म्हाडा मुख्य परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट!!- MHADA Exam 2022
Mhada Exam 2022
MHADA Main Exam 2022
MHADA has rejected the demand of the MPSC Coordinating Committee to conduct the main examination of those selected to prevent bogus recruitment. MHADA has clarified that other measures are being taken to prevent bogus recruitment instead of conducting the main examination. Further details are as follows:-
मुख्य परीक्षेची मागणी फेटाळली
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बोगस भरती रोखण्यासाठी निवड झालेल्यांची मुख्य परीक्षा घ्यावी ही एमपीएससी समन्वय समितीची मागणी म्हाडाने फेटाळली आहे. मुख्य परीक्षा घेण्याऐवजी बोगस भरती टाळण्यासाठी इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण परिक्षार्थी मात्र मुख्य परीक्षा घ्यावी या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी आता उचलून धरण्यात येईल अशी माहिती एमपीएससी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी दिली.
तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय
तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दोषी आढळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात निवड झालेला उमेदवार असल्यास त्याची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.
MHADA recruitment exam was recently conducted online. There was something wrong with it. A total of nine cases have been registered across the state during the examination period. Eight of the offenses are against puppet candidates; So a crime is against the examinee who is carrying a mobile. .
- ५६५ रिक्त जागांसाठी टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या.
- परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी म्हाडाने ऑनलाइन पद्धतीने टीसीएसच्या मदतीने परीक्षा घेतल्या.
- तरीही यात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समिती करीत आहे.
- या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असू शकते असे म्हणत एमपीएससीच्या धर्तीवर मुख्य परीक्षा घेण्याची तसेच गैरप्रकाराची विशेष तापणसी पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे.
परीक्षेच्या काळात एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड, पवई, सातारात, नागपुरात प्रत्येकी एक, अमरावती ३, नाशिकमध्ये २ अशा ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. टीसीएस आणि म्हाडाच्या सतर्कतेमुळेच तोतया उमेदवारांना, तर मोबाइल बाळगणाऱ्या उमेदवाराला अटक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी परीक्षेतील गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याचे आरोप नाकारले आहेत. मात्र चुकूनही बोगस भरती होऊ नये यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानुसार परीक्षार्थीचा अर्जातील फोटो, परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात आलेला फोटो, केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे परीक्षार्थीच्या हालचाली, निवड झाल्यास कागदपत्र पडताडणीसाठी आल्यानंतर घेण्यात येणारा फोटो तसेच अंतिम निवडपत्र घेण्यासाठी आल्यानंतर घेण्यात आलेले छायाचित्र या सर्व बाबींची तपासणी होणार आहे. या तपासणीत कोणत्याही टप्प्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तर अंतिम टप्प्यात दोषी आढळणाऱ्याची निवड रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Mhada Exam 2022
Mhada Exam 2022 : The recruitment examination has started for 565 vacancies in MHADA. Accordingly, the examination for the post will be held on Monday. Monday’s paper will be on schedule, MHADA clarified. Further details are as follows:-
म्हाडातील ५६५ रिक्त जागांसाठी भरती परीक्षा सुरु आहे. त्यानुसार सोमवारी अतांत्रिक पदासाठीचा परीक्षा घेण्यात येणार आहे. सोमवारचा पेपर वेळापत्रकानुसारच होईल, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
Mhada Online Exam 2022
Mhada Exam 2022 : Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) will now conduct online examination for filling 565 posts in technical and non-technical cadres in direct service recruitment. The exam will be held from January 31 to February 9. Further details are as follows:-
म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam)वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा (MHADA Offline Exam) आता ऑनलाईन पद्धतीने (MHADA Online Exam) होणार आहे. ही परीक्षा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर (Exam Center) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर (MHADA Secretary Rajkumar Sagar) यांनी दिली.
म्हाडा प्रवेश पत्र डाउनलोड करा! । MHADA Hall Ticket 2022! @mhada.gov.in
म्हाडा प्रशासनाद्वारे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सरळ सेवा परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक रित्या राबवत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये. अशा प्रकारे जर कोणी प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींची तक्रार म्हाडा प्रशासन, म्हाडा दक्षता व सुरक्षा विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न (MHADA recruitment exam paper Leak) झाल्याने यापूर्वी म्हाडाला ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली होती. यामुळे म्हाडाने ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकाबाबत काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरकरिता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली आहे, त्या क्लस्टरकरिता नॉर्मालिसेशन प्रोसेस (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_2021-dtd-14-1-2022.pdf) पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सागर यांनी दिली आहे.
Mhada Exam -Important Instruction
Mhada Exam 2022 : For MHADA Saralseva Recruitment 2021 The examination will be held on the 7th day like 31st January 01, 02, 03, 07, 08 & 09 February 2022 and the schedule of the examination has already been published. Important instructions are being given to the candidates for the online MHADA direct service examination. Further details are as follows:-
Mhada भरती परीक्षेकरिता महत्त्वाच्या सूचना, जाणून घ्या
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि. ३१ जानेवारी ०१, ०२, ०३, ०७, ०८ & ०९ फेब्रुवारी २०२२ अशा एकूण ७ दिवशी परीक्षा होणर असून परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या म्हाडा सरळसेवा परीक्षेकरीता उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. अधिक माहिती करीता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3ABAhVu
MOCK TEST – https://bit.ly/3ABAhVu
Mhada Bharti Exam 2022
Mhada Exam 2022 : The online examination for MHADA Saralseva Recruitment 2021 will be conducted in seven phases. The online test will be conducted in clusters 1, 4, 6 and 7 in more than one session. Further details are as follows:-
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करिता सात टप्प्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये क्लस्टर १, ४, ६ व ७ करिता एका पेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. यास्तव या क्लस्टर्सची वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेल्या परीक्षांची काठीण्य पातळी तपासून गुणांकन करताना Mean Standard Deviation Method (पद्धत) वापरण्यात येईल. Mean Standard Deviation Method या पद्धतीने Normalosation करण्याचा Farmula उमेदवारांच्या माहितीकरीता सोबत देण्यात येत आहे.
महत्त्वाचे – म्हाडा भरतीचे परीक्षा शुल्क मिळणार परत, जाणून घ्या
Mhada Exam 2021 Update
Mhada Exam 2021 : Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA), Mumbai has started the recruitment process for various posts (mhada exam 2021). Executive Engineer (Architecture), Deputy Engineer (Architecture), Administrative Officer, Assistant Engineer (Architecture), Assistant Legal Consultant, Junior Engineer (Architecture), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Clerk, Clerk, Clerk A total of 535 tracer vacancies are available.
MHADA आज होणारी आणि पुढील सर्व परीक्षा पोस्टपोन झाल्या ! @mhada.gov.in
MHADA परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा !
Mhada Bharti 2021 | Mhada Recruitment 2021
Mhada परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट; “वेळ आली तर परीक्षा रद्द करणार” – १२ डिसेंबरपासून म्हाडाच्या परीक्षा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ”कृपया अफवांना बळी पडू नका.अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा पार पडणार असून यात गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल,” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
”या परीक्षेबाबत राज्यात अफवा पसरविल्या जात आहेत. असा गैरप्रकार करणाऱ्या कोणी पकडून दिले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पास झालेल्यांची दुसरी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आपण दिलेले पैसे वाया जातील,” असे आव्हाड यांनी सांगितले. त्यांनी यााबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.
There are complaints that some people are taking money in Nashik, Ashti and Akola. Don’t fall prey to such deceptions. No Vashila will run in these exams. The housing department will not allow such practices. These posts will be filled in a transparent manner. If some people with criminal tendencies are taking advantage of this and taking money from them, do not apply my request to the students, because if the time comes, I will cancel the exam, “said Awhad.
Table of Contents