Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जलसंपदा विभागातील व्यावसायीक परीक्षेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे। META Nashik Bharti 2024

META Nashik Bharti 2024

META Nashik Bharti 2024

META Nashik Bharti 2024: Subject-wise professional examination of officers in the cadre of Dam & Canal Inspection, Construction, Design and other in Public Works Department is scheduled to be conducted through the office of Maharashtra Engineering Training Prabodhini, Nashik. It should be noted that the officers with deficient / temporary / ad hoc promotion should not send application form for the said examination. The said META Nashik Bharti 2023 instructions regarding admission application, admission application form etc. Information is available on Prabodhini’s website. Interested candidates should call for an admission application form from the controlling officer or From Prabodhini’s (Meta) website. Know More details about META Nashik Professional Exam Bharti 2024, META Nashik Recruitment 2024, WRD META Exam 2024 details is given below:

वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम केवळ PWD संवर्गातील धरण व कालवे निरीक्षण, बांधकाम, आराखडा व इतर संवर्गातील अधिकाऱ्यांची  व्यावसायीक परीक्षेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. सन 2024 च्या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज पूर्ण पणे भरुन ऑनलाईन दिलेल्या लिंक द्वारे सबमिट करावे..सदर नियोजित वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात व्याख्यात्यांची उपलब्धता व प्रशिक्षणार्थीच्या नामांकन संख्येनुसार आवश्यकता भासल्यास बदल करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Regarding allowing examination of provisionally promoted officers for professional examination in Group-A cadre – Circular

व्यावसायिक परीक्षेसाठी परिपत्रक View

 


META Nashik Assistant Executive Engineer Bharti 202३

META Nashik Bharti 2024: Applications are invited for the professional examination of Group-A Cadre Assistant Executive Engineer (Civil) and Assistant Engineer Grade 1/ Sub-Divisional Engineer/ Sub-Divisional Officer / Deputy Engineer (Civil/Mechanical/Electrical). The said professional examination will be conducted at the centers Pune, Nashik, Nagpur at the following scheduled time.

गट-अ संवर्गातील सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता श्रेणी १/ उपविभागीय अभियंता / उपविभागीय अधिकारी / उप अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) यांच्या व्यावसायोक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण वेळापत्रक खालील लिंकद्वारे तपासा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ ते ४ अन्वये गट-अ संवर्गातील सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता श्रेणी १/ उपविभागीय अभियंता/ उपविभागीय अधिकारी /उप अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) यांच्या व्यावसायीक परीक्षेसाठीचे प्रवेश अर्ज मागविणेत आलेले होते. सदर व्यावसायीक परीक्षा पुणे, नाशिक, नागपूर या केंद्रावर खालील नियोजीत वेळेत घेण्यात येणार आहे.

टिप- परीक्षा सुरु होण्याच्या १ (एक) तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाणे बंधन कारक आहे. यांची सर्वांनी नाँद घ्यावी. तरी उपरोक्त वेळापत्रकानुसार व्यावसायीक परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेचे प्रवेशपत्र Down Load करण्याची Link या https://wrd.maharashtra.gov.in/Site/१४७६/Maharashtra-Engineering-Training- Acadamy संकेत स्थळावर परीक्षेच्या चार दिवस अगोदर उपलब्ध करण्यात येईल. यांची सर्व परीक्षार्थी / अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

META Nashik Exam Date 2024

 


META Nashik Bharti 2023

Regarding allowing examination of provisionally promoted officers for professional examination in Group-A cadre – Circular

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक तर्फे दरवर्षी विविध संवर्गाची व्यावसायीक परीक्षा घेतल्या जातात. सन २०२३ मध्ये नियाजीत असलेल्या गट-अ संवर्गाच्या व्यावसायीक परीक्षेबाबत संदर्भ क्र. १ अन्वये परिपत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
सदर परिपत्रकामध्ये “अभावित / तात्पुरती / तदर्थ पदोन्नती असलेल्या अधिका-यांनी सदर परिक्षेसाठी अर्ज पाठवू नये यांची नोंद घ्यावी.” असे नमुद करण्यात आलेले आहे.
“परंतु संदर्भ क्र. २ अन्वये सार्वजनिक बांधकाम विभामार्फत या कार्यालयास प्राप्त झालेल्या आदेशानुसार सदर परिक्षेस नियमित व तात्पुरती पदोन्नती (Regular / Temporary Promotion ) देण्यात आलेल्या उप अभियंता संवर्गातील अभियंत्यांना परीक्षेस बसण्यासाठी अनुमती देण्यात येत आहे.
तरी ज्या अधिका-यांची पदोन्नती नियमीत अथवा तात्पुरती असेल अशा अधिका-यांनी सदर परीक्षेसाठी दि. ०९/१०/२०२३ पर्यंत आपले प्रवेश अर्ज या कार्यालयास पाठवावेत. प्रवेश अर्जा सोबत प्रत्येक अधिका-यांने शासनातर्फे निर्गमित झालेला पदोन्नतीचा आदेश जोडणे बंधनकारक राहील. पदोन्नतीचे आदेश जोडले नसल्यास प्रवेश अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

परीक्षार्थीस ज्या विषयांच्या परीक्षेस बसावयाचे आहे त्या विषयांची नांवे :

META Nashik Bharti 2023

How To Apply For META Nashik Bharti 2023

सूचनापत्र-
व्यावसायिक परीक्षेस प्रवेश अर्ज भरण्यासंबंधी सविस्तर सूचना
सदर सूचनापत्र अर्जासोबत पाठवू नये.
१) प्रवेश अर्जासाठी विहित नमुन्याची टंकलिखीत अगर छायांकित प्रत वापरावी.
२) प्रवेश अर्जावर आणि परीक्षा प्रवेशपत्रावर परीक्षार्थीने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो दर्शविलेल्या जागी चौकोनामध्ये चिकटविणे आवश्यक आहे. सदर फोटोवर संबंधीत का. अ./अ.अ. यांचा साक्षांकनासाठी सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
३) परीक्षार्थीने संपूर्ण नांव ठळक अक्षरांत मराठी आणि इंग्रजीत (प्रथम लिपीत) लिहावयाचे आहे.
४) परीक्षार्थीने (मूळ सेवापुस्तकातील नोंदीप्रमाणे) त्याची जन्मतारीख लिहावी.
५) परीक्षार्थीने ज्या शासकीय आदेशानुसार पदोन्नती / नियुक्ती देण्यांत आली त्या आदेशाचा दिनांक व क्रमांक नमूद करावयाचा आहे.
६) परीक्षार्थी शासनाच्या जलसंपदा / सार्वजनिक बांधकाम विभागाव्यतिरीक्त इतर अशासकीय / निमशासकीय अथवा महामंडळे यांचे अधिकारी असतील तर परीक्षा शुल्क रु. ३०००/- ( तीन हजार मात्र) भरावे लागेल. परीक्षा शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया, मेरी शाखा, नाशिक या बचत खाते क्रं. १०९३४४१९८४५ वर Assistant Director (Adm) Maharashtra Engineering Training Academy, Nashik या खात्यावर जमा करावेत व त्याची Original Counter Slip प्रवेश अर्जासोबत जोडण्यात यावी. व Counter slip च्या खाली / पाठीमागे परीक्षार्थीनी स्वतःचे पूर्ण नांव व पत्ता लिहावा. सदरचे परिक्षा शुल्क कोठल्याही स्थितीत परत केले जाणार नाही. अगर त्याचा पुढील वेळेस परीक्षेस बसण्यास उपयोग होऊ शकणार नाही.

७) विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज संपूर्ण भरुन तो परीक्षार्थीने नियंत्रक अधिका-यांकडे सादर करावा. नियंत्रक अधिका-यांमार्फत न आलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार नाहीत.
८) अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक ०९/१०/२०२३ असून, नियंत्रक अधिका-याने शिफारस केलेले अर्ज मुदतीपूर्व प्रबोधिनीकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. दिनांक ०९/१०/२०२३ नंतर आलेले अर्ज स्विकृत केले जाणार नाहीत व अर्ज उशिरा प्राप्त झाल्यामुळे परीक्षार्थीस परीक्षेस बसण्यास परवानगी न मिळाल्यास यास प्रबोधिनी जबाबदार रहाणार नाही.
९) परीक्षार्थी ज्या अभियांत्रिकी संवर्ग (सहाय्यक कार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / उपविभागीय अभियंता / उपविभागीय अधिकारी) आणि कक्ष (स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत) यांचेशी संलग्न आहे ते स्पष्टपणे नमूद करावे.
१०) परीक्षेस बसण्याकरीता परीक्षार्थीची पात्रता:-
(१) महाराष्ट्र अभियंता सेवा वर्ग-१ (सहा. कार्यकारी अभियंता) मध्ये सरळ सेवेने नियुक्त करण्यांत आलेले अधिकारी..
(२) अ) – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (सहा.अभियंता श्रेणी- १) मध्ये सरळ सेवेने नियुक्त करण्यांत आलेले अधिकारी.
ब) (स्थायी व अस्थायी पर्यवेक्षक व कनिष्ठ अभियंता पदावरुन) स्थायी, अस्थायी किंवा स्थानापन्न नात्याने नियमीत बढती देण्यात आलेले उप अभियंता / उप विभागीय अभियंता / उप विभागीय अधिकारी.
टिप:- अभावित (Fortuitous) / तात्पुरती बढती देण्यात आलेल्या उप अभियंता/उप विभागीय अभियंता / उप विभागीय अधिकारी यांनी सदर परीक्षेस अर्ज करु नये. (संदर्भ: शासन, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक परीक्षा १००२/७२९४/(१७३/२००१) आ. प्रशिक्षण, दिनांक २५/७/२००३).
११) मागील व्यावसायिक परीक्षेच्या गुणपत्रकाच्या आधारे सूट प्राप्त असेल तर सूट नमूद करावयाची असते. जे परिक्षार्थी फक्त एका विषयात अनुत्तीर्ण झाला असेल पण त्याने अन्य विषयाच्या एकूण गुणापैकी किमान ७० टक्के गुण मिळविले असतील तर तो ज्या विषयात अनुउत्तीर्ण झाला असेल फक्त त्या विषयाची परीक्षा देऊ शकेल. परीक्षार्थी अशा प्रकारे सूटपात्र ठरत असल्यास, गुण तक्ता नियंत्रक अधिका-यांकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे…
१२) वयोमानानुसार परीक्षेतून सुट मिळविण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-2318/प्र.क्र.3/का.17 दि. 01/03/2018 नुसार कार्यवाही करावी.
१३) परीक्षार्थीने प्रश्नपत्रिका क्रमांक 2 चा ऐच्छिक विषय म्हणून खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय निवडावा. सदर विषय तुमच्या कार्यालयीन कामाशी प्रत्यक्ष संबंधित असलेला विषय असावा. एकदा एक विषय निवडल्यानंतर तो बदलण्याची कोणत्याही परिस्थितीत अनुमती दिली जाणार नाही.
१५) परीक्षार्थीची प्रवेशपत्रे परीक्षेच्या ४ दिवस आधी परीक्षार्थीच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त होतील याची नोंद घ्यावी.
१६) परीक्षार्थीने प्रवेश पत्रावर फोटो लावावा व त्यावर कार्यालय प्रमुखांची सही व शिक्का घ्यावा. तसेच परीक्षार्थीने स्वता:चे नांव, पदनाम, पूर्ण पत्ता, परीक्षेत द्यावयाचे विषय इत्यादी परीक्षा केंद्राचा पत्ता बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रवेश पत्रात काही त्रुटी अथवा बदल असल्यास सदर बाब तातडीने परीक्षा होण्याच्या अगोदर या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दयावी. परीक्षा पार पाडल्यानंतर याविषयी कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद घेण्यात येणार नाही.
१७) परीक्षार्थीने दिलेली माहिती दिशाभूल करणारी अथवा खोटी असल्याचे आढळून आल्यास परीक्षार्थी शिस्तभंगाची कार्यवाही व परीक्षा विषयक फायदे गमावणे या दोन्ही बाबतीत पात्र ठरेल याची नोंद घ्यावी.
१८) प्रबोधिनीने जाहीर केलेला निकाल हा अंतिम राहणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम पुस्तिकेतील परीक्षा नियमानुसार निकालाची फेरतपासणी केली जाणार नाही तसेंच उत्तरपत्रिकांचे गुणपडताळणी / पुनर्मूल्यांकन केले जात नाही याची नोंद घ्यावी.

 

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड