JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सावधान! 23 हजार पदांची महावितरण भरतीची बोगस जाहिरात व्हायरल! -MAHAVitaran Fake Recruitment

MAHAVitaran Fake Recruitment -नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनो सावधान! सध्या राज्यभरात विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी आता थेट महावितरणला लक्ष्य केले आहे. महावितरणमध्ये कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता तब्बल २३ हजारांवर विविध पदांसाठी थेट भरती सरू असल्याच्या खोट्या, निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या बोगस संदेशांमध्ये केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मेगाभरती असल्याचे भासवून आकर्षक वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. नोकरीच्या ‘शोधात असलेल्या तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम व इतर सोशल ‘मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीचा पाऊस पाडला जात आहे.

कोणत्याही अधिकृत ‘ सूत्रांशिवाय आणि पूर्वसूचनांशिवाय फिरत असलेल्या या जाहिरातींवर नागरिकांनी व विद्याथ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.. सोशल ‘ मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘ या संदेशांमुळे अनेक होतकरू उमेदवार संभ्रमात पडले असून, बनावट लिंकच्या माध्यमातून ” त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत महावितरण प्रशासनाने अत्यंत कडक भूमिका घेत अधिक्रत स्पष्टीकरण दिले आहे. महावितरणमधील कोणत्याही प्रकारच्या कर्मचारी भरतीबाबतची कोणतीही जाहिरात, अर्जाची पद्धत किंवा’ वेळोवेळी जाहीर होणारी माहिती ही केवळ कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध ‘केली जाते. याशिवाय अन्य कोणत्याही ‘ संकेतस्थळावर किंवा सोशल मीडियावरील लिंकवर प्रकाशित झालेली माहिती ग्राह्य धरू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नका

सोशल मीडियाद्वारे नागरिकांची दिशाभूल – भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची किंवा शुल्क भरण्याची कोणतीही खात्रीशीर लिंक ‘केवळ महावितरणच्या मुख्य पोर्टलवरच उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सायबर भामट्यांच्या जाळयात अडकण्यापासून बचाव करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियावरून प्राप्त झालेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच, चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी ‘ कोणत्याही भरतीविषयक माहितीसाठी ‘केवळ अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड