महावितरण विद्युत सहाय्यक – परिमंडळनिहाय निवड यादी व कागदपत्रे पडताळणीची तारीख जाहीर – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result 2022

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result 

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result 2022

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result : Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahadiscom) has declared the Electrical Assistant Recruitment constituency-wise list of candidates selected from the waiting list & document verification dates. Click on the below link to download the list.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाकरिता प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी व कागदपत्रे पडताळणीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारीत निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी/अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. ०२/११/२०२२ ते दि. ०३/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडळनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणीकरिता स्वत: उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Important Documents For Mahavitaran Vidyut Sahayak Document Verification

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रती सहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :

  • i) सिस्टीम जनरेटेड अॅप्लीकेशन ऑनलाईन फॉर्म. (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)
  • ii) एस.एस.सी. (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  • iii) आय.टी.आय. प्रमाणपत्र (Electrician/Wireman)/सेंटर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी. ऑफ एक्सलन्स (Electrical Sector)
  • iv) जातीचे प्रमाणपत्र. (If Applicable) v) जातीचे वैधता प्रमाणपत्र (वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेले कागदपत्रे सादर करावी. (If Applicable)
  • vi) समांतर आरक्षणाच्या पृष्टयर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र. उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • vii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • viii) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. ix) ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3Uenill

Previous Post –

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result, Lists Published 

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result : Results of MSEDCL Electrical Assistant Posts have been announced. MSEDCL has announced this result following the order of Energy Minister Nitin Raut. The results can be viewed on the official website. Further details are as follows:-

महावितरण विद्युत सहाय्यक भरती निवड यादी, Document Verification List निकाल जाहीर !

MSEDCL List 2022

महावितरण भरतीच्या जाहिरात कर ०४/२०१९ च्या भरतीचे विविध निकाल आणि याद्या आज २७ ऑक्टोबर २०२२ रोजी महावितरण द्वारे प्रकाशित करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. 

 

 

MSEDCL Results 2021 । Mahavitaran Bharti 2021

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानंतर महावितरणने हा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे. या निकालामुळे दीर्घकाळापासून प्रतीक्षा करणाऱ्या विद्युत सहाय्यक पदांच्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MSEDCL Electrical Assistant Posts Result 2021

५ हजार पदांसाठी जाहिरात 

महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण ५००० पदांसाठी ९ जुलै २०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ४६६ जागा वगळता उर्वरित ४५३४ जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे.

यानुसार खुल्या प्रवर्गातून १९८४ पदांचा तर अनुसूचित जातीसाठी ३७५, अनुसूचित जमातीसाठी २३६, विमुक्त जातीसाठी १०९, भटक्या जमाती(ब)साठी ८०, भटक्या जमाती ( क)साठी ११८, भटक्या जमाती (ड)साठी ४४, विशेष मागास प्रवर्गासाठी ८१ व इतर मागास वर्गासाठी १५०७ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3F3K4p8

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. dipak raut says

    Nsedcl ऑपरेटर जागा कधी सुटणार आहेत?

  2. dipak raut says

    भरती कधी होईल परत?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड