परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची अनेक संधी

Many Local Jobs For Candidates

Job Opportunities For local Candidates –  सध्या महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी लागू झाल्याने परराज्यातील  मजूर आणि कामगार त्यांच्या मूळगावी परत गेले. त्यामुळे सद्य:स्थितीला प्रशासनाने औद्योगिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिली असून, अनेक ठिकाणी MIDC उद्योग सुरू झालेत.

त्यात परप्रांतीय कामगारांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरी, स्थानिकांनी या संधीचं सोनं करून विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

शिवेंद्रराजे म्हणाले, की रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही, परप्रांतीयांमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिकांना नोकरी नाही, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवरून अवलंबून राहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो, पण आजमितीला वेगळी स्थिती आहे. करोना महामारीमुळे देशभरात टाळेबंदी लागू आहे. त्यात जनजीवन विस्कळले असून, जो तो आपापल्या राज्यात, घरी परत जात आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. विविध वाहतूक संस्थांमध्ये वाहनचालकांची असंख्य पदे रिकामी आहेत. करोनासारखी महाभयंकर साथ ही वाईट आहेच, पण यामुळे का होईना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेल्या संधीचा स्थानिक भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Niteshrao purushottam lohe says

    12 th.pass Driving

  2. प्रशांत उद्दल says

    10वी नापास काम मिळेल का

  3. प्रशांत उद्दल says

    मी 10वी नापास आहे मिळेल ते काम कर्ण्यास तयार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड