महत्त्वाचे; CET आणि MPSC दोन्ही परीक्षा एकाच दिवशी!! जाणून घ्या सविस्तर माहिती
MHT CET Exam Details
MHT CET Exam
MHT CET Exam Details : B.Ed CET 2022 admission examination will be held from the 21st of August 2022 under State Common Entrance Test. However, since there is an examination of the Public Service Commission on the same day, the students who appeared for this examination will get a chance to change the batch and retake the examination. Students should mail to CET Cell to change the batch. Further details are as follows:-
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता बी.एड. सीईटी २०२२ या व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टपासून होणार आहे. मात्र याच दिवशी लोकसेवा आयोगाचीही एक परीक्षा असल्याने या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बॅच बदलून नव्याने परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी संबधित विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे ई-मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काही विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यावर पाटील यांनी या विद्यार्थ्यांना वेगळा पर्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर, सीईटी सेलने एक परिपत्रक जारी केले असून, त्यात २१ ऑगस्टला जे उमेदवार बी.एड. सीईटी परीक्षेसोबत ‘एमपीएससी’च्या पूर्वतयारी परीक्षेस बसलेले असतील, त्यांनी सीईटी कक्षास ई-मेलद्वारे दोन्ही बी.एड. सीईटी आणि ‘एमपीएससी’च्या पूर्वपरीक्षांचे प्रवेशपत्रासहित १८ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत higher4. [email protected] या ई मेल आयडीवर अर्ज व दोन्ही प्रवेशपत्रं पाठवावीत.
MHT CET परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर!! जाणून घ्या नवीन तारखा | MHT CET Exam Revised Timetable
MHT CET Exam Details: Important News for students preparing for MHT-CET exam. Maharashtra State Common Entrance (Maharashtra CET) has announced the revised timetable for MHT-CET Exam 2022. Further details are as follows:-
MHT-CET परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्वाची माहीती आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स (Maharashtra CET) द्वारे आयोजित करणाऱ्या सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे.
परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सविस्तर माहिती cetcell.mahacet.org या संकेत स्थळावर पाहू शकतात. परिक्षेच्या तारखांबद्दल आणि हॉलतिकिट(Hallticket) कधी जारी होणार याबद्दलची माहीतीही या संकेतस्थळावर (website) दिली आहे.
Important Dates For MHT-CET Exam
- सुधारित वेळापत्रकानुसार सीईटी परिक्षा 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.
- MHT-CET PCM ग्रुपच्या परिक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या वेळात तर PCB या ग्रुपच्या परिक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.
- पीसीएम (PCM Group) च्या ग्रुपचे हॉलतिकिट 26 जुलै रोजी जारी करण्यात येईल तर पीसीबी (PCB Group) ग्रुपचे हॉलतिकिट 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येईल.
सध्या अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात. पण पुढील वर्षापासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी जाहीर करताना बारावीच्या गुणांना आणि सीईटी परिक्षेतील कामगिरीला समान महत्व दिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना बारावीतही चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. दरम्यान, बारावी बोर्ड आणि सीईटी या दोन्ही परिक्षांच्या गुणांवर विद्यांर्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या गुणांवरूनच वि़द्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेचा देखील चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. तर सीईटी परिक्षेसंंबंधी अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
MHT CET PCM-PCB Application Corrections
MHT CET Exam Details: Good news for students who register for MHT-CET. Students registered for the MHT-CET exam will be given an opportunity as a special case under the State Common Entrance Examination Cell to improve their application. Students can correct their applications between 23rd June to 30th of June 2022. Further details are as follows:-
MHT CET PCM-PCB अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी!! त्वरा करा
येत्या ऑगस्टमध्ये होऊ घातलेल्या सीईटी परीक्षेसाठी तब्बल ११ लाख ६३ हजार २७० विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे. बी.एड. (संयुक्त) आणि एम.पीएड, सीईटीसाठी अर्ज नोंदणी अद्यापही सुरू असून, शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान स्वत:च्या लॉगीनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.
एमएचटी-सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ६ लाख ६ हजार १४२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान बदल करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
MHT CET Registration Correction Window Open
MHT CET Exam Details : Latet update for students who register for Academic Years 2022-23 MHT CET. Students will be able to modify the application from their own login between 23rd and 30th June. Further details are as follows:-
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान आपल्या स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ६ लाख ६ हजार १४२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे. काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनवधानाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे दूरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजे (पीसीएम व पीसीबी बदल) भरलेल्या अर्जात बदल करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, ग्रुप बदल करता येणार आहे. ही सुधारणा विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान स्वत:च्या लॉगिनमधून करायची असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
MHT CET 2022 Delay
MHT CET Exam Details : The CET exam has been postponed, the cell said. In fact, the NEET exam will be held on July 17, while the JEE Main exam will be held on June 20 to 29 (first session) and July 21 to 30 (second session). Further details are as follows:-
सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सेलकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात नीटची परीक्षा १७ जुलैला, तर जेईई मेन परीक्षा २० ते २९ जून (प्रथम सत्र) आणि २१ ते ३० जुलै (दुसरे सत्र) होणार आहे. त्यामुळे हे दिवस वगळता ‘सीईटी सेल’ला विविध सीईटी परीक्षा घेणे शक्य होते. मात्र, ‘सीईटी सेल’ने सर्वच सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात ढकलल्या आहेत.
- ‘सीईटी सेल’कडून इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर, एमसीए अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण १५ सीईटी (MHT CET) परीक्षा घेण्यात येतात.
- या परीक्षांद्वारे सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश होतात.
- या परीक्षांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, सेलच्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा जूनमध्ये होणार होत्या.
- मात्र, जेईई आणि नीट परीक्षा जून-जुलै महिन्यात होत आहेत.
- त्यामुळे एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सेलकडून सांगण्यात आले आहे.
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीदेखील जेईई मेन आणि नीट परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले.
- प्रत्यक्षात नीटची परीक्षा १७ जुलैला, तर जेईई मेन परीक्षा २० ते २९ जून (प्रथम सत्र) आणि २१ ते ३० जुलै (दुसरे सत्र) होणार आहे.
- त्यामुळे हे दिवस वगळता ‘सीईटी सेल’ला विविध सीईटी परीक्षा घेणे शक्य होते.
- मात्र, ‘सीईटी सेल’ने सर्वच सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात ढकलल्या आहेत.
- अनेक खासगी विद्यापीठांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, प्रवेशप्रक्रियांचे नियोजन केले आहे.
- खासगी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रिया जून-जुलै महिन्यात पूर्ण होऊन, ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल.
- त्यामुळे ‘सीईटी सेल’च्या लांबणाऱ्या प्रवेशप्रक्रियांची वाट न पाहता, विद्यार्थ्यांना नाइलाजाने जादा शुल्क भरून खासगी विद्यापीठांत प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
- अशा वेळी ऑगस्टमध्ये परीक्षा होऊन, त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘सीईटी सेल’च्या प्रवेश प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे.
- सीईटी परीक्षांसाठी विक्रमी विद्यार्थ्यांची नोंदणी होऊनसुद्धा, त्याचा फायदा सीईटी सेल, महाविद्यालये आणि राज्यातील विद्यार्थ्यांना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारावीचा निकाल वेळेत; प्रवेशप्रक्रियेला विलंबच
Results of State Board XII examinations will be announced by June 10. It is then possible to implement the admission process by planning the CET exams immediately. The CET Cell had also planned for this purpose. However, due to the change in the dates of NEET and JEE Main examinations, it is being submitted that the schedule has been changed. The CET examinations for professional postgraduate courses are conducted on the merits of these degree courses. However, the postponement is surprising.
राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया लांबल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थी आणि महाविद्यालयांना बसेल. जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखा वगळून राज्यातील सीईटी परीक्षा होणे शक्य आहे, असे संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या बैठकीत ठरले. त्यानुसार या परीक्षा घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
– प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया
CET Exam Online Application Deadline Extended
MHT CET Exam Details : The process of online registration for various entrance examinations conducted by the Maharashtra State Common Entrance Examination Cell (CET Cell) under the Technical Education Department has been extended. Similarly, students who want to appear for the CET exam will be able to apply online till May 11, the CET cell said. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम.एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
- ही मुदतवाढ अंतिम असून या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
MHT CET 2022 Postponed
MHT CET Exam Details: All the common entrance exams conducted by the state’s CET cell have been postponed. This decision has been taken due to the ‘JEE’ and ‘Neat’ examinations conducted by the Central Government. According to the CET cell, the exams will be held in August. Further details are as follows:-
राज्याच्या सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाइक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता ऑगस्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सीईटी’ सेलकडून (CET Cell) जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आठवडाभरातच हा निर्णय बदलण्यात आला असून, आता ऑगस्ट महिन्यात परीक्षा होणार असल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पुढे गेल्याने प्रवेशांची प्रक्रियाही लांबणार असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार आहे.
- नव्या वेळापत्रकानुसार दोन ते २५ ऑगस्टदरम्यान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’चे आयोजन केले जाणार आहे.
- ‘जेईई,’ ‘नीट’परीक्षा आणि विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमुळे जुलै महिन्यातील वेळापत्रक बदलून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल होती.
- त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तीन महिन्यांहून अधिक वाट पहावी लागणार आहे.
- परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार असल्याने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.
These admissions will continue till the month of November. This makes it clear that the students’ academic year will once again start late. Due to the outbreak of Corona last year, the examinations and admission process were delayed. The students hoped that the entrance exams would be held on time this year. However, as the CET will be extended this year, students, as well as higher education institutions, will be upset.
मंत्र्यांचे आश्वासन हवेतच
यंदा ‘सीईटी’ परीक्षा कोणत्याही परिस्थितीत वेळेतच होतील आणि जुलै ते सप्टेंबर दरम्यान शैक्षणिक वर्ष सुरू होईल, अशी ग्वाही काही महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. ही घोषणा आता हवेतच विरली असून, परीक्षांना उशीरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घोषणा करताना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘जेईई’ परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही परीक्षा ‘सीईटी’च्या आधीच्या वेळापत्रकाच्या तारखांच्या दिवशीच येण्याची शक्यता होती. यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ‘सीईटी’ सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
MHT CET 2022
MHT CET Exam Details: The state’s MHT CET 2022 exam will be held in August. Higher and Technical Education Minister Uday Samant has clarified that the CET examination will be held in the state after passing both the sessions of the JEE Main examination and the examination. Further details are as follows:-
राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेची दोन्ही सत्रं आणि नीट परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील सीईटी परीक्षा होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
- सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे.
- अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत.
- जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून तर दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.
JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल.. तारखा लवकरच जाहीर करू.
— Uday Samant (@samant_uday) April 21, 2022
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते.
Table of Contents
Mhcet आता देत येईल का आता पास आऊट झालोय
Ycmou la admission ahe ka