देशात मेडिकलच्या दोन हजार चारशे जागा रिक्त
Medical Admission
Medical Admission : Two thousand four hundred medical posts are vacant in the country – कोरोना महामारीमुळे परीक्षेत मुक्त हस्ते दिलेले गुण, ईअर ड्रॉपचा विद्यार्थ्यांनी घेतलेला निर्णय यासह परदेशात जाऊन अद्ययावत शिक्षण घेण्याची आस यामुळे यंदा एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात २,४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर विनाडोनेशन प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम करिअरची संधी मिळणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महागडा आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर समजला जाणारा एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता निव्वळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त जागांबाबत माहिती प्रसारित केली आहे. महाराष्ट्रातील १९ महाविद्यालयांत बीडीएस आणि एमबीबीएसच्या ३३२ जागा अद्यापही रिक्त आहेत. यात एमबीबीएससाठी सांगली, मुंबई, कोल्हापूर, लोणी, कऱ्हाड, वर्धा, पुणे येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये एमबीबीएसच्या एनआरआय कोट्यामधील जागांचा समावेश सर्वाधिक आहे. यातील काही जागा एआयआयएमएस व जेआयपीएमईआरसारख्या केंद्रीय संस्थांमध्येही आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
१. मर्सी फॅक्टर रिझल्ट
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवायला मर्यादा होत्या. परिणामी उत्तरपत्रिका तपासताना सढळ हाताने गुण देण्यात आले. यालाच शैक्षणिक क्षेत्रात मर्सी फॅक्टर रिझल्ट असे म्हणतात. या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याची संधी उपलब्ध झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अवकाश अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असल्याचे दिसते.
२. परदेशात जाण्याकडे कल
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आठ वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन पुन्हा लाखो रुपये खर्च करून दोन वर्षे अभ्यास करावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता यंदा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईअर ड्रॉप घेऊन उत्तम गुण मिळवून परदेशात प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली आहे.
सोर्स : लोकमत
राज्यात मेडिकलच्या ‘इतक्या’ जागा; प्रवेशांसाठी लागणार चुरस
Medical Admission : Medical Admission 2020 maharashtra state cet cell declares vacant seats to be alloted for medical admission : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, आता एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ‘एमबीबीएस’साठी राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयात एकूण ६,६००, तर बीडीएससाठी २,६७६ जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) वेबसाइटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘नीट’चा निकाल वाढल्याने; तसेच ७०:३० कोटा रद्द झाल्याने, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. ‘सीईटी सेल’ने एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांत मोठी चुरस असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या प्रवेशक्षमतेचा अंदाज येण्यासाठी ‘सीईटी सेल’कडून प्रवेशक्षमता जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील एकूण २५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत ४,३३० जागा आहेत, तर १८ खासगी महाविद्यालयांत २,२७० जागा उपलब्ध आहेत. चार सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत ३२६ जागा, २५ खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत २,३५० जागा उपलब्ध असल्याचे ‘सीईटी सेल’कडून सांगण्यात आले आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध जागांपैकी १५ टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यंदा ‘नीट’चा निकाल चांगला लागल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रवेशक्षमतेत राज्यातील खासगी विद्यापीठांतील जागांची माहिती वगळण्यात आली आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
My designation is dialysis technician any vaccancy