सावधान! या वेळेस TET परीक्षेत AI चा वापर! | MAHA TET Answer Key 2024 PDF – mahatet.in Application 2024

TET mahatet.in Application 2024

Mahatet.in Application 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET) राज्यातील एक हजार २३ केंद्रांवर आयोजन केले आहे. परीक्षेदरम्यान कोठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी केंद्रावर तब्बल १८ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, पुण्यातील नियंत्रण कक्षातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मार्फत नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

टीईटी पेपर १ साठी १ लाख ५२ हजार ५९७ आणि पेपर २ साठी २ लाख १ हजार ३४० असे एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली. त्यामध्ये ४,८८७ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती, सिंधी अशा एकूण नऊ माध्यमांतून येत्या रविवारी परीक्षा होईल. गैरप्रकार घडू नयेत यासाठी तयारी केली असल्याचे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तीन प्रतींमध्ये मिळणार OMR शीट टीईटी परीक्षेत यापूर्वी उमेदवारांच्या गुणवाढीचा गैरप्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा तीन प्रतींमध्ये ओएमआर शीट मिळेल. त्यामध्ये एक मूळ प्रत व दोन कार्बनलेस प्रती आहेत. त्यांपैकी एक प्रत परीक्षेनंतर विद्यार्थी आपल्याकडे ठेवतील, तर दुसरी प्रत परिषदेच्या ताब्यात सुरक्षित ठेवली जाणार आहे.

 

..त्यानंतरच प्रवेश – केंद्रात प्रवेशापूर्वी उमेदवार, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली जाईल. उमेदवारांचे बायोमेट्रिक, तसेच फेस रेकग्निशन मशिनद्वारे तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

 


शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज दाखल राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा १० नोव्हेंबरला दिवाळीनंतर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून जवळपास तीन लाख उमेदवारांनी यंदा अर्ज दाखल केले आहेत. काही उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यात तांत्रिक अडचणी आल्याने, त्यांना गुरुवारपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे.

TET साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. या कालावधीत तीन लाख ३२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली, परंतु त्यापैकी दोन लाख ९२ हजार १८४ उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत. यातील दोन लाख ५७ हजार ८८५ उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत, तर उर्वरित ३४ हजार २९९ उमेदवारांनी अद्याप शुल्क भरलेले नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तांत्रिक अडचणींची दखल घेत गुरुवारपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ३ ऑक्टोबरनंतर अंतिम परीक्षार्थींची संख्या निश्चित होईल, त्यानंतर परीक्षा केंद्र, संचालक, आणि पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती परिषदेने दिली आहे.


mahatet.in Application 2024

शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबरपर्यंत २ लाख ९२ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ५७ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करीत प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केलेला नसून त्यांना दि. ३ ऑक्टोबर सकाळी ११ वाजेपर्यंत शुल्क भरण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (टीईटी) चे दि. १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दि. ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम परीक्षार्थी उमेदवारांची संख्या निश्चित होईल. त्यानंतर परीक्षा केंद्र, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नेमणूक करण्यासह परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन केले जाणार आहे.

 

टीईटी – २०२४ अर्ज नोंदणी (दि. १ ऑक्टोबरपर्यंत) ■ ऑनलाइन रजिस्ट्रेशन : ३ लाख ३२ हजार ■ अर्ज नोंदणी : २ लाख ९२ हजार १८४ ■ शुल्क भरणा केलेले उमेदवार : २ लाख ५७ हजार ८८५ ■ शुल्क भरणा राहिलेले उमेदवार : ३४ हजार २९९

टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी, तेलगू, कन्नड, बंगाली या माध्यमांतून पेपर १ आणि पेपर २ चे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून दिले आहेत.

 

mahatet.in Application 2024: Candidates applying for Class 1 to 5 Teacher Posts for Maha TET 2024 must have completed Higher Secondary or equivalent qualification with minimum 50% marks. Also, they must have B.L.Ed./B.Ed./Diploma in Elementary Education or 45% marks in Higher Secondary and have completed Diploma in Teacher Education (D.T.Ed.). Know More about mahatet.in Application 2024 at below:

महाराष्ट्र राज्यात पहिली ते आठवी वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी डी.एड. किंवा बी.एड. पदवी असणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) द्यावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2024 च्या टीईटी परीक्षेसाठी जाहिरात जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

mahatet.in Application 2024

टीईटी परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल, आणि अर्ज करण्याची तारीख 9 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

कोण अर्ज करू शकतो?
डी.एड. आणि बी.एड. पदवी घेतलेले विद्यार्थी टीईटी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर ते पहिली ते आठवी वर्गांच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरतील. विद्यार्थ्यांना दोन पेपर देण्याची संधी आहे, पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा दोन्ही पेपर दिले जाऊ शकतात.

परीक्षेची तारीख:
टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र 28 ऑक्टोबरला मिळेल. पेपर 1 सकाळी 10:30 ते 1:00 दरम्यान होईल, तर पेपर 2 दुपारी 2:00 ते 4:30 दरम्यान होईल.

परीक्षा शुल्क:
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि दिव्यांगांसाठी एका पेपरचे शुल्क 700 रुपये आहे, तर ओबीसी आणि इतर प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. दोन्ही पेपरसाठी अनुक्रमे 900 आणि 1200 रुपये शुल्क आहे.

प्रवर्ग एका पेपरसाठी शुल्क (₹) दोन्ही पेपरसाठी शुल्क (₹)
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग 700 900
ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग 1000 1200

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड