डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी व सूचना तंत्रज्ञान संस्था (नायलिट) आणि मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १८ मार्च २०२५ रोजी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबईतील नामवंत कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून, विविध डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी आकर्षक संधी उपलब्ध असणार आहेत. संयोजक डॉ. गिरीश काळे यांनी ही माहिती दिली.
नावनोंदणी आणि मुलाखती
मेळाव्यासाठी नावनोंदणी १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल. “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी किमान पाच बायोडाटाच्या प्रती घेऊन उपस्थित राहावे. सर्व कंपन्यांची आणि उपलब्ध रिक्त पदांची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असे आयोजकांनी सांगितले.
सहभागी नामांकित कंपन्या
या भरती मोहिमेत छत्रपती संभाजीनगरमधील साई इलेक्ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग, कार्ल्सबर्ग इंडिया, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, लाईफलाईन डिव्हाइसेस प्रा. लि., आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, यशश्री प्रेस, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, अल्ट्रा ब्युटी केअर यांसह शार्कवेब आयटी, इंडियन इंटरनेट सोल्युशन्स प्रा. लि., वेलविन पॅकेजिंग, सोडेस्को इंडिया, एस. डब्ल्यू मल्टिमीडिया, इन्फिनिटी टेक रिसोर्सेस, इम्फासिस आणि इतर ३५ कंपन्या सहभागी होणार आहेत.
या भव्य संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















