदिवासी विकास विभागातील Watchman (चौकीदार) या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आदिवासी विकास विभाग ग्रुप ड  संवर्गातील उमेदवारांची रिस्पॉन्स शीट प्रसिध्द करण्यात आली आहे. आता उमेदवारांना निकाल आणि मेरिट लिस्ट जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. प्रपय माहिती नुसार या भरती प्रक्रियेच्या याद्या जाहीर करण्याचे काम अंतिम टप्यात असून लवकरच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतीक्षा संपणार आहे. या संदर्भात कोणतेही परिपत्रक किना निवेदन विभागाद्वारे जाहीर केले नाही, तरी प्राप्त माहिती नुसार हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.   या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीच्या या 👉लिंक वरून 🗨️व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा म्हणजे पुढील अपडेट्स आपल्या मिळत राहतील. 

 

आदिवासी विकास विभाग भरती Response Sheet (उत्तरतालिका) जाहीर, डाउनलोड लिंक 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Maha Tribal Nagpur Result

Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2025: आदिवासी विकास विभागातील विविध संवर्गांच्या सरळसेवा भरतीसाठी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार लघुटंकलेखक पदासाठी आयबीपीएसमार्फत १६ जानेवारी २०२५ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर १४ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

या पदासाठी पुढील टप्प्यात व्यावसायिक चाचणी घेतली जाणार असून, गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या व्यावसायिक पात्रतेची प्रमाणपत्रे स्पष्ट व वाचनीय PDF स्वरूपात अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या [email protected] या ई-मेल पत्त्यावर १० जानेवारी २०२६ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. याबाबत कोणताही विलंब होणार नाही याची खबरदारी उमेदवारांनी घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

लघुटंकलेखक भरती २०२४, गुणवत्ता यादी


 

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

आदिवासी विभागाच्या अधिनस्त असलेल्या ठाणे विभागातील क्षेत्रीय कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृह गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदांची पदभरती अनुषंगाने आदिवासी विकास विभागाच्या दि.०५/१०/२०२४ रोजीच्या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने पदभरती प्रक्रिया सुरु आहे. संदर्भ क्र.०५ अन्वये अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे विभागाच्या “प्रयोगशाळा सहायक” संवर्गाची निवडयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया २०२४ अंतर्गत “प्रयोगशाळा सहायक” संवर्गाच्या कागदपत्र तपासणी अंती सोबत जोडले प्रमाणे निवडसूची व प्रतीक्षासूची तयार करण्यात आली आहे. सदर निवडसूची व प्रतीक्षासूची आयुक्तालय, नाशिक यांचे संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

 

 पदभरती २०२४ “प्रयोगशाळा सहायक” संवर्गाची निवडसूची व प्रतीक्षासूची


अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती  गट – क संवर्गातील विविध पदांची पदभरती -२०२४

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक निवड समितीच्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सन २०२४ भरतीअंतर्गत अमरावती विभागातील वरिष्ठ लिपिक आणि सांख्यिकी सहाय्यक या संवर्गातील पदांसाठी प्रवर्गनिहाय अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. तथापि, या यादीतील काही प्रवर्गांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम निवड व प्रतीक्षा यादी रद्द करून नवीन सुधारित यादी तयार करण्यात आली आहे. प्रादेशिक निवड समितीने दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या बैठकीत मंजूर केलेली ही सुधारित अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आता प्रसिद्ध करण्यात येत असून ती या सूचनेसोबत संलग्न केली आहे. तसेच, वरिष्ठ लिपिक व सांख्यिकी सहाय्यक या संवर्गातील प्रवर्गनिहाय सुधारित अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://tribal.maharashtra.gov.in
उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक या पदाची सधारित अंतिम निवड व प्रतिक्षा सूची

 

 


 

 

राज्यात मागास वर्ग म्हणून नोंद असलेल्याआदिवासी वर्गाचे शासनातील नोकऱ्यामधील हक्क इतर वर्गाकडून हिसकावून घेण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे. अनुसूचित जमातीची खोटी प्रमाणपत्रे मिळवून १२,५०० लोकांनी शासकीय नोकऱ्या लाटल्याचा प्रकार घडला आहे. तसेच त्यांना सूट देऊन अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र या रिक्त झालेल्या जागा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकार भरायला तयार नसल्याची माहिती मिळत आहे.

 

गेल्या २० वर्षामध्ये आदिवासी प्रवर्गातून एकूण ६३ ६९३ कर्मचाऱ्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ५१,१७३ कर्मचाऱ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले व १२,५२० कर्मचारी आजमितीस हे प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत. अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या १२,५२० पदांवर अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पात्र उमेदवारांची नियुक्ती झाली की नाही, अशी विचारणा न्यायालयाकडून वारंवार झाली असली तरी अजूनही जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै, २०१७ रोजी जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग अथवा इतर मागासवर्ग या जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही. अशा व्यक्तींना शासकीय सेवेत दिलेले संरक्षण घटनेतील तरतुदींशी विसंगत ठरते. या न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरच अंमलबजावणी कशा प्रकारे व्हावी याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी व शासनास शिफारस करण्यासाठी ५ जून, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वयेआदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. सर्व विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव पदावर नियुक्ती दिलेल्या, तथापि, जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची तरतूद केली आहे.

 


 

वसतीगृहातील गट-क पदाकरीता जाहिरात क्र.१११/२०२३ परि.क्र.४.१८.१ अनव्ये प्रसिध्द करण्यात आलेली होती. सन २०२३ भरती प्रक्रीयेतील लिपिक टंकलेखक या पदाकरीता झालेल्या परिक्षेचा अंतिम दिनांक ११. जुलै २०२५ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदरचा निकाल संदर्भ क्रं. ४ अन्वये या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. उपरोक्त विषयानुसार अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग, नाशिक कार्यालयाच्या अधिनस्त गट-क संवर्गातील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सरळसेवेने भरणेवावत शासन निर्णय १ मधिल तरतुदीनुसार अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक कार्यालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील लिपिक टंकलेखक पदासाठी दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळावर दिनांक ११. जुलै २०२५ रोजी जाहिर झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक या पदाच्या उमेदवारांची शिफारस केल्यानुसार आपली निवड अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक विभागांतर्गत झालेली असुन उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यानुसार कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार संदर्भ क्र.२ मधील जाहिरातीनुसार उमेदवारांनी ऑनलाईन सादर केलेली माहितीचीच्या आधारे पडताळणी करीता मुळ कागदपत्र व त्यांचे एक सांक्षाकित प्रतीसह सोबतच्या यादीत १ ते ७० उमेदवारांनी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र (PRTC), पेठ रोड, आरटीओ ऑफीस जवळ, नाशिक-३ येथे दिनांक १३.८.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता न चुकता उपस्थित राहणेबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Adivasi Vikas Vibhag DV

 

 

दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. “वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहाय्यक” या सवंर्गाकरिता लेखी परिक्षा आय. बी. पी. एस. मार्फत दिनांक २०, २१ व २२ एप्रिल, २०२५ रोजी परिक्षा घेण्यात आली होती. अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती विभागातील “वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहाय्यक” या सवंर्गाकरिता लेखी परीक्षेत किमान (४५%) प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 

 

 


 

दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक पदाकरीता लेखी परीक्षा आय. बी. पी. एस. मार्फत दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेली आहे. सदर संवर्गाच्या लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादया यापूर्वी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १४ जून २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. व्यवसायीक चाचणी घेण्याकामी सदर यादीतील उमेदवारांनी जाहिरातीत नमूद व्यावसायीक शैक्षणिक पात्रतेचे दस्तऐवज सुस्पष्ट (वाचनीय) PDF स्वरुपात आदिवासी विकास आयुक्तालयाच्या खालील प्रमाणे रकाना क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या ई-ल आयडी वर पाठविण्यात याव्यात. दोन्ही पदासाठी (उच्चश्रेणी / निम्नश्रेणी) अर्ज केले असल्यास दोन्ही ई-मेल वर स्वतंत्र प्रमाणपत्र दिनांक २९ जुलै २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तसेच सोबत अर्जाचा नमुना सलग्न केला आहे.

 

यादी डाउनलोड करा

 


आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक व अधिनस्त असलेले अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयांकरीता ११ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर तज्ञ मनुष्यबळ नियुक्त करण्यासाठी दिनांक १५.०५.२०२५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक ३०.०५.२०२५ पर्यंत इच्छुक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पद निहाय अपात्र झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक १९.०६.२०२५ रोजी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येत आहे. तथापि दिनांक २७.०६.२०२५ सांय. ५.०० वा. पर्यंत अपात्र ठरलेल्या अर्जदार यांनी आपल्या हरकती नोंदविण्यासाठी [email protected] या ई-मेलवर मेल करण्यात यावा.

 

यादी डाउनलोड करा

 


 

आदिवासी विकास विभागातील गट-ब अराजपत्रित व गट-क संवर्गातील सुमारे ६११ विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील काही निकाल लागून त्यांची कागद पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. मात्र, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासह लघुटंकलेखक पदांचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नसून, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी लघुटंकलेखकपदासाठी परीक्षा घेण्यात आली. तर ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. परीक्षा या तीन सत्रात घेण्यात आल्या. २४ फेब्रुवारी रोजीच सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा सहायक व छायाचित्रकार (कॅमेरामन) व प्रोजेक्टर ऑपरेटर पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यांचे निकाल लागले. कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रियाही पार पडली.

 

मात्र, २४ फेब्रुवारी रोजीच दुपारच्या सत्रात पार पडलेल्या ग्रंथपाल व सहायक ग्रंथपाल पदांच्या परीक्षेचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नाही. तर अधीक्षक, प्रयोगशाळा सहायक, मुख्य लिपिक, स्त्री व पुरुष वॉर्डन आदींचे निकाल लागलेले आहेत. ६११ पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया आयबीपीएस संस्थेकडून राबवण्यात आली. या संस्थेशीही संपर्क केला असता निकालाशी संबंधित माहिती नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या संदर्भाने आदिवासी विकास मंत्री, त्यांचे स्वीय सहायक यांच्याशी दोन दिवस संपर्क करून, संदेश पाठवूनही त्यांच्याकडून निकालाची माहिती मिळू शकली नाही. तर ठाणे, अमरावती, नागपूर आदी विभागांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळ पाहात राहा, असे उत्तर दिले जात आहे.

 


दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. संशोधन सहाय्यक पदाकरीता लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. मार्फत दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेली आहे. अपर आयुक्त, नागपूर विभागातील संशोधन सहाय्यक या संवर्गाकरीता किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी  संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता. 

🆕चेक करा निकाल 

 

 


चेक करा निकाल 

Check Your Result PDF

 


आदिवासी विभाग भरतीचा निकाल आज १८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे . हि भरतीची दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होतो. गृहपाल पदाकरीता लेखी IBPS मार्फत पार पडलेली आहे. सद्यस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ ठाणे/नागपूर / अमरावती विभागनिहाय गृहपाल (स्त्री) या पदांकरीता किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या  जिल्ह्यातील यादी डाउनलोड करू शकता. 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड