अतिवृष्टीमुळे वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलली
Medical Examination Postponed
Medical Examination Postponed : मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची बुधवारी आयोजित केलेली लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. ही परीक्षा २९ सप्टेंबरला सकाळी ११ ते २ या वेळेत त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ही परीक्षा देणाऱ्या आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि डेंटलच्या जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Medical Examination Postponed : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झालेली नाही. त्यातच मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारीही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येत होत्या. राज्यामध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या १५० केंद्रांवर परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे पाच हजार विद्यार्थी बसले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मंगळवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना ११ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांनी व परीक्षकांनी विद्यापीठाला कळवले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा २९ सप्टेंबरला सकाळी ११ ते २ या वेळेत त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सोर्स : म. टा.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परीक्षांचे अंतिम वेळापत्रक ठरवताना केंद्रीय परिषदांची समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही विद्यापीठाकडून स्पष्ठ करण्यात आले आहे.