म्हाडा सरळ सेवा भरती नवीन अपडेट | MHADA Bharti 2022

MHADA Bharti 2022

MHADA Bharti 2022 – Latest Update

MHADA Bharti 2022: The latest update for MHADA Recruitment 2022. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१ मधील पात्र, नियुक्त उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ४२१ जणांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे. यासाठीच्या नियुक्ती पत्राचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

म्हाडा सरळ सेवा भरती 2021 – कागदपत्र पडताळणी यादी जाहीर (दुसरा टप्पा)

MHADA Recruitment 2022MHADA Bharti 2022


Previous Update –

म्हाडा 565 पदभरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर; येथे करा डाउनलोड

MHADA Bharti 2022: Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) has been declared the selection & waiting list of 14 technical and 565 non-technical cadre vacancies. Click on the below link to download the list.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत 14 तांत्रिक व 565 अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता परीक्षा घेण्यात आली होती. सदर भरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने माहे जानेवारी २०२२ व फेब्रुवारी २०२२ मध्ये १४ तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरीता परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेतील गुण व कागदपत्र तपासणी अंती पात्र ठरुन निवडसूचीवर घेतलेल्या तसेच प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आलेल्या उमेदवारांची सूची या सूचने सोबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर निवडसूची व प्रतिक्षायादी जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवारांनी समांतर आरक्षणांतर्गत सादर केलेली प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. यास्तव सदर यादी तात्पुरती (Provisional) स्वरुपाची आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3qHRbgU


महत्त्वाचे – म्हाडा सोडतीतील प्रतीक्षा यादी रद्द!! जाणून घ्या – MHADA Bharti 2022

MHADA Bharti 2022: Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) Recruitment waiting list new update. As per the latest news, The waiting list for successful candidates in the lottery drawn under various boards of the Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has now been canceled. Further details are as follows:-

MHADA Recruitment 2022 – Waiting List Canceled

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या विविध मंडळांतर्गत काढण्यात येणाऱ्या सोडतीत यशस्वी उमेदवारांसह जाहीर करण्यात येणारी प्रतीक्षा यादी आता रद्द करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी हेच म्हाडा सोडतीच्या यापूर्वीच्या भ्रष्टाचाराचे कारण होते, अशी स्पष्टोक्ती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमातून दिल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फसवणुकीतून दिलासा मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे म्हाडा अधिकारी आणि दलालांचे संगनमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

म्हाडा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यादी रद्द करण्याचे धोरण केवळ औरंगाबाद मंडळाच्या सोडतीसाठी लागू असून इतर विभागीय मंडळांसाठी निर्णय प्रलंबित आहे. मुंबई, पुणे, अमरावतील, नाशिक, कोकण या मंडळांच्या सोडतीतील प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला असून त्यावर अजूनही प्राधिकरणाकडे मंजुरी देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत पार पडणाऱ्या बैठकीत प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय मंडळाच्या माध्यमातून सोडत काढण्यात येते. म्हाडाच्या प्रत्यक्ष व संगणकीकृत सोडतीदरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच यशस्वी अर्जदारांबरोबरच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची यादीदेखील जाहीर करण्यात येते. जितके यशस्वी अर्जदार तितकेच प्रतीक्षा यादीवरील अर्जदार असे स्वरूप यादीचे असल्याने यशस्वी अर्जदारांपैकी एखादा अर्जदार पात्रता निकषात न बसल्यास प्रतीक्षा यादीवरील अर्जदार सदनिकेसाठी पात्र होत असे. या कार्यपद्धतीमुळे अनेकदा एका वर्षापेक्षाही अधिक काळानंतर प्रतीक्षा यादीतील अर्जदार सदनिकेसाठी पात्र ठरत असत.

MHADA Bharti 2022


MHADA Bharti 2022 – Second and Third Phases Document Verification

MHADA Bharti 2022:  MHADA announces the second and third phases for document verification of eligible candidates. The document verification for the Assistant Legal Consultant, Property Manager / Administrative Officer, Assistant Architect, Civil Engineering Assistant, Surveyor, Tracer & Shorthand Writer Cadre posts. Eligible candidates may present for the document verification at the mentioned on the 9th & 10th of June 2022. Further details are as follows:-

म्हाडा सरळसेवा भरती पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दुसरा व तिसरा टप्पा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०९ जून व १० जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.

 • पदाचे नाव – सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक
 • कागदपत्र पडताळणी तारीख – ०९ जून व १० जून, २०२२
 • पत्ता – म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात

MHADA Recruitment Second and Third Phases Document Verification 

 • तसेच कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक १४ जून ते १७ जून, २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
 •  कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक, सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या  संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित केलेल्या दिवशी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही  म्हाडा प्रशासनाने केले आहे.
 • वरील नमूद संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.
 • सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून यशस्वी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

यादी डाउनलोड – https://bit.ly/3LMh8nP


MHADA Bharti 2022 – Document Verification

MHADA Bharti 2022: Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has published the category wise list on the MHADA website for the verification of documents of successful candidates in the online examination conducted under Direct Service Recruitment-2021. Under the first phase, the documents of successful candidates in the categories of Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer and Junior Engineer will be verified at the MHADA Headquarters at Bandra East for a period of two days on 6th and 7th June 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. यादी खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावे.

कागदपत्रे पडताळणीचा तपशील

सोमवार, ६ जून

पहिले सत्र : सकाळी १० वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते १० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील १ ते १४ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते २४ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील १ ते ७५ क्रमांकांचे उमेदवार

दुसरे सत्र : दुपारी २ वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील ११ ते २० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील १५ ते २७ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील २५ ते ४८ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील ७६ ते १५० क्रमांकांचे उमेदवार

मंगळवार, ७ जून

पहिले सत्र : सकाळी १० वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील २१ ते ३० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील २८ ते ४१ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील ४९ ते ७२ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील १५१ ते २२५ क्रमांकांचे उमेदवार

दुसरे सत्र : दुपारी २ वाजता

 • -कार्यकारी अभियंता संवर्ग- सूचीतील ३१ ते ४० क्रमांकांचे उमेदवार
 • -उपअभियंता संवर्ग- सूचीतील ४२ ते ५४ क्रमांकांचे उमेदवार
 • -सहायक अभियंता संवर्ग- सूचीतील ७३ ते ९५ क्रमांकांचे उमेदवार
 • -कनिष्ठ अभियंता संवर्ग- सूचीतील २२६ ते २९७ क्रमांकांचे उमेदवार

MHADA Recruitment 2022

 • भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 • कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.
 • म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
 • 6 जून रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 10 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
 • तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 14 उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 1 ते 24 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
 • तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 11 ते 20 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 15 ते 27 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 25 ते 48, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 76 ते 150 उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

7 जून रोजी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 21 ते 30 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 28 ते 41 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 49 ते 72 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 151 ते 225 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 31 ते 40 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 42 ते 54 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 73 ते 95 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 226 ते 297 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

MHADA Secretary Rajkumar Sagar has appealed to the candidates who are in more than one category in the list of Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer and Junior Engineer to submit their documents for verification at the same time.

कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

कागदपत्र पडताळणी यादी – https://bit.ly/3LMh8nP


MHADA Bharti Examination Fees 

MHADA Bharti 2022: The examination fee for 565 vacancies of MHADA is being refunded due to the cancellation of the examination to be held in December. After four and a half months, MHADA has started refunding the examination fees and one lakh two thousand candidates have been relieved. Further details are as follows:-

म्हाडा भरती परीक्षा रद्द केल्याने परीक्षा शुल्क मिळणार परत

म्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. अखेर साडेचार महिन्यांनंतर ‘म्हाडा’ने परीक्षा शुल्क परत करण्यास सुरुवात केली असून एक लाख दोन हजार परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे. 

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा

म्हाडा लेखी परीक्षेला अनुसरून मॉक टेस्ट/ Full Test सिरीज

 • म्हाडा’मधील ५६५ पदांसाठी सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले होते.
 • या भरतीसाठीच्या परीक्षेला सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच अचानक परीक्षा रद्द करण्यात आली होती.
 • परीक्षेत गैरप्रकार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यापुढे झालेल्या पोलीस कारवाईनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
 • अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्याचा त्रास परीक्षार्थीना झाला.
 • त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली.
 • मात्र या घोषणेची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नव्हती.
 • आता मात्र ‘म्हाडा’ने शुल्क परतावा करण्यास सुरुवात केली आहे.
 • परीक्षार्थीच्या बँक खात्यात याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे.

परताव्याची रक्कम ३.६४ कोटी 

 • ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व परीक्षार्थीना शुल्क परतावा केला जात नसून परीक्षा रद्द झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्यांची परीक्षा होती, त्यांनाच शुल्क परत करण्यात येत आहे.
 • या परीक्षार्थीची संख्या एक लाख दोन हजार आहे.
 • परताव्याची एकूण रक्कम तीन कोटी ६४ लाख रुपये आहे.

MHADA Recruitment 2022 Documents Verification

MHADA Bharti 2022: In order to make the recruitment process transparent, MHADA has decided to check the log details of all the candidates who are called for the examination of documents. Based on that, the behavior of the candidates will be checked. Further details are as follows:-

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तीन उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने कागदपत्र तपासणीकरिता बोलावण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे उमेदवारांची वर्तणूक तपासली जाणार आहे. संशयास्पद उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णयही म्हाडाने घेतला आहे.

म्हाडा प्राधिकरणामधील विविध संवर्गांतील ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल म्हाडाने जाहीर केला आहे. भरतीमध्ये कोणत्याही गैरप्रकाराबाबत म्हाडाने असहिष्णू धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार केलेल्या उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली आहे. तपासात ज्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत त्यांची माहिती पोलिसांना पुरवण्यात येत आहे.

कागदपत्र तपासणीकरता येणाऱ्या उमेदवारांची छायाचित्रे आणि दोन्ही हातांचे ठसे घेण्यात येईल. अर्ज भरताना अपलोड करण्यात आलेले आणि परीक्षा केंद्रावर काढलेले छायाचित्र व स्वाक्षरी जुळवून पाहण्यात येणार आहे. छायाचित्र-स्वाक्षरी जुळत नसेल तर अशा उमेदवारास संशयास्पद यादीत ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची कार्यवाही उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता येईल त्या वेळीही करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी सहकार्य करावे

गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना योग्य ती शिक्षा व्हावी. गुणवान उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांनी म्हाडा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.


MHADA Bharti 2022 | MHADA Recruitment 2022

MHADA Bharti 2022 : Housing Minister Jitendra Avad has instructed the candidates to return the Exam Fee. But now the MHADA authority is considering refunding the fee only to the candidates on the first day of the examination. A final decision on the decision will be taken soon, sources said. Further details are as follows:-

महत्त्वाचे – म्हाडा 565 पदभरतीची परीक्षा होणार ऑनलाईन!!

Mhada भरती परीक्षेकरिता महत्त्वाच्या सूचना, जाणून घ्या

MHADA Bharti Application Fees

म्हाडा भरती (Mhada Recruitment 2022) परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द (Mhada Exam Cancel) केली. यामुळे उमेदवारांना (Candidate) त्रास सहन करावा लागला. उमेदवारांना परीक्षा शुल्क (MHADA Bharti 2022 Exam Fee) परत (Return) देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avad) यांनी दिले आहेत. मात्र आता केवळ परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाचे – म्हाडा प्रवेश पत्र डाउनलोड करा! । MHADA Hall Ticket 2022! @mhada.gov.in

Mhada भरती परीक्षेचे गुणांकन Mean Standard Deviation Method पद्धतीने, जाणून घ्या 

GS Software was selected to fill 565 vacancies in 14 different categories on the establishment of Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA). Three lakh candidates have applied for these posts. Examinations for these posts were held on December 12, 15, 19 and 20 in two sessions.

One lakh 2 thousand 400 candidates were to sit for the examination in both the sessions held on Sunday (12th). According to the examination schedule announced by MHADA, the candidates reached the examination centers from a distance. However, MHADA canceled the examination as soon as the case of tearing paper came to light. This angered the candidates who reached the examination centers from afar.

उमेदवार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ही परीक्षा म्हाडामार्फत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसेच केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Z says

  Selection List

 2. Sandesh kakde says

  Mala mhanda me exam Dena hay

 3. Vishwajeet chalke says

  माझा मोबाईल हरवला आहे माझा लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्यामधे होता मला म्हाडा भरतीचे प्रवेशपत्र कसे मिळेल कृपया सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड