मनोरुग्णालयांमध्ये विविध प्रवर्गातील ५००+ पदे रिक्त! – Manorugnalay bharti Latest Update
Manorugnalay bharti Latest Update
Manorugnalay bharti Latest Update – सध्या सरकारने मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी राज्य सरकारने ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरू केली आहेत. या मनोरुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या मोठ्या संख्येत वाढ होत असली तरी या रुग्णालयांमधील विविध प्रवर्गातील ५०० पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा अभाव असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यातील चार मनोरुग्णालयांमध्ये मंजूर असलेल्या २ हजार १९६ पदांपैकी ४९६ पदे रिक्त आहेत. ठाणे मनोरुग्णालयातील ७२३ मंजूर पदांपैकी १४२ पदे रिक्त आहेत. तर पुणे मनोरुग्णालयातील ९५४ मंजूर पदांपैकी १९१ पदे, नागपूर मनोरुग्णालयातील ३७५ मंजूर पदांपैकी ११५ पदे आणि रत्नागिरीत मनोरुग्णालयातील १४४ मंजूर पदांपैकी ४८ पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे चतुर्थी श्रेणीतील आहेत. ठाणे मनोरुग्णालयामध्ये चतुर्थी श्रेणीतील सर्वाधिक १०७ पदे रिक्त असून, पुरुष व स्त्री परिचर यांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. पुणे मनोरुग्णालयातही १३६ पुरुष व स्त्री परिचर, नागपूरमध्ये ९० पदे, तर रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये १९ पुरुष व स्त्री परिचर यांची पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Comments are closed.